Akola Washim News JCB turns over 1.5 acres of pomegranate orchard 
अकोला

स्वप्न भंगले; दीड एकर डाळींबाच्या बागेवर फिरविली जेसीबी

सकाळ वृत्तसेवा

रिसोड (जि.वाशीम) : हराळ येथील शेतकरी भीमराव विक्रम बिल्लारी यांनी उत्पन्न होत नसल्यामुळे व कर्ज झाल्यामुळे, तसेच शासनाकडून अनुदान न मिळाल्यामुळे आपल्या दीड एकरावरील डाळिंबाच्या बागेवर जेसीबी फिरवून बाग नष्ट केली आहे.


अल्पभूधारक शेतकरी भीमराव बिल्लारी यांच्याकडे दीड एकर शेती आहे. फळबाग लागवडीतून चांगले उत्पन्न मिळेल या आशेवर त्यांनी दीड एकरावर गत सहा वर्षांपूर्वी डाळींबाची लागवड केली होती. सुरुवातीला २ वर्ष बऱ्यापैकी उत्पन्न झाले परंतु, मागील चार-पाच वर्षापासून उत्पन्नात मोठ्या प्रमाणात घट झाली त्यातच कर्जाचा डोंगर वाढला.

हेही वाचा - 

दीड एकरावर फळबाग असल्यामुळे इतर पिके घेता येत नव्हती व बागेपासून नही काहीच उत्पन्न मिळत नव्हते. त्यामुळे चार वर्षापासून कर्ज वाढतच गेले. शासनाच्या कृषी विभागाकडून फळबाग लागवडीकरिता अनुदान मिळते, वारंवार पाठपुरावा करूनही आजपर्यंत अनुदानही मिळाले नाही. डाळींब लागवडीपासून तीन ते साडेतीन लाख रुपये खर्च झाला आहे. त्यामुळे बिल्लारी यांच्या आर्थिक अडचणीत वाढ होत गेली. शेवटी त्यांनी डाळींबाची झाडे काढून टाकण्याचा निर्णय घेतला व सहा वर्षापासून तळहाताच्या फोडा प्रमाणे जपलेली दीड एकरावरील डाळींबाची झाडे जेसीबीच्या साह्याने नष्ट केली.

हेही वाचा -  पेट्रोल पंप दुपारी तीनपर्यंत सुरू, औषध दुकाने नियमित वेळेत

माझ्याकडे दीड एकर शेती आहे. फळबाग लागवडीतून चांगले उत्पन्न मिळेल, तसेच शासनाचे अनुदानही मिळेल म्हणून दीड एकरावरही डाळींबाची लागवड केली होती. कृषी विभागात वारंवार चकरा मारूनही अनुदान मिळाले नाही.
-भीमराव बिल्लारी, शेतकरी, हराळा.

अकोला, बुलडाणा, वाशीम जिल्ह्यातील ताज्या बातम्या - क्लिक करा

संपादन - विवेक मेतकर

अधिक वाचा - 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

शिक्षकांची नाही यंदा उन्हाळ्याची सुट्टी! एप्रिलअखेर जनगणनेचे प्रशिक्षण अन्‌ १६ मे ते १४ जूनपर्यंत करावी लागणार घरगणना, विशेष रजा मिळणार, वाचा...

Panchang 18 March 2026: आजच्या दिवशी विष्णू सहस्रनाम स्तोत्राचे पठण आणि ‘बुं बुधाय नमः’ या मंत्राचा जप करावा

मोठी बातमी! इराक-इराण युद्धाची सोलापूरकरांना झळ; सोलापूर शहरात रिक्षा चालकांनी वाढविले १० ते १५ रुपये भाडे; कोणत्या मार्गावर किती भाडे? वाचा...

आजचे राशिभविष्य - 18 मार्च 2026

अग्रलेख : धर्मस्वातंत्र्याचे तारतम्य

SCROLL FOR NEXT