Shiv Sena and MNS are also aggressive against Trupti Desai due to the dispute over Shirdi 
अहिल्यानगर

शिर्डीबाबतच्या वादामुळे तृप्ती देसाईंविरोधात शिवसेनेसह मनसेही आक्रमक

सतीश वैजापूरकर

शिर्डी ः भाविकांच्या सुलभ साईदर्शनासह येथील ढासळत्या अर्थकारणाला चालना देण्यासाठी विविध उपाययोजना करण्याचा हा कठीण काळ आहे.

आर्थिक अरिष्ट राहिले बाजूला आणि फलनिष्पत्ती नसलेले वादविवाद केंद्रस्थानी येत आहेत. येत्या भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई येत्या 10 डिसेंबर रोजी साईसंस्थानने लावलेले विनंती फलक हटविण्यासाठी येथे येत आहेत. त्यांच्या विरोधात आज शिवसेनेचे महिला आघाडीच्या स्वाती सुनील परदेशी व मनसे महिला आघाडीच्या सुरेखा दत्तात्रेय कोते यांनी आक्रमक भूमिका घेतली.

शिवसेनेने त्यांच्या तोंडाला काळे फासण्याचा इशारा दिला, तर मनसेने उद्या (सोमवारी) शहरात ठिकठिकाणी हे फलक लावण्याचे ठरविले आहे. फलक हटवूनच दाखवा, असे थेट आव्हानच देसाई यांना दिले आहे. 

खरे तर शिर्डीचे अर्थकारण सध्या नाजूक वळणावर आहे. साईमंदिर प्रदीर्घ काळ बंद राहिल्याने शहराची आर्थिक हानी झाली. पाडव्यापासून साईमंदिर दर्शनासाठी खुले झाले. रोज सरासरी आठ हजार भाविक येथे दर्शनासाठी येतात. पूर्वी दैनंदिन 50-60 लाख रुपयांचे उत्पन्न दानपेटीतून मिळायचे.

ते आता कुठे दैनंदिन दहा लाख रुपयांवर आले आहे. त्यात संस्थानच्या नित्याचा खर्च भागविणेही मुश्‍कील आहे. शहरातील बाजारपेठ तर बंद असल्यासारखीच स्थिती आहे. हा काळ कोविड संसर्गावर नियंत्रण ठेवून भाविकांना वेगाने आणि सुलभ साईदर्शन देण्यावर लक्ष केंद्रीत करण्याचा आहे.

कोविड प्रतिबंधक उपाययोजनांचे काटेकोर पालन करायचे. भाविकांना मुक्कामासाठी प्रवृत्त करायचे. शारीरिक अंतराचे पालन करून भाविकांसाठी विविध उपक्रम हाती घ्यायचे. दर्शनार्थी भाविकांची संख्या वाढविण्यासाठी, शहरात आणखी अनकुल वातावरण तयार करायचे.

ग्रामस्थांतर्फे भाविकांचे आगळ्या-वेगळ्या पद्घतीने स्वागत करता येईल का, याबाबत विचार करायचा. साईसंस्थानने भाविकांच्या स्वागतासाठी वेगवेगळ्या सुविधा निर्माण करून द्यायच्या, यासाठी पुढाकार घेण्याचा हा काळ आहे. 

वादास विनाकारण महत्त्व 
भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी शिर्डीत येऊन मंदिर परिसरातील एखादा विनंती फलक हटविण्याचा प्रयत्न केला, तर कायद्याच्या आधारे त्यांच्यावर कारवाई करण्यास साईसंस्थान समर्थ आहे. या वादास विनाकारण महत्त्व देऊ नये. शहरातील वातावरण भाविकांना येथे यावेसे वाटेल असे ठेवावे, अशी येथील जाणकारांची अपेक्षा आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 3rd Test: तुमचा अभिमान! शुभमन गिल पराभवानंतर काय म्हणाला? सामना नेमका कुठे फिरला हे सांगितलं, जसप्रीतबाबत...

Video: सर्वच सीमा ओलांडल्या! फेमस होण्यासाठी बाईकवर जोडप्याचं नको ते कृत्य, लोकांनी व्हिडिओ बनवून व्हायरल केला

IND vs ENG 3rd Test: मोहम्मद सिराज दुर्दैवी पद्धतीने बाद झाला, रवींद्र जडेजा हतबल दिसला; इंग्लंड तिथेच जिंकला Video

Mhada Lottery: मुंबईकरांना म्हाडाकडून आनंदवार्ता! ५ हजारहून अधिक घरांची लॉटरी जाहीर; 'असा' करा अर्ज

ENG vs IND, 3rd Test: जडेजा लढला, पण इंग्लंडने लॉर्ड्स कसोटी जिंकली! १९३ धावा करतानाही भारताची उडाली भंबेरी

SCROLL FOR NEXT