Crop damage
Crop damage  sakal
अकोला

अवकाळीमुळे शेतकऱ्यांचे २१ कोटींचे नुकसान; ९ हजार १५२ क्षेत्रावर हानी; चार तालुक्यातील ७२७ गावे प्रभावित

सकाळ वृत्तसेवा

Akola News : जिल्ह्यात २६ फेब्रुवारी २०२४ रोजी रात्री उशीरा अचानक अवकाळी पावसासह गारपिटी झाली होती. त्यामुळे रब्बी पिकांचे मोठे नुकसान झाले. अवकाळी व गारपिटीचा चार तालुक्यातील ७२७ गावांतील ११ हजार ८०७ शेतकऱ्यांचे नुकसान झाले.

त्यासोबतच अवकाळीचा नऊ हजार १५२.१२ हेक्टरला फटका नसल्याने बळीराजाचे २१ कोटी १० लाख ३१ हजार ४८२ रुपयांचे नुकसान झाले. या नुकसानीचा संयुक्त अहवाल जिल्हा प्रशासनाने शासनाकडे पाठवला आहे.

२४ फेब्रुवारी रोजी पूर्व विदर्भातील यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यात तर २५ आणि २६ फेब्रुवारीला विदर्भातील जवळ-जवळ सर्व जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला होता. त्यानुसार २६ फेब्रुवारी २०२४ रोजी रात्री उशीरा उशीरा जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला. तेल्हारा, अकोट, बाळापूर आणि अकोला तालुक्याला वादळी वाऱ्यासह गारपिटीने झोडपले. गव्हाचे पीक आडवे झाले. सोंगणीला आलेली तूर पावसामु‌ळे भिजली.

त्यामुळे पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेला घास हिरावला गेला. नुकसानग्रस्त क्षेत्राचे महसूल, कृषी व ग्रामविकास विभागाकडून संयुक्त पंचनामे करण्यात आले. त्यामुळे नुकसानीचा अंतिम अहवाल तयार झाला असून शेतकऱ्यांचे २१ कोटी १० लाख ३१ हजार ४८२ रुपयांचे नुकसान झाले असून नुकसानीचा अहवाल शासनाकडे पाठवण्यात आला आहे.

असे झाले नुकसान

जिरायती क्षेत्र ः अवकाळी पावसामुळे फळ पिके सोडून दोन हजार ७५५ हेक्टरवरील जिरायती पिकांचे नुकसान झाले. ६७ गावांतील ३ हजार ५८४ शेतकऱ्यांना फटका बसला असून ३ कोटी ७४ लाख ६९ हजार ६३२ शेतकऱ्यांचे नुकसान झाले.

बागायती क्षेत्र ः अवकाळीमुळे १८३ गावांतील ८ हजार १०३ शेतकऱ्यांचे सहा हजार ३०३ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. १७ कोटी १९ लाख ४५० रुपयांची हानी झाली.

फळ पिकाखालील क्षेत्र ः अवकाळीमुळे २२ गावांतील १२० खातेदारांचे नुकसान झाले. ९३.६५ हेक्टवरील ३३ लाख ७१ हजार ४०० रुपयांचा फटका शेतकऱ्यांना बसला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: महाराष्ट्रात मतदारांमध्ये अनुत्साह, अकरा वाजेपर्यंत अवघे 16 टक्के मतदान

Onion Garlands During Voting: गळ्यात टोमॅटो-कांद्याच्या माळा घालून मतदान; नाशिकमध्ये युवा मतदारांची चर्चा

Bangladesh MP Missing: भारतात आलेला बांगलादेशचा खासदार 3 दिवसांपासून बेपत्ता; कुटुंबाकडून चिंता व्यक्त

RSS नंतर आता दिग्विजय सिंह यांनी CM योगींचे केले कौतुक मात्र मोदींवर खोचक टीका, नेमकं काय म्हटलं वाचा...

Healthy Tips: आता कमी वयातच पोटाचा वाढतोय घेर, जास्त चरबीमुळे हृदयविकार, मधुमेह, आजारांना निमंत्रण

SCROLL FOR NEXT