Latest Marathi News Update : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

हासनचे खासदार प्रज्वल रेवण्णा यांच्या अश्लील व्हिडिओ प्रकरणामुळे राज्याच्या राजकारणात वादळ निर्माण झालंय.
Latest Marathi News Live Update
Latest Marathi News Live UpdateEsakal

...तर मोदींबरोबर गेलेलं का चालत नाही- अजित पवार

शिवसेनेबरोबर गेलेलं चालतं तर मग मोदींबरोबर गेलेलं का चालत नाही? दोन्ही पक्षांची विचारधारा जवळपास सारखीच होती, असं म्हणत अजित पवारांनी होणाऱ्या टीकेला उत्तर दिलं.

जीएसटी फक्त अदानींच्या फायद्याचा- राहुल गांधी

मोदी सरकाराचा जीएसटी फक्त अदानींच्या फायद्याचा आहे. २२ लोकांना मोदींनी जेवढा फायदा दिला तेवढा फायदा आम्ही शेतकऱ्यांचा करू, असं म्हणत राहुल गांधींनी भाजप सरकारवर निशाणा साधला. ⁠गरीब महिलांना आम्ही दरवर्षी आम्ही एक लाख रुपये देऊ, ⁠आदानीला लोखो करोड दिले तर ते बिघडत नाही पण गरीबंना एक लाख दिले की त्यांना त्रास होणार.. ⁠दारीद्रय रेषेच्या वर येईपर्यंत या कुटुंबांना/महिलांना एक लाख रुपये देत राहणार, असं राहुल गांधी पुण्यात म्हणाले.

आता मोदी ओबीसी असल्याचं सांगत नाहीत- राहुल गांधी

''नरेंद्र मोदी आधी सांगायचे मी ओबीसी आहे. जसा आम्ही जातनिहाय जनगणनेचा विषय काढला तेव्हापासून मोदी स्वतःच्या ओबीसी असण्यावर बोलत नाहीत. ⁠मोदी आता सांगतात फक्त दोन जाती आहेत... गरीब आणि श्रीमंत.'' अशा शब्दात राहुल गांधींनी पंतप्रधानांवर टीका केली.

मोदी कधीही शेतकरी, मजूर, बेरोजगारांविषयी बोलत नाहीत - राहुल गांधी

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कधीही शेतकरी, मजूर , बेरोजगारीविषयी बोलत नाहीत. पोर्ट, एअरपोर्ट, डीफेन्स सेक्टर सर्व त्यांनी आदानींना दिले आहे. पण यावर मिडीया देखील बोलत नाही. ⁠इलेक्टोरल बॉण्ड सुप्रीम कोर्टानं रद्द केले, पण त्यावरही मीडिया बोलत नाही, असंही यावेळी राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.

संविधानाला वाचवण्याची लढाई - राहुल गांधी

यंदाची लोकसभा निवडणूक ही संविधानाला वाचवण्याची लढाई आहे. ⁠इंडिया आघाडी संविधान वाचवण्यासाठी प्रयत्नशील आहे. तर मोदी आणि आरएसएस संविधान बदलण्याच्या तयारीत आहेत. ⁠मोदीजींनी संविधान संपवण्याचा घाट घातला आहे, अशा शब्दांत राहुल गांधींनी भाजपवर हल्लाबोल केला.

नसिम खान यांची पुण्यात काँग्रेसच्या व्यासपीठावर हजेरी

नाराज नसिम खान यांनी पुण्यात काँग्रेसच्या व्यासपीठावर हजेरी लावली. ⁠या ठिकाणी त्यांनी भाषणंही केलं. त्यामुळं नसिम खान यांची नाराजी दूर झाल्याची चर्चा आता सुरु झाली आहे. कारण काँग्रेसनं महाराष्ट्रातून एकही मुस्लिम उमेदवार दिला नाही त्यामुळं त्यांनी जाहीर नाराजी व्यक्त करत आपल्या स्टार प्रचारक पदाचा राजीनामा दिला होता. पण आज पुण्यात मविआचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांच्या प्रचार सभेला त्यांनी हजेरी लावली.

