भूपेश बघेल
भूपेश बघेल Sakal
अकोला

भाजपने देशवासींचा विश्वासघातकेला - मुख्यमंत्री भूपेंद्रसिंह बघेल

सकाळ वृत्तसेवा

शेगाव : महागाईच्या झटक्याने देशात गरिबांचे जगणे मुश्कील झाले आहे. भाजपने देशवासींचा विश्वासघात केला. सर्वांना न्याय देण्यासाठी काँग्रेस कटिबद्ध आहे. राज्यात ओबीसींना आरक्षण मिळवून दिल्याशिवाय काँग्रेस स्वस्त बसणार नाही, असे प्रतिपादन छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेंद्रसिंह बघेल यांनी केले. शेगाव येथे आज सोमवारी (ता. २८) ओबीसी अधिकार मेळाव्यात ते बोलत होते.

येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या स्व. गजाननदादा पाटील मार्केट यार्ड पटांगणावर ओबीसी संघर्ष समितीच्या वतीने ओबीसी अधिकार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या मेळाव्यात मुख्य पाहुणे म्हणून मुख्यमंत्री भूपेंद्रसिंह बघेल, बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे दुवा, प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष संजय राठोड, खामगाव मतदारसंघाचे नेते ज्ञानेश्वर पाटील, माजी आमदार दिलीप सानंदा, प्रदेश काँग्रेस सचिव रामविजय बुरुंगले, श्याम उमाळकर, प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष संजय राठोड, धनंजय देशमुख, किरण देशमुख, तेजेंद्रसिंग चव्हाण, शैलेंद्र पाटील आदी उपस्‍थित होते. मेळाव्यात अकोला, बुलडाणा, वाशीम जिल्ह्यांतून हजारो ओबीसी समाजबांधवांची उपस्थिती होती.

केंद्राचे आडमुठे धोरण ओबीसींना मारक : नाना पटोले

ओबीसींच्या आरक्षणासाठी गरज असलेल्या इम्पिरिकल डेटाची माहिती देण्यास केंद्र सरकारकडून टाळाटाळ केली जात आहे. यामुळे ओबीसींना त्यांच्या हक्काचे आरक्षण मिळण्यास अडचण होत आहे. ओबीसींच्या आरक्षणासाठी केंद्र सरकार मुख्य आडकाठी ठरत आहे. यासाठी ओबीसी आरक्षण मिळण्यासाठी आग्रह धरण्याचे आवाहन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले.

छत्तीसगड व बुलडाणा जिल्ह्याचे नाते वेगळे

छत्तीसगडमध्ये प्रभू रामचंद्राची आई वास्तव्याला होती. तसेच बुलडाणा जिल्ह्यात जिजाऊंचे वास्तव असल्‍यामुळे बुलडाणा जिल्हा आणि छत्तीसगडमध्ये भावनिक नाते आहे. शेगाव ही गजानन महाराजांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेली भूमी आहे. या नगरीत मला यायचे सौभाग्य लाभले ही माझ्यासाठी अभिमानाची बाब आहे, असे मुख्यमंत्री भूपेंद्रसिंह बघेल यांनी म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar: शरद पवारांच्या ताफ्यातील गाड्या एकमेकांना धडकल्या, मोठा अनर्थ टळला!

T20 World Cup 2024: ICC ची मोठी घोषणा! वर्ल्ड कपसाठी अंपायर अन् मॅच रेफ्रींची झाली निवड, पाहा संपूर्ण यादी

Arvind Kejriwal: "....म्हणून आम्ही केजरीवालांच्या जामिनाचा विचार करु शकतो"; सुप्रीम कोर्टाचा ईडीला इशारा

Sobita Dhulipala :"हो मी प्रेमात आहे" ; शोबिताने दिली नागा चैतन्यवरील प्रेमाची कबुली ?

OpenAI लाँच करणार गुगलला टक्कर देणारं सर्च इंजिन! जाणून घ्या काय असेल खास?

SCROLL FOR NEXT