Devotees death
Devotees death Sakal
अकोला

Ashadhi wari : पायी वारीत ट्रक घुसला; भाविकाचा मृत्यू, चौघे जखमी

सकाळ वृत्तसेवा

देऊळगाव राजा (जि. बुलडाणा) - आळंदी येथून पंढरपूर पायी वारीत सहभागी होण्यासाठी जाणाऱ्या तालुक्यातील दगडवाडी येथील भाविकांना ट्रकने उडविले, सदर अपघात आज देहू ते आळंदी दरम्यान घडला असून एका भाविकाचा दुर्दैवी मृत्यू तर दोघे गंभीर जखमी झाले आहे.

सदर अपघाताबद्दल प्राप्त माहितीनुसार तालुक्यातील दगडवाडी येथील २० ते २५ भाविक आळंदी येथून पंढरपूर वारीत सहभागी होण्यासाठी रविवारी रात्री निघाले होते. सकाळी देहू येथे दर्शन घेऊन आळंदीकडे पायी जात असताना शिरजगाव चिखली (जि. पुणे) नजीक ट्रक क्रमांक एम एच १२क्यूजी ५३६८ ह्या वाहनाने भाविकांना उडविले.

सदर अपघातात भगवान साहेबराव घुगे वय ३० यांचा मृत्यू झाला तर बबन कारभारी जायभाये व पुंजाबाई भुसे दोघे जण गंभीर जखमी झाले. जखमींना पुणे येथे खासगी रुग्णालयात हलविण्यात आले आहे, वारीतील अपघात ग्रस्त भाविकांना रुग्णालयात पोचविण्यासाठी पुणे येथील अमित भैय्या किशोर ढाकणे गणेश महाराज यांनी मोलाचे सहकार्य केले. दरम्यान वारीत सहभागी होण्यासाठी जाणारा मृतक हा आई-वडिलांना एकटाच मुलगा होता, यापूर्वी त्याच्या लहान भावाने आत्महत्या केली होती. सदर दुर्दैवी घटनेची माहिती मिळताच दगडवाडी गावात शोककळा पसरली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT