akola
akola sakal
अकोला

Akola : २४ गावांना दूषित पाणीपुरवठ्याचा विळखा

सकाळ वृत्तसेवा

अकोला : ग्रामपंचायतींकडे ब्लिचींग पावडर उपलब्ध नसणे व इतर कारणांमुळे जिल्ह्यातील २४ गावे दूषित पाण्याच्या विळख्यात सापडली आहेत. संबंधित गावातील पाणी नमूने दूषित आढळल्याने नागरिकांच्या आराेग्याचा ग्रामीण भागात खेळखंडाेबा सुरू असल्याचे दिसून येत आहे. यासंबंधीच्या पाणी नमून्यांची तपासणी सप्टेंबर महिन्यात आरोग्य विभागाने केली आहे.

जिल्ह्यातील ग्रामीण भागात राहणाऱ्या नागरिकांना शुद्ध पाणीपुरवठा करता यावा, यासाठी ब्लिचींग पावडरची खरेदी ग्रामपंचायत स्तरावर होणे अपेक्षित आहे. परंतु जिल्ह्यातील काही ग्रामपंचायती ब्लिचींग पावडर खरेदीत टाळाटाळ करता. त्यामुळे नागरिकांना करण्यात येणारा पाणीपुरवठा ब्लिचिंग पावडर विनाच करण्यात येताे.

परिणामी ग्रामीण भागातील नागरिकांना नेहमीच आराेग्याशी संबंधित समस्यांना ताेंड द्यावे लागते. दरम्यान सप्टेंबर महिन्यात जिल्ह्यातील २४ गावांमध्ये ब्लिचींग पावडर नसल्याने व इतर कारणांमुळे अशुद्ध पाणी पुरवठा करण्यात येत आल्याची बाब जिल्हा परिषदेच्या आराेग्य विभागाच्या वतीने करण्यात आलेल्या पाणी नमूने तपासणी अहवालातून समाेर आली आहे. त्यामुळे संबंधित गावांमध्ये साथराेगाचा खतरा वाढला आहे. त्यामुळे याकडे वरिष्ठांनी लक्ष देणे गरजेचे झाले आहे.

आजार बळकावण्याचा धाेका

दूषित पाणी पिल्यामुळे कॉलरासह इतर साथराेग हाेण्याची शक्यता असते. ग्रामीण भागात शुद्ध पाण्याबद्दल नागरिकांमध्ये जागरूकता नसल्यामुळे ते स्वच्छ दिसणारे पाणी सुद्धा शुद्ध पाणी समजून पितात, परंतु ते आराेग्यास अपायकारक असते. दरम्यान अशुद्ध पाणी पुरवठ्यामुळे ग्रामीण भागात साथराेगाची भीती वाढली आहे.

सर्वाधिक गावे अकोला तालुक्यातील

ब्लिचींग पावडर नसल्याने अकोला तालुक्यातील सर्वाधिक २० गावांना दूषित पाणी पुरवठा करण्यात आला. त्यामध्ये अलियाबाद, चाचोंडी, शिवर, शिवणी, मलकापूर, पातूर नंदापूर, कुरणखेड, पैलपाडा, खडकी, शिवापूर, हिंगणा जुना, हिंगणा रोड, अकोली खु., सोमठाणा, दहिहंडा, गणोरी, हिंगणी, खानापूर, रोहना, वडद, ब्रह्मपुरी, कंचनपूर, बादलापूर, दुधाळा, मंडाळा इत्यादी गावांचा समावेश आहे. त्यापैकी सहा गावे अकोला महापालिका हद्दीतील आहेत. याव्यतिरित्त मूर्तिजापूर तालुक्यातील हिरपूर, सांजापूर, धामोरी, लोणसाणा या गावांमध्ये सुद्धा ब्लिचिंग पावडर विरहित पाणी पुरवठा करण्यात आला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bird Flu: देशात बर्ड फ्लूचा धोका वाढला? आरोग्य मंत्रालयाने दिली महत्त्वाची माहिती

Pregnancy Termination: SCने 14 वर्षांच्या अल्पवयीन मुलीला गर्भपात करण्यासाठी दिलेली परवानगी घेतली मागं; सरन्यायाधीशांनी का बदलला निर्णय?

Virat Kohli : 'तुमच्यापेक्षा माझा खेळ मी अधिक जाणतो म्हणूनच....' विराट कोहलीने टीकाकारांना दिले उत्तर

Latest Marathi News Live Update : संभाजीराजेंवर कुणी दबाव टाकला याचा सामंत आज पर्दाफाश करणार

Jharkhand High Court: कायदेशीर प्रक्रियेशिवाय घर पाडता येणार नाही; बुलडोझर कारवाईसंदर्भात झारखंड हायकोर्टाचे महत्त्वाचे निर्देश

SCROLL FOR NEXT