जिल्हा कृषी निविष्ठा सनियंत्रण समितीची बैठक १२ एप्रिल रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली sakal
अकोला

अकोला : खते-बियाणे रास्त दरात उपलब्ध करावे!

जिल्हाधिकारी निमा अरोरा यांचे निर्देश

राजेश नागरे

अकोला : आगामी हंगामात शेतकऱ्यांना खते व बियाणे हे सहज व रास्त दरात उपलब्ध व्हावे यासाठी कृषी विभागाने नियोजन करावे तसेच खत तसेच बियाणे विक्री करतांना ज्यादा दराने विक्री, लिंकिंग करून विक्री तसेच अप्रमाणित व निकृष्ट खते बियाणे विक्री होणार नाही, याची दक्षता घ्यावी तसेच गैरप्रकार आढळल्यास नियंत्रण कक्षास तक्रार करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा कृषी निविष्ठा सनियंत्रण समिती निमा अरोरा यांनी येथे दिले.

जिल्हा कृषी निविष्ठा सनियंत्रण समितीची बैठक १२ एप्रिल रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली. या बैठकीस जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. कांतप्पा खोत, सदस्य सचिव तथा कृषि विकास अधिकारी डॉ. मुरली इंगळे, सहाय्यक आयुक्त कामगार राजू गुल्हाने, जिल्हा पोलिस अधीक्षक यांचे प्रतिनिधी, एमएआयडीसीचे ठाकरे, महाबीजचे पिसाळ, अकोला जिल्हा कृषी व्यवसायिक संघाचे उपाध्यक्ष वाटमारे, होलसेलर व डीलर असोशियसनचे प्रतिनिधी, प्रमुख खत कंपनीचे प्रतिनिधी आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकाऱ्यांनी निर्देश दिले की, जागतिक पातळीवरील युद्धजन्य परिस्थिती पाहता त्याचा फायदा घेऊन खतांची दरवाढ वा साठेबाजी या शक्यता लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी खते खरेदी करावी. जिल्ह्यात होणारी खत विक्री ही १०० टक्के ई-पॉस द्वारेच झाली पाहिजे. तसेच खतांची पोहोच २४ तासांच्या आत करण्यात यावी. दिलेल्या आवंटनानुसार सर्व खत कंपनी प्रतिनिधी यांनी जिल्ह्यात खते उपलब्ध करून द्यावी.

संरक्षित खत साठ्यावर चर्चा

बैठकीत खरीप हंगाम २०२२ साठी लागणारे बियाणे, खते मागणी, प्राप्त आवंटन, शिल्लक खत साठा, बफर स्टॉक संरक्षीत खत साठा यावर सविस्तर चर्चा झाली. यूरिया व डीएपी खतांच्या बफर स्टॉकबाबत तालुकानिहाय गोडाऊन साठवणूक नियोजनाला मंजुरी देण्यात आली. बियाणे उपलब्धते संदर्भात जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी यांनी शेतकऱ्यांकडे स्वतःचे तीन लाख ५६ हजार क्विंटल सोयाबीन बियाणे उपलब्ध असल्याचे सांगितले. कृषी विभागामार्फत जिल्हा व तालुका स्तरावर भरारी पथके तसेच नियंत्रण कक्ष स्थापन केले आहेत, असेही यावेळी स्पष्ट करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Point Table: दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाचा Mumbai Indians ला फटका; सर्व सघांची झाली एक लढत, मोठी उलथापालथ

Supreme Court : अनावश्यक खटले टाळा! अधिकाऱ्याच्या बडतर्फीला आव्हान देणाऱ्या केंद्र सरकारला सुप्रीम कोर्टानं फटकारलं, ठोठावला दंड

Pune BJP News: पुणे महापालिका स्वीकृत नगरसेवकांना थेट पाच वर्षांची मुदत; अडीच वर्षांच्या आशेवर पाणी, अनेक कार्यकर्त्यांचा पत्ता कट

Countries with most uranium: अणुऊर्जेसाठी लागणारं युरेनियम कोणत्या देशाकडे सर्वाधिक आहे? भारत, पाकिस्तान कितव्या क्रमांकावर?

Kidney Transplant : मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी १९७० रुग्ण प्रतीक्षेत; पुणे विभागातील १४०० पुरुषांसह ५७० महिलांचाही समावेश

SCROLL FOR NEXT