Akola Melghat tribal area Education Akola Institute Accepted guardianship of 14 schools 
अकोला

अकोला : १४ शाळांचे स्वीकारले पालकत्व

अकोल्यातील संस्थेचा पुढाकार; २११ विद्यार्थ्यांना घेतले दत्तक

सकाळ वृत्तसेवा

अकोला : सातपुडा पर्वत रांगेत वसलेल्या मेळघाट या आदिवासी भागात शिक्षणासाठी विद्यार्थ्यांमध्ये आवड निर्माण व्हावी यासाठी अकोला येथील सेवा बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने विशेष पुढाकार घेण्यात आला आहे. मेळघाटातील एकूण १४ शाळांचे पालकत्व या संस्थेने स्वीकारले असून, १४ शाळांमधील एकूण २११ गरीब हुशार होतकरू आणि गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी दत्तक घेण्यात आले आहे.

सेवा बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने मेळघाटातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीबाबत सर्वेक्षण करण्यात आले. या सर्वेक्षणानुसार एकूण १४ शाळांना पहिल्या टप्प्यात मदत करण्यासाठी निवडण्यात आले. चिखलदरा तालुक्यात येणाऱ्या बोलोरी, लवादा, कोहणा, हत्ती घाट, जैतादेवी, ढोमणी पाटा, भांदरी सलोना, बेला, मसुंडी, जामलीवन, भवई, घटांग आणि बिहारी या गावांमधील जिल्हा परिषदेच्या शाळांची निवड करण्यात आली.

यापैकी घटांग आणि बिहारी वगळता इतर सर्व बारा गाव ही मुख्यमार्गापासून बऱ्याच आतमध्ये जंगलात वसले आहेत. या सर्व चौदा शाळांमध्ये विद्यार्थ्यांना विविध खेळांमध्ये आवड निर्माण व्हावी यासाठी आवश्यक असणारी क्रीडा साहित्य सेवा बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने वितरित करण्यात आले आहे. यासोबतच या चौदा शाळेतील २०७ होतकरू विद्यार्थ्यांना शैक्षणिक रित्या दत्तक घेऊन त्यांना वर्षभर लागणारे शैक्षणिक साहित्य संस्थेच्या वतीने पुरविली जाणार आहे.

घाटांग गावात क्रीडा साहित्याचे वाटप

घाटांग या गावात नुकताच सेवा बहुद्देशीय संस्थेच्या वतीने या सर्व १४ शाळांना क्रीडा आणि शैक्षणिक साहित्य वितरित केला. जिजाऊ बँकेचे अध्यक्ष अविनाश कोठळे यांच्या अध्यक्षतेत आयोजित या सोहळ्याला संत गाडगेबाबा अमरावती विद्यपीठाचे क्रीडा संचालक डॉ. अविनाश असणारे, श्री शिवाजी कृषी महाविद्यालयाचे हवामान शास्त्र विभाग प्रमुख प्रा.अनिल बंड, बोलोरी कट ग्रामपंचायत सरपंच साबुलाल बेठे प्रामुख्याने उपस्थित होते. हा सोहळा यशस्वी करण्यासाठी सेवा बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष वैभव वानखडे यांच्यासह संस्थेचे उपाध्यक्ष गौरव काटेकर, सचिव जयंत वानखडे नारायण निकोरे गिरीश आखरे प्रफुल जानवरकर जितेंद्र दळवी हर्षद वानखडे आदींनी सहकार्य केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amazon child shopping: आता बोला...! आई-वडील झोपेतच अन् तिकडं त्यांच्या लाडक्या चिमुकल्यानं चक्क 'अमेझॉन'वर केली अडीच लाखांची खरेदी

Mahadev Munde Case: खळबळजनक! '‘महादेव मुंडे खून प्रकरणातील प्रत्यक्षदर्शीला वाल्मीकने संपवलं’', आकस्मिक मृत्यूचा बनाव

MLA Ramesh Thorat : माजी आमदार रमेश थोरात घड्याळ हाती बांधण्याच्या तयारीत; अशोक पवार मात्र पक्षातच समाधानी

Latest Marathi News Updates: देश-विदेशासह राज्यात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

MLA Rahul Kul : उजनी धरणाच्या बॅक वॉटरमध्ये बुडीत बंधारे उभारावेत; आमदार कुल यांची अधिवेशनात मागणी

SCROLL FOR NEXT