Shiral fired over land dispute
Shiral fired over land dispute 
अहमदनगर

ब्रेकिंग ः जमिनीच्या वादातून शिराळला गोळीबार 

सकाळ वृत्तसेवा

पाथर्डी : जमिनीच्या वादातून शिराळ येथे आज दुपारी एकच्या सुमारास दोन गटात तुंबळ मारामारी झाली. त्यात दोन्ही गटांतील 12 ते 15 जण जखमी झाले. दरम्यान, या वेळी झालेल्या गोळीबारात एकाच्या पायात गोळी घुसली.

जखमीवर नगरच्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. इतर जखमींवर येथील खासगी दवाखान्यात उपचार सुरू आहेत. याबाबत माहिती मिळताच पोलिस अधीक्षक अखिलेश कुमार सिंह यांनी घटनास्थळी भेट दिली. तपासाबाबत अधिकाऱ्यांना सूचना केल्या.

शिराळ येथील अमोल वाघ व सचिन वाघ या चुलतभावांमध्ये शेतीचा वाद आहे. पाइपलाइनवरून वादाला तोंड फुटले. सचिन वाघ हा पांढरीपूल येथील पालवे कुटुंबाकडे कामाला असतो.

अमोल वाघ यांच्या शेतात पेरणी सुरू असताना, आज दुपारी सचिन वाघ व अमोल वाघ यांच्या कुटुंबामध्ये बाचाबाची झाली. सचिन वाघ याने पांढरीपूल येथून काही जणांना बोलाविले. त्यातून दोन गटात तुंबळ मारामारी झाली. त्यात दोन्ही गटांतील अनेक जण जखमी झाले. 

दरम्यान, या वेळी झालेल्या गोळीबारात अमोल वाघ याच्या पायात गोळी घुसली. त्यात तो गंभीर जखमी झाला. त्यानंतर तुफान दगडफेक झाली. यात दोन्ही गटांतील सुमारे 12 ते 15 जण जखमी झाल्याचे समजते. नगर येथील खासगी रुग्णालये व जिल्हा शासकीय रुग्णालयात जखमींवर उपचार सुरू आहेत.

याबाबत रात्री उशिरापर्यंत तक्रार नोंदविण्याचे काम सुरू होते. घटनेची माहिती समजताच पोलिस अधीक्षक अखिलेश कुमार सिंह, अतिरिक्त पोलिस अधीक्षक सागर पाटील, उपविभागीय पोलिस अधिकारी मंदार जवळे, नगर येथील स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दिलीप पवार, पोलिस निरीक्षक रमेश रत्नपारखी, सहायक पोलिस निरीक्षक वसंत पवार व पोलिसांनी घटनास्थळास भेट दिली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bomb Hoax in 16 Schools: मतदानादिवशी 16 शाळांना बॉम्बनं उडवून देण्याची धमकी! रशियातून आला ईमेल ? पोलिसांचं धाबं दणाणलं

Heeramandi The Diamond Bazar : भन्साळींच्या भाचीला नेटकऱ्यांनी केलं ट्रोल; 'या' अभिनेत्रीने ट्रोलर्सला सुनावले खडेबोल

Panchayat 3: प्रमोशनची हटके पद्धत; भाजी मंडईतील दुधीभोपळ्यावर 'पंचायत'चं नाव, व्हिडीओ व्हायरल

Akshaya Tritiya 2024: अक्षय तृतीयेला सोन खरेदीवर विशेष ऑफर! मेकिंग चार्जेसवर ज्वेलरी ब्रँड देत आहेत खास सवलत

Latest Marathi News Update: लोकसभा निवडणुकीत नाशिकमध्ये 31 तर दिंडोरीत 10 उमेदवार रिंगणात

SCROLL FOR NEXT