रस्त्याचे वय फक्त पाच महिने अन् खड्डे पडले अगणित!
रस्त्याचे वय फक्त पाच महिने अन् खड्डे पडले अगणित! sakal
अकोला

अकोला : रस्त्याचे वय फक्त पाच महिने अन् खड्डे पडले अगणित!

सकाळ वृत्तसेवा

अकोला : स्थानिक पोलिस स्टेशनच्या पाठीमागून जाणारा ३९ लाख रुपयाचा बायपास रस्ता अवघ्या पाच महिन्यात खड्ड्यात गेला असून, येथील विकास कामांना कमिशनचे ग्रहण लागल्याचे दिसून येत आहे! यावर लोकप्रतिनिधी प्रतिक्रिया देत आहेत ना कोणी संबंधित प्रशासन. यांच्या चुप्पीमुळे रस्त्याच्या कमिशनचे लाभार्थी कोण? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

वाशीम जिल्ह्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून शिरपूर जैनकडे बघितले जाते. तसेच, तीर्थक्षेत्र ब दर्जा असलेले जैन धर्मियांची काशी म्हणून अख्ख्या भारताभर शिरपूर जैन गावाची ओळख आहे. जिल्हा परिषद, ग्रामपंचायत, आमदार, खासदार व इतर निधीमधून शिरपूरला विकासकामे करण्यासाठी निधी मिळत आहे. त्यानुसार विकासात्मक कामे सुद्धा होत आहेत. मात्र, सदर कामे दर्जाहीन होत असल्याचे दिसून येत आहे. येथील पोलिस स्टेशनच्या पाठीमागून राष्ट्रीय महामार्गाला जोडणारा ३९ लाख रुपयाच्या रस्त्यावर अवघ्या पाच महिन्यांमध्ये जागोजागी खड्डे पडले आहेत.

अनेक ठिकाणी रस्ता दबला आहे, सदर रस्त्यावरून वीरळ प्रमाणात वाहतूक असूनही सदर रस्तावर पाच महिन्यातच खड्डे पडले आहेत. विकास कामे करत असताना विकास कामांची माहिती दर्शविणारे फलक लावणे संबंधित कंत्राटदारांकडून बंधनकारक आहे. मात्र, सदर कंत्राटदाराने कोणत्याही प्रकारचे फलक न लावता शासनाचे नियम धाब्यावर बसवून सदर काम पूर्ण केले आहे. दर्जाहीन काम होऊनही शासन व प्रशासन चुप्पी साधून आहेत. त्यामुळे शिरपूर येथील विकास कामांना कमिशनचे ग्रहण तर लागले नाही ना ? असा प्रश्‍न त्यानिमित्ताने उपस्थित होत आहे. येथील दर्जाहीन होत असलेल्या विकास कामांना खीळ बसावी, भविष्यात होणारी विकास कामे दर्जेदार करण्यात यावी व बायपास रस्त्याची त्वरित दुरुस्ती करण्यात यावी. अशी, मागणी स्थानिक नागरिकांच्या वतीने केल्या जात आहे.

शिरपूर बायपास रस्ता हा कंत्राटदाराने नियम धाब्यावर बसवून पूर्ण केला आहे. सदर रस्ता तत्काळ दुरुस्त करावा व निकृष्ट काम करणाऱ्या कंत्राटदारावर कारवाई करावी. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल करून तीव्र आंदोलन करण्यात येईल.

- किशोर देशमुख, तालुका उपाध्यक्ष, अभाभ्रसं समिती, मालेगाव.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT