Online Fraud
Online Fraud sakal
अकोला

Fraud News : सावधान! वीज देयकाच्या नावावर फसवणूक

सकाळ वृत्तसेवा

वीज बिल थकीत आहे असे फोनवरून सांगून बिल‎ भरण्यासाठी एक ॲप डाऊनलोड करायला लावले.‎

अकोला - वीज बिल थकीत आहे असे फोनवरून सांगून बिल‎ भरण्यासाठी एक ॲप डाऊनलोड करायला लावले.‎ नंतर एक रुपया पाठवून खातरजमा करायला‎ लावली व नंतर एकापाठोपाठ दोनदा खात्यातून चार लाख ९७ हजार ३७ रुपये परस्पर काढल्याचे मेसेज‎ आले. हा धक्कादायक प्रकार अकोला येथील एका अडत‎ दुकानदारासोबत घडला. अशा प्रकारे फसवणूक झाल्याची ही महिनाभरातील ही दुसरी‎ घटना आहे.

महावीर बंसीलाल जैन (वय ५८ रा. न्यू‎ राधाकिसन प्लॉट अकोला) हे त्यांच्या जुना कॉटन‎ मार्केटमधील अडत दुकानात दुपारच्या सुमारास‎ बसले होते. त्यांच्या मोबाइलवर एक फोन आला.‎ आपले थकीत वीज बिल त्वरित भरा नाही तर‎ वीजपुरवठा बंद करण्यात येईल, असे समोरचा‎ म्हणाला. त्यानंतर त्याने ऑनलाइन वीज बिल‎ भरण्यासाठी मोबाइलमध्ये प्ले स्टोअरमध्ये जाऊन‎ टीम व्हिवर क्विक सपोर्ट या नावाचे अॅप‎ डाऊनलोड करण्यासाठी सांगितले. त्यानुसार‎ महावीर जैन यांनी ते अॅप डाऊनलोड केल्यानंतर‎ त्यांना एक लिंक पाठवली.

सदर लिंकवर क्लिक केले‎ असता मर्चंट नावाचे पेज उघडले. या‎ पेजवरून वीज बिल पेमेंट करू शकतो व ते चेक‎ करण्यासाठी अगोदर एक रुपया पाठवा, असे‎ सांगितले. त्यावरून जैन यांनी त्यांच्या एचडीएफसी‎ बँकेच्या नेट बँकिंगच्या माध्यमातून एक रुपया‎ पाठवला. त्यानंतर थोड्या वेळाने त्यांच्या‎ मोबाइलवर ऑनलाइन व्यवहाराकरिता लागणाऱ्या‎ संमती बाबत मेसेज आला. त्या मेसेजला क्लिक‎ केले असता अचानक त्यांच्या खात्यातून दोन लाख‎ ९७ हजार ५८ रुपये व एक लाख ९९ हजार ९७६ रुपये‎ वजा झाल्याबाबत एका पाठोपाठ एक असे दोन‎ मेसेज आले.

आपली फसवणूक झाल्याचे लक्षात‎ आल्यानंतर जैन यांनी सिटी कोतवाली पोलिस स्टेशन गाठले व तक्रार केली. पोलिसांनी बुधवारी‎ अनोळखी व्यक्तीविरुद्ध भादंवि ४२०, सहकलम ६६‎ (डी), माहिती तंत्रज्ञान कायदा २००० नुसार गुन्हा‎ दाखल केला आहे.‎

सायबर चोरट्यांची नजर तुमच्या खात्यावर

ज्यांचे वीज बिल थकीत आहे, त्यांचे‎ नाव, मोबाइल नंबर आणि बिलाच्या‎ रकमेचा आकडा सायबर चोरट्याकडे‎ कसा जातो. महावितरणच्या ग्राहकांची‎ माहिती ही केवळ महावितरणकडेच‎ असायला हवी. मात्र, इत्थंभूत माहिती‎ त्यांच्याकडे जातेच कशी, याचे कनेक्शन‎ पोलिस शोधणार का, कारण या घटना‎ वारंवार घडत आहेत. महावितरणचा डेटा‎ हॅक होतोय? की या यंत्रणेचेच यात काही‎ लागेबांधे आहेत, याचा तपास होण्याची‎ गरज आहे. सायबर चोरटे अशा खात्यावर नजर ठेवून राहत असल्याने महावितरणकडून आवश्यक उपाययोजना होणे आवश्यक आहे.‎

महावितरणची सायबर सुरक्षा कमकुवत‎

ज्यांचे वीज बिल थकीत आहे, त्यांचे‎ नाव, मोबाइल नंबर आणि बिलाच्या‎ रकमेचा आकडा सायबर चोरट्याकडे‎ कसा जातो. महावितरणच्या ग्राहकांची‎ माहिती ही केवळ महावितरणकडेच‎ असायला हवी. मात्र, इत्थंभूत माहिती‎ त्यांच्याकडे जातेच कशी, याचे कनेक्शन‎ पोलिस शोधणार का, कारण या घटना‎ वारंवार घडत आहेत. महावितरणचा डेटा‎ हॅक होतोय? की या यंत्रणेचेच यात काही‎ लागेबांधे आहेत, याचा तपास होण्याची‎ गरज आहे.‎

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Covaxin: कोव्हिशिल्डच्या गोंधळानंतर कोव्हॅक्सिन बनवणाऱ्या भारत बायोटेकचा मोठा दावा, वाचा काय म्हणाली कंपनी

SEBI Notice: अदानींना मोठा धक्का! समूहाच्या सहा कंपन्यांना सेबीकडून कारणे दाखवा नोटीस; काय आहे कारण?

राहुल गांधी रायबरेलीतून लोकसभेच्या रिंगणात, अमेठीचा उमेदवारही ठरला; अखेर शिक्कामोर्तब

T20 World Cup: टीम इंडियात ४ फिरकी गोलंदाज का घेतले? कर्णधार रोहित शर्माने दिलं स्पष्टीकरण

Latest Marathi News Live Update : देवेंद्र फडणवीस यांच्या बारामतीमध्ये आज दोन सभा

SCROLL FOR NEXT