Ad. Prakash Ambedkar
Ad. Prakash Ambedkar sakal
अकोला

Ad. Prakash Ambedkar : मोदींच्या कार्यकाळात 17 लाख कुटुंबांनी देश सोडला

योगेश फरपट

अकोला - देशात 2014 साली भाजप आणि संघाचे विचाराचे सरकार आले. तत्पूर्वी या शासनाने भारतवासीयांना अनेक खोटे आश्वासन दिले. सत्तेत आल्यानंतर अनेकांची मुस्कटदाबी केली. मोदींच्या हुकूमशाही वृत्तीला कंटाळून देशातील 17 लाख कुटुंबीयांनी भारत देश सोडला, भारताचे नागरिकत्व सोडले असा खळबळजनक आरोप वंचित बहुजन आघाडी राष्ट्रीय नेते एड. प्रकाश आंबेडकर यांनी केला. अकोट येथील प्रचार सभेत ते बोलत होते.

त्यांनी सांगितले की, मोदी यांनी सर्वसामान्यांचे शोषण केले आणि मोठमोठे उद्योगपत्यांना संरक्षण दिले. 2014 नंतर भारतातील किती लोकांनी देश सोडला ? असा प्रश्न जेव्हा विचारण्यात आला होता तेव्हा उत्तरात ही धक्कादाय माहिती उघड झाली अशी माहिती त्यांनी आज प्रचार सभेत दिली.

मोदी सरकारने शेतकऱ्यावर अन्याय केला आहे. आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना चिरडून मारले. आजही शेतकरी दिल्लीत आपल्या हक्कासाठी आंदोलन करीत आहेत. शेतकऱ्यावर एवढी वाईट अवस्था आजपर्यंत कोणत्या पंतप्रधानांच्या कार्यकाळात आली नाही, असही त्यांनी सांगितले.

भारतातील लोक देश सोडून दुसऱ्या देशात का स्थायिक होत आहे. आपल्या देशातील हुशार तरुण मुले दुसऱ्या देशात नोकरीसाठी का जातात याचा आपण गांभीर्याने विचार करायला पाहिजे. 2014 पासून भारतातील नागरिक, शेतकरी, शेतमजूर, वंचित, शोषित, महिला हा अन्याय सहन करीत आहेत. आता हे सरकार उखळून फेकण्याची वेळ आली आहे. तेव्हा सर्वांनी एकजुटीने हुकूमशाही वृत्तीचा निषेध करून वंचित बहुजन आघाडीला साथ द्यावी असे आवाहन अँड आंबेडकर यांनी केले.

भाजपचा उमेदवार मुका- बहिरा - डॉ.दातकर

अकोला लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाने दिलेला उमेदवार हा मुका बहिरा आहे. त्याला राजकारणाचा अजिबात अनुभव नाही, फक्त घराणेशाही चालवण्यासाठी हा उमेदवार आपल्यावर लादला आहे. तसेच काँग्रेसने दिलेला उमेदवार हा कट्टर संघाशी व विश्व हिंदू परिषदेची नाळ जुळलेला आहे.

सर्वांनी जागरूक राहून एडवोकेट प्रकाश आंबेडकर यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे असे आवाहन काँग्रेसचे ज्येष्ठ नेते डॉ. पुरुषोत्तम दातकर यांनी केले. ते म्हणाले मी कट्टर काँग्रेसी आहे आणि मी काँग्रेस पक्षातच आहे. परंतु बाळासाहेबांच्या समर्थनार्थ मी वंचितच्या व्यासपीठावरून बोलत आहे. माझ्या पक्षाने माझ्यावर काहीही कारवाई केली तरी चालेल, मात्र बाळासाहेबांचे समर्थन केल्याशिवाय राहणार नाही असे ते म्हणाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Rain Updates : पुण्यात पावसाचा उद्रेक! कुठे झाडं कोसळली, कुठे पत्रे उडाले तर अनेक रस्त्यांवर पाणीच पाणी

Pune Porsche Crash : कल्याणीनगर अपघातापूर्वी अन् नंतर नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण घटनाक्रम

Mumbai Lok Saha Election : मुंबईत अनेक ठिकाणी संथगतीने मतदान! कळवा-मुंब्र्यात अनेकजण मतदान न करताच परतले

Lok Sabha Election: कल्याण पश्चिम, भिवंडी मतदारसंघात निवडणूक आयोगाचा सावळा गोंधळ; मतदार यादीतून हजारो नागरिकांची नावं गायब

'शरद पवारांनी भाजपला पाठिंबा दिला होता, ती जर सुपारी होती तर आमचीही..'; आव्हाड, राऊतांच्या टीकेला मनसे आमदाराचं प्रत्युत्तर

SCROLL FOR NEXT