अकोल्यासह विदर्भात वादळी पावसाची शक्यता
अकोल्यासह विदर्भात वादळी पावसाची शक्यता fILE PHOTO
अकोला

अकोल्यासह विदर्भात वादळी पावसाची शक्यता

सकाळ वृत्तसेवा

अकोला अकोला जिल्ह्यासह विदर्भात तसेच पश्‍चिम महाराष्ट्र व मराठवाड्यातील काही ठिकाणी विजेच्या गडगटासह वादळी पावसाची संकेत हवामान विभागाने Meteorological Department दिले आहेत. Chance of heavy rains in Vidarbha including Akola

गेल्यावर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा वेळोवेळी हवामानात बदल होताना दिसत आहेत. त्यामुळे दरवर्षीप्रमाणे उन्हाची तिव्रता अद्यापर्यंत अकोल्यात जाणवली नाही. मध्यंतरी पारा ४३ अंशावर गेला होता. पंरतु, दोन दिवसातच ढगाळ वातावरणाची निर्मिती होऊन व काही ठिकाणी पावसाने हजेरी लावून तापमानाचा जोर विरला आणि कमाल तापमान ३५ ते ३८ अंशावर पोहचले. सध्या मध्य भारतातील गंगेच्या मैदानी प्रदेशात तापमान ४० अंश सेल्सिअस पेक्षा जास्त आहे. परंतु, अकोल्यात मात्र, गुरुवारी (ता.६) कमाल ३२.५ अंश सेल्सिअसची नोंद झाली. पुन्हा ढगाळ वातावरणाची निर्मिती झाली असून, गुरुवारी संध्याकाळपासूनच जिल्ह्यासह वऱ्हाडात व विदर्भात वादळी पावसाचे संकेत हवामान तज्ज्ञांनी दिले आहेत.

मध्य भारतातील हवेचा कमी दाबाचा पट्टा, तापमान वाढीसोबत अधिक सक्रिय होताना दिसत आहे. ही मॉन्सूनकरिता सकारात्मक बाजू म्हणता येईल. उपग्रह छायाचित्रानुसार पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर सोबत उस्मानाबाद-लातूर परिसरात गडगडाटासह पावसाची शक्यता असून, विदर्भात नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, नाशिक विभागात नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव इत्यादी, तर वऱ्हाडामध्ये बुलढाणा, अकोला, वाशीम, यवतमाळ इत्यादी जिल्ह्यात वादळी पावसाची शक्यता आहे.

- संजय अप्तुरकर, हवामान तज्ज्ञ, नागपूर

संपादन - विवेक मेतकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

EVM वर कमळाचं फुलं दिसत नसल्याने आजोबा संतापले...पुण्यात नेमकं काय घडलं?

Session Court : लैंगिक छळ प्रकरणात माजी पंतप्रधान आणि माजी मुख्यमंत्र्यांचे नाव वापरण्यास बंदी; न्यायालयाचा आदेश जारी

Rohit Sharma : 6,8,4,11 आणि 4... वर्ल्ड कपच्या तोंडावर रोहितला झालं तरी काय? BCCI अन् चाहते टेन्शनमध्ये

Lok Sabha Voting 3rd Phase : महाराष्ट्रात सकाळी नऊ वाजेपर्यंत सर्वात कमी मतदान; पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक मतदानाची नोंद

मतदान करण्यासाठी गेलेला मतदार जाग्यावरच कोसळला, अन्... महाड तालुक्यातील धक्कादायक घटना

SCROLL FOR NEXT