Akola tractor accident
Akola tractor accident  Sakal
अकोला

अकाेला : ट्रॅक्टर ट्राॅलीसह पुलावरून नदीत कोसळला; तीन जखमी

सकाळ वृत्तसेवा

बार्शीटाकळी : मजूर घेऊन जाणारे ट्रॅक्टर ट्रॉलीसह तालुक्यातील पिंजर येथील पिंजर्डा नदीत कोसळल्याची घटना ता. ३ जुलै रोजी सकाळी दहा वाजताच्या दरम्यान घडली. संत गाडगेबाबा आपत्कालीन सोध व बचाव पथकाला पाचरण करून नदीत पडलेल्या मजुरांचा शोध घेण्यात आला. सुदैवाने यामध्ये कुठलीही जीवितहानी नाही झाली.

तालुक्यातील पिंजर येथे विटा खाली करून पिंजरवरून पातूर-नंदापुरकडे जात असताना कारंजा ते पिंजर रोडवर असलेल्या पिंजर्डा नदीच्या पुलावरून चार मुजरांसह ट्रॅक्टर (विना नंबर)-ट्राॅली क्रमांक एमएच-३०-एएन-४७४ नदीत कोसळल्याची घटना रविवारी सकळी घडली. घटनेची माहिती मिळताच स्थानिक संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले.

नदीत पडलेल्या मजुरांचा पथकाकडून शोध घेण्यात आला. यामध्ये जखमी पंकज भास्कर वाडकर (वय ३०), प्रवीण गजानन वाडकर (वय ४०), हर्शल दसरथ सुरजुसे (वय २५) सर्व रा.पातूर-नंदापूर यांना बाहेर काढून प्राथमिक उपचार करण्यासाठी तत्काळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. वैद्यकीय अधिकारी डाॅ.आगलावे यांनी जखमींवर उपचार करून पुढील उपचारासाठी संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाच्या रुग्णवाहिकेने अकोला येथील सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याची माहिती पथकाचे प्रमुख दीपक सदाफळे यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 LSG vs RR : केएल शेर तर संजू सवा शेर! राजस्थानचा एक पाय प्ले ऑफमध्ये

DC vs MI : गोलंदाजीतली 'गळती' मुंबईच्या मुळावर; बॅटिंगमध्ये फर्स्ट क्लास तर बॉलिंगमध्ये नापास

Jolly LLB 3 : आता रंगणार जॉली विरुद्ध जॉली केस; सिनेमाच्या शूटिंगबाबत महत्त्वाची अपडेट आली समोर

Google वर जाहिराती करण्यासाठी भाजपने खर्च केले 100 कोटी; BJP पहिल्या स्थानावर तर काँग्रेस कितव्या स्थानावर? वाचा सविस्तर...

CM Yogi Aadityanath : ''काशी अन् अयोध्येनंतर आता मथुरेकडे प्रस्थान...'' योगी आदित्यनाथांचे स्पष्ट संकेत

SCROLL FOR NEXT