Prakash Ambedkar
Prakash Ambedkar Sakal
अकोला

Dhammachakra Pravartan Din : शहरात संस्कृती, परंपरेसोबत वंचित बहुजन आघाडीचे राजकीय बळाचे दर्शन

सकाळ वृत्तसेवा

अकोला - धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्ताने अकोला शहरातून भारतीय बौद्ध महासंघ व वंचित बहुजन आघाडीच्या वतीने भव्य मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीतून बहुजन समाजातील परंपरा, संस्कृतीसोबतच लोकलभा निडणुकीच्या पार्श्वभूमीवर वंचितची राजकीय बळाचेही दर्शन घडले. मिरवणुकीतील आकर्षक देखावे, झाँक्या, आणि स्वंयशिस्तने अकाेलेकरांचे लक्ष वेधून घेतले हाेते.

अकाेल्यात सन १९८४ पासून धम्मचक्र प्रवर्तन दिनाचे आयोजन विजयादशमीच्या दुसऱ्या दिवशी केले जाते. भारतीय बौद्ध महासंघाच्या वतीने धम्म मेळावा आयाेजित केला जातो. त्यात लाखो नागरिकांची उपस्थिती असते. दुपारी मिरवणूक काढून या उत्सवाची सुरुवात होते. त्यानंतर रात्री अकोला क्रिकेट क्लबवर जाहीर सभा होते.

ज्यात ॲड. प्रकाश आंबेडकर हे समाजाला दिशा देण्याचे काम करीत आले आहे. यावर्षी विशाल मिरवणूक, अनुयायांचा ओसंडून वाहणारा उत्साह, आकर्षक देखावे, झाँक्या, घोडे, स्वंयशिस्त समूह, भारतीय बौद्ध महासभेचे शिस्तबद्ध आयोजन, समता सैनिक दलाचे पथसंचालन, विविध समाज घटक सहभागी झाल्याने ही मिरवणूक अधिक लक्षवेधी ठरली.

ॲड. प्रकाश आंबेडकर, सुजात आंबेडकर आणि वंचित बहुजन आघाडी व भारतीय बौद्ध महासभेचे पदाधिकारी,कार्यकर्ते, युवक-युवतींची लेझिम पथके, लाठी-काठी खेळत महिलांनी जयभीमचा गजर केला.

फ्लेक्स, स्वागत कमानींनी वेधले लक्ष

अकाेट स्टँड, टिळक राेड, गांधी राेड, टाॅवर चाैक या भागात प्रामुख्याने धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या शुभेच्छा देणाऱ्या फलकांच्या माध्यमातून युवकांकडून शक्तीप्रदर्शन करण्यात आले. दरवर्षी धम्म मेळावा हाेणाऱ्या अकाेला क्रिकेट क्लब मैदानावर विविध साहित्य विक्रीची दुकाने थाटण्यात येतात.

या पुस्तके, महापुरुषांच्या मूर्तीं, खाद्य पदार्थांसह अन्य वस्तूंचा समावेश असताे. मात्र यंदा मेळाव्याला जादा गर्दी हाेणार हे, लक्षात घेऊन दुकाने मैदानाबाहेर रस्त्याच्या कडेला लावण्यात आली.

चौका-चौकात स्वागत

मिरवणुकीच्या स्वागतासाठी चौका-चौकात देखावे तयार करण्यात आले होते. अकोला क्रिकेट मैदावर जाहीर सभा होणार असल्याने टॉवर चौकात साकारण्यात आलेले देखावे विशेष आकर्षण ठरले.

विविध समाजांकडून स्वागत

श्रीराम उत्सव समिती, श्रीराम सेना, जिल्हा अखिल भारतीय ब्राम्हण महासंघ, जिल्हा धनगर समाज संघटनांकडून स्वागत करण्यात आले. सकल मराठा समाज, बंजारा समाज, धनगर समाज संघटनाही सहभागी झाल्या होत्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोन जणांचा जीव घेऊनही आरोपी का सुटला? कायदा काय सांगतो? कायदेतज्ज्ञांनी सांगितल्या तरतुदी

Lok Sabha Election 2024 : दिव्यात निवडणूक आयोगाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर; मतदारांत तीव्र संताप

Nashik Lok Sabha: नाशिकमध्ये आमदार देवयानी फरांदे माजी आमदार वसंत गीतेंमध्ये वाद; बूथवर उडाला गोंधळ

IPL 2024: 'मला फक्त शेवटची संधी द्या...', RCB कडून खेळणाऱ्या स्वप्नील सिंगला व्यक्त होताना अश्रु अनावर

Pune Rain Updates : पुण्यात पावसाचा उद्रेक! कुठे झाडं कोसळली, कुठे पत्रे उडाले तर अनेक रस्त्यांवर पाणीच पाणी

SCROLL FOR NEXT