We will set up a covid center in Akola but where to bring a doctor
We will set up a covid center in Akola but where to bring a doctor 
अहमदनगर

अकोल्यात कोविड सेंटर उभारू पण डॉक्टर आणायचे कोठून

शांताराम काळे

अकोले ः तालुक्‍यात कोविड सेंटर उभारणे गरजेचे असले, तरी त्यासाठी आरोग्य अधिकारीच उपलब्ध नाहीत. त्यामुळे कोविड सेंटर सुरू करणे शक्‍य नसल्याचे तहसीलदार मुकेश कांबळे यांनी सांगितले. 

तालुक्‍यात कोरोनाबाधितांची संख्या हजारच्या पार होत असताना तातडीने कोविड सेंटर उभारणे गरजेचे आहे. तालुक्‍यातील पत्रकारांनी याबाबत तहसीलदार कांबळे यांच्याशी संवाद साधला.

कांबळे म्हणाले, ""समशेरपूर, राजूर, शेंडी येथे अँटीजेन टेस्ट सुविधा असून, इतर ठिकाणी लवकरच ही सुविधा उपलब्ध करणार आहोत. "माझे कुटुंब, माझी जबाबदारी' मोहिमेत तालुक्‍यातील नागरिकांची तपासणी केली जाणार आहे.

तालुक्‍यात एकाच वेळी 50 कुटुंबांची तपासणी केली जाणार आहे. मास्क न वापरल्यास कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. सध्या तालुक्‍यात पुरेसे बेड्‌स उपलब्ध आहेत. अगस्ती कारखाना अजून 50 बेड्‌सची सोय करणार आहे.

नागरिकांनी नियमांचे पालन करावे.'' 
व्यापाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने व्यवसाय बंद ठेवून चांगले सहकार्य केले. अकोले शहरात लवकरच निर्जंतुकीकरण करणार असल्याचे कांबळे यांनी सांगितले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalgaon Major Accident: भरधाव कारच्या धडकेत मजुरी करण्याऱ्या आईसह दोन चिमुकले ठार!

IPL 2024 DC vs RR : दिल्लीचा राजस्थानला दणका, घरच्या मैदानात मिळवला दणदणीत विजय; संजू सॅमसनचे अर्धशतक व्यर्थ

Virtual Touch: बालकांना 'व्हर्च्युअल स्पर्शा'च्या धोक्याची जाणीवही करुन देणं गरजेच - हायकोर्ट

Navneet Rana: "काँग्रेसला मत देणं म्हणजे थेट पाकिस्तानला मत देणं"; नवनीत राणांचं वादग्रस्त विधान

यवतमाळ जिल्हा कारागृहातील धक्कादायक घटना; कारागृहातील अधिकारी, कर्मचाऱ्यावर कैद्यांच्या टोळीचा हल्ला

SCROLL FOR NEXT