National People Court organized Akot
National People Court organized Akot sakal
अकोला

अकाेला : अकोटात 'राष्ट्रीय लोक अदालतीचे' आयोजन

सकाळ वृत्तसेवा

अकोट : येथील तालुका विधी सेवा प्राधिकरणाकडून पुढील महिन्यात शनिवारी सकाळी दहा वाजता राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन पोपटखेड रोडवरील न्याय मंदिरात करण्यात आले आहे. पक्षकारांनी आपली प्रकरणे सामजस्यांने न्याय तडजोडीने निकाली काढण्यासाठी ता.७ मे पर्यंत संबंधित न्यायालयात अर्ज सादर करण्याचे आवाहन तालुका विधी सेवा प्राधिकरणाच्या वतीने करण्यात आले.

लोकन्यायालय म्हणजे गाव पंचायतीचेच आधुनिक रुप आहे. जेथे कायदा जाणणाऱ्या नि:पक्षपाती लोकांचे न्यायमंडळ त्यांच्यापुढे येणाऱ्या प्रकरणांमध्ये सामंजस्याने न्याय तडजोडीने निकाली काढतात. लोक अदालतीमध्ये न्यायालयात दाखल होण्याआधीची प्रकरणे, प्रलंबित प्रकरणे म्हणजेच बँक वसुलीची प्रकरणे, लोकन्यायालयात ठेवण्यासाठी अनुमती दिलेली वीज, पाणी बिलासंबंधीची प्रकरणे, फौजदारी गुन्हे, वैवाहिक प्रकरणे, तसेच इतर दिवाणी प्रकरणे, फौजदारी स्वरुपाची प्रकरणे, वाहन अपघात खटले, जागेबाबतची प्रकरणे, महसूल विषयक प्रकरणे, कामगारांची प्रकरणे जी न्यायालयात प्रलंबित आहेत यांचाही यात समावेश असणार आहे.

जास्तीत जास्त पक्षकारांनी लोक अदालतीत आपली प्रकरणे ठेवावी जेणेकरून वर्षानुवर्षे सुरू असलेल्या खटल्याचा निकाल त्याच दिवशी होत असल्याने वेळेसोबतच पैशाचीही बचत होईल. दोन्ही बाजूचे पक्षकार न्यायाधीशासमोर चर्चा करून प्रकरणाचा निपटारा करू शकतील. जे नियमित कोर्टात होवू शकत नाही, त्यामुळे वर्षानुवर्षे सुरू असलेली प्रकरणांचा निपटारा करण्याच्या दृष्टीनेच अधिकाधिक प्रकरणे निकाली निघायला मदत करण्याच्या हेतूने न्यायाधीश, वकील, सामाजिक कार्यकर्ते यांचे पॅनल पक्षकारांना या लोकअदालतीच्या माध्यमातून मदत करू शकेल. यामध्ये कुठलेही शुल्क आकारले जाणार नाही.

जी प्रकरणे तडजोडी योग्य आहेत, अशा व्यक्तींनी ‍विधी सेवा प्राधिकरणाकडे अर्ज करावा. जास्तीत जास्त पक्षकारांनी प्रलंबित असलेली दिवाणी व फौजदारी प्रकरणे लोक न्यायालयात ठेवून तडजोडीअंती निकाली काढावीत, असे आवाहन तालुका विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री चकोर बाविस्कर यांनी केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 LSG vs RR : केएल शेर तर संजू सवा शेर! राजस्थानचा एक पाय प्ले ऑफमध्ये

DC vs MI : गोलंदाजीतली 'गळती' मुंबईच्या मुळावर; बॅटिंगमध्ये फर्स्ट क्लास तर बॉलिंगमध्ये नापास

Jolly LLB 3 : आता रंगणार जॉली विरुद्ध जॉली केस; सिनेमाच्या शूटिंगबाबत महत्त्वाची अपडेट आली समोर

Google वर जाहिराती करण्यासाठी भाजपने खर्च केले 100 कोटी; BJP पहिल्या स्थानावर तर काँग्रेस कितव्या स्थानावर? वाचा सविस्तर...

CM Yogi Aadityanath : ''काशी अन् अयोध्येनंतर आता मथुरेकडे प्रस्थान...'' योगी आदित्यनाथांचे स्पष्ट संकेत

SCROLL FOR NEXT