

आज राज्यात पाचव्या टप्प्यात मतदान पार पडलं. आज मुंबईत अनेक ठिकाणी संथ गतीने मतदान प्रक्रिया पार पडत असल्याचे दिसून आले. दरम्यान या निवडणूक प्रक्रियेत अनेक मतदारांचे नाव मतदार यादीतून वगळ्याचेही निदर्शनास आले आहे. भिवंडीसह कल्याण पश्चिममध्ये अनेक मतदारांचे नाव यादीतून वगळ्याचे समोर आले आहे.
कल्याण पश्चिम आणि भिवंडी मतदारसंघात निवडणूक आयोगाचा सावळा गोंधळ समोर आला आहे. मतदार यादीतून हजारो नागरिकांची नावं गायब असल्याचा प्रकार समोर आला आहे. यादीत नावे नसल्याने मतदाराकडून संताप व्यक्त केला जात आहे. अमेरीकेहून खास मतदानासाठी आलेल्या व्यक्तीचं नाव मतदार यादीत नसल्याने संताप व्यक्त केला आहे.
काही ठिकाणी ईव्हीएम मशीन बंद पडल्यामुळे काही काळ मतदान बंद पडलं होतं. काही ठिकाणी मतदानकेंद्रांवर प्रचंड दिरंगाई केला जात असल्याचा आरोप केला गेला. कारण नागरीक तासंतास मतदानासाठी रांगेत उभे राहिल्याचा प्रकार समोर आला आहे. मतदार यादीमधून हजारो नागरिकांची नावे गायब असल्याचा प्रकार समोर आला आहे. याआधी दोन-तीन वेळा मतदान केले त्या मतदारांचं देखील नाव निवडणुकीच्या यादीतून गायब आहे. त्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. तर नाव वगळण्यापुर्वी कल्पना द्यायला हवी होती असंही मतदारांनी म्हटलं आहे.
हजारो नागरिकांची नावे मतदार यादीतून अचानक गायब झाल्याने मतदानासाठी आलेल्या मतदारांनी संताप व्यक्त केला आहे. सकाळी अनेक जण मतदानासाठी मतदान केंद्रवर पोहोचले मात्र मतदार यादीत त्यांचे नाव सापडत नसल्याने त्यांनी इतर जवळच्या केंद्रवरतीही याद्या तपासल्या. मतदारांनी अनेकदा त्या मतदार याद्या त्यांनी डोळ्याखालून घातल्या. मात्र नाव न दिसून आल्याने या नागरिकांनी आपली नाराजी व्यक्त केली.
तर काही जण अमेरिकेवरून मतदानासाठी आले होते, त्यांनी देखील यावेळी संताप व्यक्त करत आमचे नाव मतदार यादीतून काढण्याआधी आम्हाला एकदा कळवायला हवं होतं असं म्हटलं आहे.
अवधूत दातार नावाचा मतदार अमेरिकेहून कल्याणमध्ये फक्त मतदानासाठी आला होता. मात्र सकाळी त्याचं नाव मतदार यादीत नसल्याचे आढळले. आज सकाळपासून तो अनेक मतदान केंद्राच्या फेऱ्या मारत आपलं नाव शोधतोय. मात्र अखेर त्याचं नाव कुठेच नसल्याने त्याची निराशा झाली. याबाबत नागरिकांनी प्रचंड संताप व्यक्त केला. हीच लोकशाही आहे का? असा सवाल त्यांनी व्यक्त केला आहे
मुंब्रासह अनेक ठिकाणी मतदान संथगतीने सुरू होते. मतदान केंद्रावर लांबच लांब रांगा लागल्या होत्या. त्यामुळे मतदारांना तासन्तास मतदान केंद्रावर ताटकळत बसावं लागलं. त्यामुळे मतदार परत जाण्याची शक्यता होती. त्यामुळे आज सायंकाळी सहा पर्यंत जे मतदार मतदान केंद्रावरील रांगेत असतील त्या सर्वांना मतदानाचा हक्क बजावता येईल, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.