The self-help groups in Ahmednagar earned Rs 67 lakh due to the mask
The self-help groups in Ahmednagar earned Rs 67 lakh due to the mask 
अहमदनगर

नगरमधील बचत गटांनी मास्कमुळे कमावले ६७ लाख रूपये

दौलत झावरे

नगर ः कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासन प्रयत्न करीत आहे. या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रत्येकाने मास्क वापरावे, असे आवाहन केले जात आहे. हीच बाब ओळखून जिल्ह्यातील 114 बचत गटांनी मास्कची निर्मिती केली. त्यातून त्यांना 67 लाखाचे उत्पन्न मिळाले. 

महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानात महिला बचत गटांना विविध प्रकारचे प्रशिक्षण देऊन त्यांच्याकडून वर्षभर विविध साहित्य व उत्पादानांची निर्मिती करण्यात येत आहे.

यासाठी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणे अंतर्गत महिला बचत गटांनी तयार केलेल्या मालाच्या मार्केटिंगसाठी जिल्हास्तरावर मार्केटिंग अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे महिला बचत गटांच्या उत्पादीत मालाला बाजारपेठ उपलब्ध होत आहे. 

कोरोना विषाणूमुळे मास्कला एप्रिल महिन्यात मागणी वाढली होती. मागणी जास्त व पुरवठा कमी अशी स्थिती असल्यामुळे ग्रामीण भागाताली महिलांनी कॉटनचे मास्क तयार करण्यात सुरवात केली आहे. जिल्ह्यातील 114 बचत गटाच्या 920 सदस्यांनी पाच लाख 20 हजार मास्कची निर्मिती केली. त्यातील पाच लाख तीन हजार मास्कची विक्री झाली आहे. त्यातून 67 लाख पाच हजारांचे उत्पन्न या बचत गटांना मिळालेले आहे. 

मास्कला मागणी टिकून 
कोरोनाचा प्रादुर्भाव कमी जास्त होत आहे. त्यामुळे बचत गटांनी सुरु केलेले मास्क निर्मितीचे कामे अद्यापही सुरु आहे. बचत गटांच्या मास्कला मागणीही टिकून आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Share Market Today: शेअर बाजारात नफा कमावण्याची मोठी संधी; आज 'या' 10 शेअर्सवर ठेवा लक्ष

Latest Marathi News Update : मतदान केंद्रावर मतदारांचे होणार फूल देऊन स्वागत; टक्केवारी वाढवण्यासाठी निवडणूक आयोगाचा निर्णय

Nashik Crime News : बँकेच्या सेफ्टी लॉकरमधील 5 कोटींचे दागिन्यांवर डल्ला! घरफोडीचा गुन्हा दाखल

Poha Chila Recipe : सकाळच्या नाश्त्यामध्ये बनवा हेल्दी अन् टेस्टी पोहा चिला, एकदम सोपी आहे रेसिपी

MS Dhoni IPL 2024 : 'धोनीला 9व्या क्रमांकावर बॅटिंग करायची असेल तर त्याने खेळू नये...', चेन्नईच्या थालावर भडकला मुंबईचा माजी कर्णधार

SCROLL FOR NEXT