Spontaneous lockdown of traders in Rahuri
Spontaneous lockdown of traders in Rahuri 
अहमदनगर

राहुरीतील व्यापाऱ्यांचे स्वयंस्फूर्तीने लॉकडाउन

विलास कुलकर्णी

राहुरी : शहरात कोरोनाबाधित रुग्ण वाढत आहेत. रुग्णालयांत बेड मिळेनासे झाले आहेत. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी व्यापारी संघटनांनी पुढाकार घेऊन 15 ते 21 एप्रिलदरम्यान राहुरी शहरात संपूर्ण टाळेबंदीचा निर्णय एकमताने घेतल्याची माहिती व्यापारी संघटनेचे अध्यक्ष प्रकाश पारख यांनी दिली. 

शहरातील व्यापाऱ्यांची नुकतीच बैठक झाली. पारख यांच्यासह सूर्यकांत भुजाडी, विलास तरवडे, कांता तनपुरे, संजीव उदावंत, प्रवीण ठोकळे, अनिल कासार, एकनाथ खेडेकर, योगेश चुत्तर, देवेंद्र लांबे, प्रसाद कोरडे, सचिन वने, प्रवीण दरक आदी उपस्थित होते. 

पारख म्हणाले, ""राहुरी शहरात व्यावसायिकांच्या वीस संघटना आहेत. सर्व संघटनांच्या प्रतिनिधींनी एकत्र येऊन वरील निर्णय एकमताने घेतला. टाळेबंदीच्या काळात शहरातील दवाखाने, औषधांची दुकाने चोवीस तास सुरू राहतील. व्यापारी पेठेतील औषधांची दुकाने सकाळी आठ ते दुपारी एक, भाजीपालाविक्री सकाळी सात ते अकरा वाजेदरम्यान सुरू राहील.

पतसंस्था, बॅंका त्यांच्या निर्धारित वेळेत सुरू राहतील. इतर सर्व दुकाने व व्यवसाय पूर्णपणे बंद ठेवले जातील. शहरात जमावबंदी आदेश लागू असल्याने नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये.'' 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Laughter Day 2024 : हसा लोकांनो हसा! तणाव,हृदयविकाराची करायचीय सुट्टी तर फक्त हसा, हसण्याचे ढिगभर फायदे

IPL 2024, RCB vs GT: विराटचा जबरदस्त डायरेक्ट थ्रो, तर विजयकुमारचा सूर मारत भन्नाट कॅच, पाहा Video

Weekly Horoscope : साप्ताहिक राशिभविष्य (०५ मे २०२४ ते ११ मे २०२४)

Latest Marathi News Live Update : प्रचाराचा आज सुपरसंडे, तोफा थंडावणार; जोरदार शक्तिप्रदर्शनाची तयारी

Sakal Podcast : जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला ते रावेरमध्ये लोकसभेत कोण बाजी मारणार?

SCROLL FOR NEXT