Unknown person set fire to the BJP leader's vehicles in sangamner
Unknown person set fire to the BJP leader's vehicles in sangamner esakal
अहमदनगर

संगमनेर : अज्ञात व्यक्तीने जाळली भाजप नेत्याची लाखोंची वाहने

सकाळ वृत्त सेवा

संगमनेर (जि. अहमदनगर) : संगमनेर शहर पोलिस ठाण्याजवळील नगरपालिका क्रीडा संकुल परिसरातील अभंग मळा या दाट लोकवस्तीत राहणारे भाजपाच्या (BJP) ओबीसी (OBC) मोर्चाचे शहराध्यक्ष संपतराव गलांडे यांच्या राहत्या घरासमोर उभ्या केलेल्या दोन दुचाकींसह एका चारचाकी वाहनाला, पहाटेच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने आग लावली. या घटनेत तिन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. सुदैवाने या घटनेत जागरूक नागरिकांमुळे आग आटोक्यात आल्याने जीवित वा वित्त हानी झाली नाही. या बाबत अधिक माहिती अशी....

भाजपाच्या ओबीसी मोर्चाचे शहराध्यक्ष संपतराव गलांडे यांचे अभंग मळा परिसरातील दाट लोकवस्तीत निवासस्थान आहे. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही (CCTV) फुटेजची पडताळणी करुन हाती काही धागेदोरे लागतात का याची तपासणी केली असता; घराबाहेर उभी केलेली चारचाकी (MH-17-AZ-6093) तसेच (MH-42-AC-9264) व केटीएम (MH-17-CK-3163) या दोन महागड्या दुचाकींवर अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणास्तव तीव्र ज्वालाग्रही द्रवपदार्थ शिंपडून जाणीवपूर्वक आग लावल्याचा प्राथमिक निष्कर्ष पोलिसांनी काढला आहे. आग लागल्याचे समजताच परिसरातील नागरिकांनी गलांडे कुटूंबियांना जागे करुन घटनेची माहिती दिली. स्थानिकांसह नगरपरिषदेच्या अग्निशामक दलाने आग आटोक्यात आणली. या घटनेत गलांडे यांचे सुमारे 11 लाखांचे नुकसान झाले असून, हा घातपाताचा प्रकार असल्याची शक्यता व्यक्त होत आहे.

या प्रकरणी संपत रामचंद्र गलांडे ( वय 45 ), रा. अभंग मळा यांनी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिस निरीक्षक मुकुंद देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक पंकज शिंदे पुढील तपास करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

S Jaishankar: "फक्त आरोप करता, पुरावे द्या...", कॅनडात 3 भारतीयांच्या अटकेला भारताचे चोख उत्तर!

Chinmay Mandlekar: "मला वाटलं ते मुस्काटात मारतील..."; चिन्मय मांडलेकरनं सांगितला रजनीकांत यांच्या भेटीचा किस्सा

Banmeet Narula: डार्क वेबद्वारे ड्रग्ज विकणारांना ईडीने उचलले; 130 कोटी रुपयांचे बिटकॉईन जप्त

तुम्‍ही सत्तेत असताना इथले उद्योग गुजरातला का गेले? नारायण राणेंच्या प्रचारसभेत राज ठाकरेंचा उद्धव यांना थेट सवाल

Latest Marathi News Live Update : "पंतप्रधान मोदी यांच्या हातात देश, सीमा आणि सैनिक सुरक्षित नाहीत," समाजवादी पक्षाचा हल्लाबोल

SCROLL FOR NEXT