दक्षिण मुंबईतून शिवसेनेच्या यामिनी जाधव यांच्याकडून उमेदवारी अर्ज  दाखल

दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघाच्या महायुतीतील शिवसेनेच्या उमेदवार यामिनी जाधव यांचा निवडणूक अर्ज आज दाखल करण्यात आला. यापुर्वी महायुती शक्तिप्रदर्शन करत भव्य रॅली काढण्यात आली. यावेळी खासदार मिलिंद देवरा, कौशल्यविकास मंत्री मंगलप्रभात लोढा, विभागप्रमुख यशवंत जाधव तसेच महायुतीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पुण्याहून रावेरला जाणारी बस अजिंठा घाटात उलटली

पुण्याहून रावेरला जाणारी बस उलटल्याचा प्रकार समोर आला आहे, ही बस संभाजीनगर येथील अंजिंठा घाटात उलटली असून या अपघातात सात ते आठ प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. या दुर्घनटनेनंतर जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे

Rahul Gandhi Pune Sabha : राहुल गांधी यांच्या पुण्यातील सभेच्या वेळेत बदल; जाणून घ्या सविस्तर

पुणे : लोकसभा निवडणूक प्रचारासाठी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या जाहीर सभेचं आज पुण्यात आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान राहुल गांधी यांच्या सभेच्या वेळेत बदल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

- ⁠राहुल गांधी सभा स्थळी ६.३० वाजता येणार

- ⁠आधी राहुल गांधी ४.३० वाजता सभेच्या ठीकाणी येऊन ६ वाजता सभा संपवुन जाणार होते.

- ⁠आता राहुल गांधींची सभा सहा नंतर सुरु होईल

- ⁠सभेनंतर राहुल गांधी दिल्लीला जाणार

- ⁠पुणे विमानताळवरुन राहुल गांधी आधी कोरेगाव पार्क भागातील कॅानरॅड हॅाटेलवर जाणार

- ⁠कॅानरॅड हॅाटेल वरुन राहुल गांधी सभेच्या ठीकाणी येणार

- ⁠एसएसपीएमएस कॅालेजच्या मैदानावर होत आहे सभा

कल्याणमधून ठाकरे गटाचे नेते रमेश जाधवांनी भरला उमेदवारी आर्ज

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे माजी महापौर रमेश जाधव यांनी कल्याण येथून लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज भरला आहे. वैशाली दरेकर यांनी मंगळवारी उमेदवारी अर्ज भरल्यानंतर आता शुक्रवारी रमेश जाधव यांनी अर्ज भरल्याने नक्की उमेदवार कोण याची चर्चा सध्या होतेय.

मुंबईतील सहाही जागा महायुतीचे उमेदवार जिंकतील - एकनाथ शिंदे

मुंबई: शिवसेनेच्या उमेदवार यामिनी जाधव यांच्या उमेदवारीबाबत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माहिती दिली की, दक्षिण मुंबईच्या आमदार यामिनी जाधव यांनी उमेदवारी दाखल केली. त्यांना पाठिंबा देण्यासाठी हजारोंच्या संख्येने लोक उपस्थित होते. हा महायुतीचा मजबूत बालेकिल्ला आहे...गेली 10 वर्षे केंद्र सरकारने केलेले काम आणि आमच्या सरकारने 2 वर्षात केलेली कामे पाहाता मुंबईतील सहाही जागा महायुतीचे उमेदवार जिंकतील.

Chitra Wagh: "चित्रा वाघ यांनी माझी माफी मागावी,"

भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी शिवसेच्या (UBT) जाहिरातीत झळकलेल्या अभिनेते राज नयानी यांच्यावर ते पॉर्नस्टार असल्याचे आरोप केले होते. यानंतर अभिनेते राज नयानी यांनी वाघ यांनी माफी मागावी अन्यथा ते न्यायालयात जातील असा इशारा त्यांनी दिला.

Smriti Irani: किशोरी लाल शर्मा यांनी अमेठीमधून भरला अर्ज

काँग्रेस नेते किशोरी लाल शर्मा यांनी आगामी लोकसभा निवडणुकीसाठी अमेठीमधून केंद्रीय मंत्री स्मृती इरानी यांच्याविरोधात आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.

पोलीस गुंडांमध्ये चकमक

दिल्ली पोलिसांचे विशेष पथका आणि गुंडांमध्ये दिल्लीतील रोहिणी सेक्टर 10 मध्ये चकमक झाली. यावेळी पथकाने मोहम्मद फैजान नाव्याच्या आरोपीला अटक केली.

