Akola News: Selection of poems of 27 students of Prabhat in the epic of equality
Akola News: Selection of poems of 27 students of Prabhat in the epic of equality 
अकोला

समतेच्या महाकाव्यात ‘प्रभात’च्या 27 विद्यार्थ्यांच्या कवितांची निवड

विवेक मेतकर

अकोला  : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन व कार्यावर आधारित समतेचे महाकाव्य या अभिनव काव्यसंग्रहात प्रभातच्या तब्बल २७ विद्यार्थ्यांच्या सारगर्भित कवितांचा समावेश करण्यात आला आहे.


अकोल्यातील प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या पुढाकाराने या भव्य काव्यसंग्रहाचे संयोजन करण्यात आले असून यातील प्रथम खंड नुकताच प्रकाशित झाला आहे. या वाड़मयीन शिल्पामध्ये प्रभातच्या प्रतिभासंपन्न विद्यार्थ्यांनी देखील सहभाग घेतला आहे.

गत १८ जानेवारी रोजी प्रभात किड्स स्कूल येथे एका विशेष काव्यलेखन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेत मराठी विभागाच्या तीनशेहून अधिक विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला होता. या उपक्रमासाठी मराठी भाषा अभ्यासक प्रा. डॉ. स्वाती दामोदरे यांचे मार्गदर्शन लाभले होते तसेच प्रभातच्या मराठी विभागाच्या शिक्षकांनी अथक परिश्रम घेतले होते.


दरम्यान, विद्यार्थ्यांनी लिहीलेल्या निवडक कविता महाकाव्यासाठी स्थापित संकलन समितीकडे पाठविण्यात आल्या होत्या.त्यामधून प्रभातच्या तब्बल २७ विद्यार्थ्यांच्या कवितांना या भव्य काव्यसंग्रहात स्थान मिळाले आहे. यामध्ये प्रभातच्या इयत्ता सहावी ते नववीच्या विद्यार्थ्यांचा समावेश असून मानव पवार, जान्हवी दादंळे, गुंजन पाटील, सानिका बेंडे, निषाद ढोकणे, सावनी कुलकर्णी, सानिया ठाकरे, श्रावणी खुमकर, अंतरा गद्रे, विनायक पागोरे, तनिष्का देशमुख, शृतीका पिंगळे, अनुष्का पोहरकर, सिद्धी ढवळे, शर्वरी भगत, आर्यन इंगळे, ईशा कोरडे, आर्या ढोले, कल्याणी चिंचोळकर, दीपा टाले, सई माहोरे, अर्थव तापडिया, अंजली घाटोळ, बतुल अलमदार, आदर्श गोतरकार, यशस्वी खवले आणि ओजस सोलंके यांच्या कवितांचा समावेश करण्यात आला आहे. प्रभातचे संचालक डॉ.गजानन नारे व संचालिका सौ. वंदना नारे यांनी प्रभातच्या बालकवींचे कौतुक केले असून महाकाव्याच्या संपादन समितीचे आभार मानले आहे.

नाववंत कवीच्या कवितांचा समावेश
विशेष म्हणजे या महाकाव्यात कुसुमाग्रज, मंगेश पाडगावकर, वंसत बापट, सुरेश भट, डॉ. विठ्ठल वाघ इत्यादी नाववंत कवीच्या कवितांचा समावेश असून त्यात प्रभातच्या विद्यार्थांच्या कवितांना मिळालेले स्थान अपूर्व असल्याचे मनोगत मराठी विभाग प्रमुख स्वाती ठाकरे व मराठी भाषा शिक्षकांनी व्यक्त केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT