priyanka kamble
priyanka kamble sakal
अहमदनगर

Motivation : मजुराची मुलगी पोलिस झाली अन्‌ दोनच महिन्यांत थेट पोलिस उपनिरीक्षक बनली

सकाळ वृत्तसेवा

श्रीगोंदे - स्पर्धा परीक्षा दिली होती, पण निकाल लागत नव्हता. आई-वडील मोलमजुरी करून उदरनिर्वाह करीत असल्याने, तिला त्यांचे दुःख पाहवत नव्हते. पोलिस भरतीची माहिती मिळाली आणि कष्टाच्या जिवावर ती पोलिस झाली. पण दोनच महिन्यांत एमपीएससीचा निकाल आला आणि त्यात पास होऊन ती थेट पोलिस उपनिरीक्षक बनली.

तालुक्यातील येळपणे या छोट्याशा गावातील मजुराच्या मुलीने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश संपादन केले. अगोदर पुणे शहर पोलिसपदी निवड झाली होती. त्यानंतर पोलिस उपनिरीक्षकपदी नियुक्ती झाली. प्रियंका पंडित कांबळे, असे तिचे नाव आहे. येळपणे येथील रहिवासी असलेले आणि मोलमजुरी करणारे पंडित गणपत कांबळे हे अल्पशिक्षित असून, घरची थोडी शेती पाहून मोलमजुरी करतात. पती, पत्नी व एक मुलगी, एक मुलगा, असा त्यांचा परिवार आहे.

शिक्षण सुरू असताना प्रियांका कांबळे यांचे लहानपणापासूनच पोलिस खात्यात अधिकारी व्हायचे स्वप्न होते. येळपणे येथून त्यांनी प्राथमिक व माध्यमिक शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर सी. टी. बोरा महाविद्यालयात (शिरूर, जि. पुणे) यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातून पदवीचे शिक्षण पूर्ण केले. पोलिस खात्यात वरिष्ठ अधिकारी व्हायचे स्वप्न असल्याने मेहनत घेऊन रात्रंदिवस अभ्यास केला.

दोन वर्षांपासून जिद्दीने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी सुरू केली. यात २०२३ मध्ये यश मिळाले. पोलिस भरतीत यशस्वी झाल्यानंतरही त्यांनी आपले प्रयत्न न थांबविता अभ्यास सुरूच ठेवला. दरम्यान, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण होऊन पोलिस उपनिरीक्षकपदी निवड झाली.

आई-वडील मोलमजुरी करत असलेल्या परिस्थितीची जाणीव ठेवून प्रशासकीय सेवेत नोकरी करण्याची ध्येय ठेवले. स्वयंशिस्त आणि समर्पणाची भावना मनात ठेवा. मेहनत, चिकाटी असणे आवश्यक आहे. मेहनत व जिद्दीच्या बळावर अशक्य काही नाही.

- प्रियांका कांबळे, येळपणे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Covid 19 : कोविडची पहिली लस बनवणाऱ्या शास्त्रज्ञावर चीनची मोठी कारवाई; भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे केलं बरखास्त

Nashik Crime News : बेद टोळीचा शुटर बारक्याला पुण्यातून अटक! 3 महिन्यांपासून होता फरार; गुंडाविरोधी पथकाची कामगिरी

Nashik Traffic Problem: नियोजनाअभावी वाहतुकीचा बट्ट्याबोळ! उमेदवारी अर्जामुळे गर्दी; वाहतूक पोलिसांची तारांबळ

Modi Rally Pune: "एका अतृप्त आत्म्यानं महाराष्ट्रासह देशाला अस्थिरतेत लोटलं"; PM मोदींकडून नाव न घेता शरद पवारांवर घणाघाती टीका

Latest Marathi News Live Update : महायुती महाराष्ट्रातल्या विकासाचा अनुशेष भरुन काढेल- मोदी

SCROLL FOR NEXT