akola
akola sakal
अकोला

Akola : मनपातील दिव्यांगांच्या योजनांना निधीचे ‘ग्रहण’

मनोज भिवगडे

अकोला : महानगरपालिकेच्या दिव्यांग कक्षातर्फे राबविण्यात येणाऱ्या अनेक महत्त्वाकांक्षी योजनांना निधी अभावी स्थगित करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे योजनांच्या लाभापासून शेकडो दिव्यांग विद्यार्थी व खेळाडू वंचित आहेत. निधी नसल्याने काही प्रमुख योजना तत्कालीन आयुक्तांनी स्थगित केल्या आहेत.

महानगरपालिका दिव्यांग कक्षातर्फे विविध योजना राबविण्यात येतात. त्यात काही योजना या थेट आर्थिक लाभाच्या आहेत, तर काही योजना या शिष्यवृत्तीच्या रुपाने राबविल्या जातात. मनपातर्फे ता. १ ऑक्टोबर २०१४ पासून दिव्यांगांची नोंदणी सुरू करण्यात आली आहे. त्यानुसार आजपर्यंत एकूण तीन हजार ६१३ दिव्यांगांची नोंद मनपाकडे करण्यात आली आहे. या दिव्यांगांना मनपातर्फे उदरर्निवाह भत्ता‍ म्हणून दर महिन्याला एक हजार २०० रुपये थेट लाभार्थ्यांच्या खात्‍यात जमा केले जाते.

या योजनेतून सप्टेंबर २०२१ पर्यंत एकूण दोन हजार ४३८ लाभार्थ्यांनी मागणी केली आहे. त्यासाठी २९ लाख २५ हजार ६०० रुपये खर्च अपेक्षित आहे. या शिवाय दिव्यांगांकरिता विवाह अनुदानाचेही वाटप केले जाते. या योजनेतून लाभार्थ्यांना प्रत्येकी २० हजार रुपये आर्थिंक सहाय्य केले जाते. या दोन योजनांशिवाय दिव्यांग खेळाडूंकरिता वार्षिक शिष्यवृत्ती व दिव्यांग विद्यार्थ्यांकरिता शिष्यवृत्ती या योजनाही मनपातर्फे राबविल्या जातात. मात्र, या दोन्ही योजना निधी अभावी स्थगित करण्यात आल्या आहेत.

दिव्यांग खेळाडूंना जिल्हास्तरासाठी एक हजार, राज्य स्तरासाठी दोन हजार ५००, राष्ट्रीय स्तरासाठी पाच हजार तर आंतरराष्ट्रीय स्पर्धेकरिता १० हजार रुपये वार्षिक शिष्यवृत्ती देण्याची योजना आहे. दिव्यांग विद्यार्थीकरिता वार्षिक शिष्यवृत्ती योजनाही मनपातर्फे राबविणे अपेक्षित आहे. या योजनेतून पहिली ते पाचवी पर्यंत वर्षाला एक हजार, सहावी ते आठवीपर्यंत दोन हजार, अकरावी, बारावीपर्यंत पाच हजार तर त्यापुढील शिक्षणासाठी वार्षिक दहा हजार रुपये शिष्यवृत्ती दिली जाते. मात्र, निधीच नसल्याने ही योजना स्थगित करण्यात आली आहे. त्यामुळे महानगरपालिका क्षेत्रातील दिव्यांग विद्यार्थ्यांना या योजनेपासून वंचित रहावे लागत आहे.

मंजूर निधीपेक्षा अधिक खर्च

अकोला महानगरपालिकेमध्ये दिव्यांग कक्षामार्फत दिव्यांग उदरर्निवाह भत्यावर २९ लाख २५ हजार ६०० रुपये सप्टेंबर २०२१ पर्यंत खर्च अपेक्षित होता. प्रत्यक्षात एक कोटी ४४ लाख ४२ हजार रुपये खर्च झाला आहे. विवाह अनुदानावर एक लाख ८० हजार खर्च झाला आहे. सन २०२०-२१ मध्ये एक कोटी ३० लाख रुपये तरतुद करण्यात आली होती. प्रत्यक्षात त्यापैकी एक कोटी ३१ लाख ७१ हजार २८७ म्हणजे तरतुदीपेक्षा एक लाख ७१ हजार २७८ रुपये अधिक खर्च मार्च २०२१ अखेर झालेला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Salary Hike: आनंदाची बातमी! यावर्षी कर्मचाऱ्यांची होणार 12 टक्क्यांपर्यंत पगारवाढ; अहवालात माहिती उघड

Revoting: दोन गटांतील हाणामारीत 'ईव्हीएम'ची तोडफोड, 'या' राज्यात फेरमतदानाला सुरूवात

Latest Marathi News Live Update: ठाकरे गटाचे उमेदवार आज दाखल करणार अर्ज

Sangli Lok Sabha: "विशाल पाटलांवर शिवसेनेचा अन्याय"; भाजपचे केंद्रीय मंत्री काय बोलून गेले...

World Hunger : काही देशांच्या युद्धामुळे जगभरात वाढले उपासमारीचे संकट; काय आहे परिस्थिती?

SCROLL FOR NEXT