गणेश नाईक  नरेश म्हस्केंचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी जाणार

भाजप आमदार गणेश नाईक हे नरेश म्हस्के यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी जाणार असल्याचे वृत्तसमोर येत आहे. काल त्यांच्या गटाने नरेश म्हस्के यांच्या उमेदवारीला विरोध केला होता

सुप्रिया सुळे यांच्या प्रचारासाठी आईही मैदानात

सुप्रिया सुळे यांच्या प्रचारासाठी त्यांचा आई प्रतिभा पवार मैदानात उतरल्या आहेत. सुप्रिया सुळे यांच्या प्रचारासाठी प्रतिभा पवार आज लावणार महिला मेळाव्याला हजेरी लावणार आहेत.

मुंबई उत्तर पूर्व लोकसभा मतदारसंघात नऊ उमेदवारी अर्ज दाखल

लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी 28 -मुंबई उत्तर पूर्व मतदारसंघात आज नऊ उमेदवारांनी अर्ज दाखल केले असल्याची माहिती मुंबई उत्तर पूर्व मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. दादाराव दातकर यांनी दिली आहे.

Solapur News: सोशल मीडियावर बदनामी केल्या प्रकरणी काँग्रेस कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल

सोशल मीडियावर बदनामी केल्या प्रकरणी काँग्रेस कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोलापुरातील काँग्रेस कार्यकर्ते राज सलगर यांच्यावर फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. राम सातपुते आणि भाजप विरोधात मिम्स व्हायरल करून जनमाणसात प्रतिमा मलीन केल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रवींद्र वायकर आज उमेदवारी अर्ज भरणार

रवींद्र वायकर हे आज शक्ती प्रदर्शन करत महायुतीचे उमेदवार म्हणून उमेदवारी अर्ज भरणार आहेत.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आशिष शेलार अर्ज भरण्यासाठी वायकर यांच्यासोबत उपस्थित राहणार आहेत.

Sanjay Raut: सांगलीत भाजपचे दोन उमेदवार आमच्यासमोर- संजय राऊत

सांगलीत भाजपचे दोन उमेदवार आमच्यासमोर आहेत, अशी टीका ठाकरे गटाचे संजय राऊत यांनी केली आहे. पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

Devendra Fadanvis: देवेंद्र फडणवीस यांच्या बारामतीमध्ये आज दोन सभा

बारामती लोकसभा मतदारसंघात महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार आहेत. त्यांच्या प्रचारासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज दोन सभा घेणार आहेत.

Kapil Patil: आज कपिल पाटील उमेदवारी अर्ज दाखल करणार

महायुतीचे उमेदवार कपिल पाटील आज भिवंडी लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. यावेळी ते मोठं शक्तिप्रदर्शन करतील.

Election Commition: सुप्रिया सुळे अन् सुनेत्रा पवार यांना निवडणूक आयोगाची नोटीस

बारामती लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांना निवडणूक आयोगाने नोटीस पाठवली आहे. प्रचारखर्च कमी दाखवल्याप्रकरणी ही नोटीस पाठवण्यात आली आहे.

Bhuldhana: बुलढाण्यात डॉल्बी वाजवण्यास बंदी, प्रसासनाचा निर्णय

बुलढाण्यात डॉल्बी वाजवण्यास बंदी घालण्यात आली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी हे आदेश दिले आहेत. गेल्या काही दिवसात अनेक डॉल्बी मालकांविरोधात कारवाई करण्यात आली आहे

Lok Sabha Elections 2024 : राहुल गांधी रायबरेलीमधून लोकसभा लढविणार, काँग्रेसकडून शिक्कामोर्तब

काँग्रेसने लोकसभा निवडणुकीसाठी राहुल गांधी यांना रायबरेलीमधून तर, किशोरीलाल शर्मा यांना अमेठीतून उमेदवारी जाहीर केली आहे.

Raebareli Lok Sabha : काँग्रेस नेते राहुल गांधी रायबरेलीमधून निवडणूक लढवण्याची शक्यता?

काँग्रेस नेते राहुल गांधी रायबरेलीमधून उमेदवारी दाखल करतील, तर काँग्रेस नेते केएल शर्मा अमेठीतून निवडणूक लढवण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र, याला काँग्रेसकडून अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.

Latest Marathi News Live Update
Latest Marathi News Live Update : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा कोल्हापुरात दाखल, मतदारसंघातील प्रचाराचा घेणार आढावा

Chikkodi Lok Sabha : अमित शहा यांची आज हुक्केरीत सभा

हुक्केरी : केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शहा यांची हुक्‍केरीत आज शुक्रवारी (ता. ३) सकाळी ११ वाजता जाहीर सभा होणार आहे. चिक्कोडी लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार अण्णासाहेब जोल्ले यांच्या प्रचारासाठी हुक्केरी येथील विश्वराज भवनजवळ ही सभा होणार असल्याचे हुक्केरीचे आमदार निखिल कत्ती यांनी सांगितले.

