crime
crime 
अहमदनगर

मठाचीवाडी येथे दोन परस्परविरोधी गुन्हे दाखल

सचिन सातपुते

शेवगाव (नगर) : स्वस्त धान्य दुकानात धान्य घेण्याच्या कारणावरून स्वस्त धान्य दुकानदार व ग्राहक यांच्यात झालेल्या वादाचे रुपांतर परस्परविरोधी गुन्हे दाखल झाले आहे. त्यासंदर्भात शेवगाव तालुक्यातील मठाचीवाडी येथील भास्कर सर्जेराव शिरसाठ यांच्या फिर्यादीवरुन पोलिसांनी सिताराम श्रीपती करंजे व कडुबाळ दादा भुमकर यांच्या विरोधात अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायदा अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. तर सिताराम करंजे यांच्या मुलीच्या फिर्यादीवरुन भास्कर सर्जेराव शिरसाठ यांच्या विरोधात पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. 

शिरसाठ यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, रविवार (ता.२७) रोजी सायंकाळी साडेसात वाजता मठाचीवाडी येथील करंजे वस्तीवर गेलो असता, सिताराम करंजे व कडुबाळ भुमकर यांनी भास्कर शिरसाठ यांना धान्य देण्यास नकार देऊन गचांडी पकडून जातीवाचक शिवीगाळ व दमदाटी केली. याबाबत पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली असून उपविभागीय पोलिस अधिकारी मंदार जवळे तपास करीत आहेत.

करंजे यानी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, स्वस्त धान्य दुकानातून वडीलांच्या वाटयाचे धान्य मुलीचा अंगठा घेतल्याशिवाय ते देता येत नाही. याचा राग धरुन भास्कर शिरसाठ यांनी माझा हात धरून लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले. त्यावर तुमच्या नव-याची नोकरी घालवतो व तुमच्यावर जातीवाचक शिवीगाळ केल्याचा खोटा गुन्हा दाखल करतो असा दम दिला. या फिर्यादीवरुन पोलीसांनी भास्कर शिरसाठ यांच्या विरुध्द विनयभंगाचा गुन्हा बुधवार (ता.३०)  दाखल केला आहे. पुढील तपास हवालदार बाळासाहेब ताके करीत आहेत.

संपादन - सुस्मिता वडतिले 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Hatkanangale: निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या राजू शेट्टींना चित्रपटात काम करावसं का वाटलं? जाणून घ्या

Gulabrao Patil: भाजपवाल्यांनी काम केलं नाही तर आम्ही... गुलाबराव पाटलांच्या वक्तव्यामुळे BJP कार्यकर्त्यांमधे संभ्रम

Bajrang Punia Suspended : बजरंग पुनियाचे स्वप्न भंगले... डोपिंग टेस्ट न केल्याने निलंबित

Summer Fashion Tips : उन्हाळ्यात कूल आणि स्टायलिश दिसायचंय? मग, अशा प्रकारच्या कलर पॅटर्न्सची करा निवड

Raju Shetti in Hatkanangale: 'राजकारणात यायचं म्हणजे गेंड्याची कातडी लागते'; राजकारण की चळवळ, राजू शेट्टींची कशाला पसंती?

SCROLL FOR NEXT