Shiv Sena Deputy District Chief Ramdas Bhosale called on social activist Anna Hazare.jpg
Shiv Sena Deputy District Chief Ramdas Bhosale called on social activist Anna Hazare.jpg 
अहमदनगर

जिल्हा सहकारी बँक निवडणुकांचा धुरळा उडाला; शिवसेना नेत्यानं अण्णांचा आशीर्वाद घेत फोडला प्रचाराचा नारळ!

एकनाथ भालेकर

राळेगणसिद्धी (अहमदनगर) :  जिल्हा सहकारी बॅंक निवडणूक पार्श्वभूमीवर शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख रामदास भोसले यांनी राळेगणसिद्धी येथे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची भेट घेऊन आशीर्वाद घेत प्रचाराला प्रारंभ केला.

पारनेर तालुक्यात जिल्हा सहकारी बॅंकेची रणधुमाळी सुरू झाली आहे. राष्ट्रवादीकडून महानगरबॅंकेचे अध्यक्ष अॅड. उदय शेळके व शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख भोसले यांच्यात सेवा संस्था मतदार संघात लढत होत आहे. पारनेर तालुक्यातील निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता वर्तवली जात असताना अखेरच्या क्षणी भोसले यांनी निवडणूक लढवत असल्याचे जाहीर करून निवडणुकीतील रंगत वाढवली आहे. भोसले यांनी हजारे यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. तालुक्यातील अनेक विकासकामे आपण पाहिली आहेत. आपण चांगले काम करीत असून अशा उमेदवारांची जिल्हा बॅंकेसाठी गरज आहे. जिल्हा बॅंकेच्या माध्यमातून शेतकरी व गरीब घटकांतील लोकांचे प्रश्न मांडण्याचे काम आपण कराल अशा शुभेच्छा हजारे यांनी दिल्याचे भोसले यांनी सांगितले. 

या वेळी शिवसेना तालुकाप्रमुख विकास रोहकले, पंचायत समिती सदस्य शंकर नगरे, ढवळपुरीचे सरपंच राजेश भनगडे, पारनेर शिवसेना शहर प्रमुख निलेख खोडदे, राळेगणसिद्धीचे माजी सरपंच जयसिंग मापारी, माजी उपसरपंच लाभेश औटी आदी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 LSG vs RR : केएल शेर तर संजू सवा शेर! राजस्थानचा एक पाय प्ले ऑफमध्ये

DC vs MI : गोलंदाजीतली 'गळती' मुंबईच्या मुळावर; बॅटिंगमध्ये फर्स्ट क्लास तर बॉलिंगमध्ये नापास

Jolly LLB 3 : आता रंगणार जॉली विरुद्ध जॉली केस; सिनेमाच्या शूटिंगबाबत महत्त्वाची अपडेट आली समोर

Google वर जाहिराती करण्यासाठी भाजपने खर्च केले 100 कोटी; BJP पहिल्या स्थानावर तर काँग्रेस कितव्या स्थानावर? वाचा सविस्तर...

CM Yogi Aadityanath : ''काशी अन् अयोध्येनंतर आता मथुरेकडे प्रस्थान...'' योगी आदित्यनाथांचे स्पष्ट संकेत

SCROLL FOR NEXT