Nitin Gadkari : लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी नितीन गडकरी उद्या कोल्हापुरात

कोल्हापूर : केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी हे लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी शनिवारी (ता.४) कोल्हापुरात येत आहेत. त्यांच्या उपस्थितीमध्ये जिल्ह्यातील प्रमुख उद्योजक, व्यापारी, कारखानदार तसेच अन्य व्यावसायिकांचा मेळावा घेतला जाणार आहे.

Women Abuse Case : अटकपूर्व जामिनासाठी एच. डी. रेवण्णांची न्यायालयात धाव

बंगळूर : धजदचे आमदार आणि माजी मंत्री एच. डी. रेवण्णा यांनी गुरुवारी अटकपूर्व जामिनासाठी बंगळूर येथील सत्र न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने या प्रकरणाची सुनावणी आज (ता. ३) निश्चित केली आहे. ज्येष्ठ धजद नेते असलेले रेवण्णा यांना महिलांच्या लैंगिक शोषण प्रकरणासंदर्भात विशेष तपास पथक (एसआयटी) कडून नोटीस मिळाली आहे. त्यांचा मुलगा आणि हासनचे विद्यमान खासदार प्रज्वल रेवण्णा यांनाही नोटीस मिळाली आहे.

Election Commission : विधान परिषदेच्या सहा जागांसाठी तीन जूनला निवडणूक

बंगळूर : लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत केंद्रीय निवडणूक आयोगाने गुरुवारी कर्नाटक विधान परिषदेच्या सहा जागांसाठी निवडणूक तारखा जाहीर केल्या. राज्यातील तीन शिक्षक मतदारसंघ आणि तीन पदवीधर मतदारसंघांसाठी निवडणूक आयोगाने निवडणूक जाहीर केली. ३ जून रोजी सकाळी ८ ते दुपारी ४ या वेळेत मतदान होणार आहे. सहा जून रोजी निकाल जाहीर होणार आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा १६ मे हा शेवटचा दिवस आहे. २० मे हा उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस असल्याचे निवडणूक आयोगाने सांगितले.

Kolhapur Lok Sabha : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा कोल्हापुरात दाखल, मतदारसंघातील प्रचाराचा घेणार आढावा

कोल्हापूर : भाजपचे वरिष्ठ नेते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज रात्री कोल्हापुरात दाखल झाले. ते, आज (ता. ३) सकाळी नऊला प्रमुख नेते, कार्यकर्ते यांच्याबरोबर बैठक घेऊन लोकसभेच्या कोल्हापूर आणि हातकणंगले मतदारसंघातील प्रचाराचा आढावा घेणार आहेत. त्यानंतर ते हुक्केरी येथे सभेसाठी जाणार आहेत. तेथून परत कोल्हापुरात येऊन दिल्लीकडे रवाना होतील.

Palghar Lok Sabha : पालघर लोकसभा मतदारसंघातून भाजपकडून हेमंत सावरांना उमेदवारी

Latest Marathi News Live Update : केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी हे लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी शनिवारी (ता. ४) कोल्हापुरात येत आहेत. पालघरमधून हेमंत सावरांना भाजपकडून उमेदवारी जाहीर झाली आहे. हासनचे खासदार प्रज्वल रेवण्णा यांच्या अश्लील व्हिडिओ प्रकरणामुळे राज्याच्या राजकारणात वादळ निर्माण झालंय. रेवण्णा प्रकरणी पंतप्रधानांनी त्या पीडित महिलांची माफी मागावी, अशी मागणी राहुल गांधींनी केलीये. भाजपचे वरिष्ठ नेते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा काल रात्री कोल्हापुरात दाखल झाले. ते आज (ता. ३) सकाळी नऊला प्रमुख नेते, कार्यकर्ते यांच्याबरोबर बैठक घेऊन लोकसभेच्या कोल्हापूर आणि हातकणंगले मतदारसंघातील प्रचाराचा आढावा घेणार आहेत. तसेच देशातील वातावरणात बदल जाणवत असून काही भागांत मुसळधार पाऊस पडत आहे. यासह देशासह राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर..

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.