Akola News: Guest from Mumbai; An 80 feet high water tank in the village chosen for the jump 
अकोला

मुंबईहून आली पाहूणी; उडी घेण्यासाठी निवडली गावातली ८० फूट उंच पाण्याची टाकी

विवेक मेतकर

अकोला : बार्शिटाकळी तालुक्यातील गोरव्हा गावात मुंबईहून सकाळीच एक 27 वर्षाची महिला येते.... दुपारी गावातील ग्रामपंचायत जवळ असलेल्या अंदाजे 80 फुट ऊंच पाण्याच्या टाकीवर चढते...   काही केल्या महिला खाली उतरण्यास तयार नसते... साऱ्या गावात चर्चा सुरू...

तेवढ्यात पोलिस येतात...तेही प्रयत्न करून बघतात...पण, महिला काही ऐकायला तयार नसते. मग पोलिसच संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचवाव पथकाला पाचारण करतात.... पथकाचे प्रमुख जीवरक्षक दीपक सदाफळे तात्काळ रेस्क्यु ऑपरेशन राबवतात... 

डबल फुली वायर रोपच्या सहाय्याने पथकातील काही लोक पाण्याच्या टाकीवर चढतात. महिलेशी संवाद साधतात...समजवून सांगण्याचा प्रयत्न करतात....मात्र, महिला काहीही ऐकण्याच्या मनस्थितीत नसते.. कधीही उडी मारून आत्महत्याची शक्यताच जास्त...

परंतु जिवरक्षक दीपक सदाफळे  मोठया शिताफीने कसोशीने प्रयत्न करुन दुपारी दीड वाजता पाण्याच्या टाकीवर चढलेल्या महिलेला शेवटी सायंकाळी सहा वाजता  सुखरुप खाली आणतात...

 पुढील उपचारासाठी अकोला जिल्हा रुग्णालयात त्या महिलेला दाखल करण्यात आले. सद्या महीला सुखरुप आहे. 

यावेळी घटनास्थळी बार्शिटाकळी पोलिस ठाण्याचे ठाणेदार तीरुपती राणे, एपीआय शाम तायडे, संजय भगत, अमोल पवार, महादेव नेमाडे  हे सुध्दा हजर होते.  
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

आनंदाची बातमी! सोलापूर जिल्ह्यातील महापूर, अतिवृष्टीने बाधितांसाठी ७७२ कोटी, आजपासून पैसे खात्यात जमा होणार..

IND vs AUS 1st ODI Live: रोहित शर्माचा भारी विक्रम, विराटलाही संधी; भारतीय संघात अष्टपैलू खेळाडूचे पदार्पण, प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल

Latest Marathi News Live Update : कर्मभूमी एक्सप्रेसमधून पडून दोघांचा मृत्यू, नाशिक रोडजवळ घडली घटना

Konkan Railway : कोकण रेल्वेतर्फे प्रवाशांना दिवाळी भेट, लांब पल्ल्याच्या रेल्वे थांबणार

IND vs AUS 1st ODI : रोहित शर्मा-विराट कोहली यांच्या भवितव्याची नवी पहाट; वन डे मालिका स्वतःला सिद्ध करणारी

SCROLL FOR NEXT