Akola
Akola  esakal
अकोला

Akola : मूकबधिरांकरिता जोडीदार शोधण्यासाठी करणार ‘मध्यस्थी’

सकाळ डिजिटल टीम

अकोला : राज्यातील मूकबधिर वर्गात सामूहिक सुसंवाद निर्माण होऊन त्यांच्यात सांस्कृतिक व सामाजिक आदानप्रदान व्हावे, त्यांच्या समस्या सुटाव्यात, मूकबधीर उपवर-युवक युवतींचे लग्न संबंध जुळून यावेत यासाठी अकोल्यात प्रथमच राज्यस्तरीय मूकबधिर युवक-युवती परिचय संमेलन व स्नेह संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. यात राज्यभरातील तब्बल बाराशे मूकबधिर सहभागी होणार आहेत.

शासकीय विश्वामगृह येथे शुक्रवारी आयोजित पत्रकार परिषदेत या एक दिवसीय राज्यस्तरीय संमेलनाची माहिती देण्यात आली. यावेळी आयोजक पंकज जायले, ॲड. सुधाकर खुमकर, पुरुषोत्तम आवारे, आयोजन समितीचे अमोल देशमुख, गुणवंत महल्ले, अभय मुळे, अश्विन कट्टा, मुझमील खान, किशोर देशमुख, मिलिंद गोतरकर, मधुर खंडेलवाल, उमाकांत खंडेराव, जयदीप ढोले आदी उपस्थित होते.

सोमवार, ता.२५ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता सिव्हिल लाईन्स परिसरातील आकाशवाणी समोरील जिल्हा परिषद कर्मचारी भवनात हे मूकबधिर परिचय संमेलन आयोजित करण्यात आले आहे. यामध्ये सर्व जाती धर्मातील मूकबधिर बांधव मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. अनिल गावंडे यांच्या अध्यक्षतेत आयोजित या सोहळ्याचे उद्‍घाटक जिल्ह्याचे माजी पालकमंत्री तथा राज्याच्या दिव्यांग कल्याण विभागाचे अध्यक्ष (मंत्री दर्जा) आमदार बच्चू कडू हे प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत. एक दिवशीय मूकबधिर युवक-युवती परिचय संमेलन व स्नेह मिलन सोहळ्यात समस्त मूकबधिर बांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन या पत्रकार परिषदेत करण्यात आले.

११ मूकबधिरांचा आदर्श विवाह

मान्यवरांच्या उपस्थितीत मूकबधिर बांधवांना भेडसावणाऱ्या समस्या व त्यावरील उपाय योजना यावर या कार्यक्रमात चर्चा होणार आहे. या संमेलनात ११ विवाहोश्चुक मूकबधिर बांधवांच्या आदर्श विवाहाची संकल्पना साकार करण्याचे योजले आहे. कार्यक्रमात राज्यभरातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मूकबधिर बांधवांचा सन्मानही मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे.

लोकजागरचा पुढाकार

या एक दिवशीय संमेलनाची जय्यत तयारी अनिल गावंडे मंचच्या मार्गदर्शनात करण्यात आली असून, संमेलनस्थळी व्यवस्था करण्यात आली आहे. राज्यभरात मूकबधिरांच्या समस्या अनंत असून, त्यांना एकत्र जोडणारा दुवा अद्याप उपलब्ध नसल्यामुळे अशा वर्गात सुसंवाद होऊन त्यांच्या समस्याचे निराकरण व्हावे, मूकबधिर युवक युवतींचे संबंध जुळून त्यांचात विवाह व्हावा, त्यांच्या सामाजिक व व्यवसायिक समस्या सुटाव्यात यासाठी हा उपक्रम लोकजागर मंचच्या वतीने साकार करण्यात आला असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: मुंबई दक्षिण मध्य मतदारसंघात सकाळी ९ वाजेपर्यंत सरासरी 8 टक्के मतदान

Akshay Kumar: खिलाडी अक्षय कुमारनं भारताचं नागरिकत्व मिळाल्यानंतर पहिल्यांदाच केलं मतदान; म्हणाला, "माझा भारत देश हा..."

Latest Marathi Live News Update: सुनील राऊत पोलिसांवर भडकले

PM Modi : मतपेढीच्या तुष्टीकरणासाठी संस्थांना धमक्या; पंतप्रधानांची ममतांवर टीका

Standing Problems: तुम्हीही जास्त वेळ उभे राहत असाल तर वाढू शकतात 'या' समस्या

SCROLL FOR NEXT