अकोला

बालकांमध्ये कोविड प्रतिबंधासाठी बालरोग तज्ज्ञांचे कार्यदल

सकाळ वृत्तसेवा

अकोला ः लहान बालकांमध्ये कोरोना संसर्गाच्या (Corona infection in children) प्रादुर्भावापासून बचाव, प्रतिबंधात्मक उपाययोजना व उपचार पद्धतीबाबत मार्गदर्शन करण्यासाठी बालरोग तज्ज्ञांचे विशेष कार्यदल (Special task force of pediatricians) (टास्क फोर्स) स्थापन करण्याचे आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी निर्गमित केले आहेत. या कार्यदलात १८ तज्ज्ञांचा समावेश आहे. (A team of pediatricians for corona prevention in children in Akola)

या कार्यदलाचे अध्यक्ष स्वतः जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर असून अन्य सदस्यांत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. मिनाक्षी गजभिये, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजकुमार चव्हाण, जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश आसोले, बाल रोगतज्ज्ञ अकोला ॲकेडमी ऑफ पेडीयाट्रीक तथा सदस्य सचिव डॉ. विनीत वरठे, डॉ. मनोज ठोकळ, डॉ. अनुप जोशी, डॉ. अंजली सोनोने, डॉ. एस.एस. काळे, डॉ. नरेंद्र राठी, डॉ. अनुप कोठारी, डॉ. नरेश बजाज, डॉ. विजय आहुजा, डॉ. पार्थसारथी शुक्‍ला, डॉ. किशोर ढोले, डॉ. अभिजीत नालट, डॉ. आशुतोष पालडीवाल, डॉ. शिरीष देशमुख, डॉ. विशाल काळे यांचा सदस्य म्हणून समावेश करण्यात आला आहे.

कोविड संसर्गावर आळा घालण्याची जबाबदारी
गठित करण्‍यात आलेल्‍या टास्‍क फोर्स समितीने कोविड संसर्गजन्‍य आजारावर आळा घालणे बाबत आवश्‍यक त्‍या प्रतिबंधात्‍मक उपाययोजना कराव्‍यात. या रोगाने ग्रस्‍त, गंभीर व अतिगंभीर रुग्‍णांच्‍या बाबतीत रुग्‍ण व्‍यवस्‍थापन संहिता, योग्‍य औषधोपचार, कोविड रुग्‍णालयात विशेषज्ञ डॉक्‍टर व पॅरामेडीकल स्‍टाफ यांची आवश्‍यकता इत्‍यादी सुनिश्चित करण्‍याकरीता स्‍थानिक प्रशासनाच्‍या मदतीने त्‍यांची अंमलबजावणी करण्‍यात यावी. तसेच प्रमुख बाल रोगतज्ज्ञ तथा सदस्‍य सचिव यांनी गठित करण्‍यात आलेल्‍या टास्‍कफोर्सची वेळोवेळी बैठक घेणे तसेच सर्व संबंधितांशी समन्‍वय साधून आवश्यक ती कार्यवाही करावी, असे या आदेशात नमूद करण्यात आले आहे.

संपादन - विवेक मेतकर

A team of pediatricians for corona prevention in children in Akola

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024, KKR vs DC Live Score: दिल्लीने गमावली नववी विकेट, 150 धावांचा टप्पा गाठणार?

Covid 19 : कोविडची पहिली लस बनवणाऱ्या शास्त्रज्ञावर चीनची मोठी कारवाई; भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे केलं बरखास्त

Govinda Dance: गोविंदानं डान्स करुन केला धैर्यशील मानेंचा प्रचार; व्हिडिओ पाहा

Viral Video: गिल लावत होता फिल्डिंग अन् विराटने अचानक येऊन दिला जोरात धक्का, GT vs RCB सामन्यावेळी काय झालं पाहा

Latest Marathi News Live Update : देशाला हुकुमशाहा सरकारची गरज नाही; उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

SCROLL FOR NEXT