मतदान करण्यासाठी गेलेला मतदार जाग्यावरच कोसळला, अन्... महाड तालुक्यातील धक्कादायक घटना

Tragic News from Raigad Mahad: आज तिसऱ्या टप्प्यासाठी मतदान सुरु आहे. या दरम्यान महाड तालुक्यात धक्कादायक घटना घडली आहे. एका मतदाराचा जागीच मृत्यू झाला आहे.
Death of a voter who went to vote in Mahad taluka
Death of a voter who went to vote in Mahad talukaesakal

लोकसभा निवडणुकीसाठी मतदान करण्याकरता मतदान केंद्रावर पायी जात असताना एका मतदाराचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना महाड तालुक्यातील दाभेकर कोंड या ठिकाणी घडली आहे. तालुक्यातील किंजळोली  गावाजवळ असलेल्या दाभेकर कोंड मतदार केंद्रा जवळ काही मीटर अंतरावरच ही घटना घडली.

लोकसभा निवडणुकीसाठी आज रायगड मतदार संघामध्ये मतदान घेतले जात असून महाड विधानसभा मतदारसंघ मधील दाभेकर कोंड या  केंद्रावर देखील सकाळी नियोजित वेळेत मतदानाला सुरुवात झाली होती.

या मतदान केंद्रामध्ये मतदान करण्याकरता दाभेकर कोंड येथील प्रकाश चिनकटे हे सकाळी मतदानासाठी आपल्या घरून पायी निघाले होते. मतदार केंद्राजवळ काही मीटर अंतरावर आले असता त्यांना अस्वस्थ वाटू लागले. अचानक त्यांची दातखिळी बसली. व ते तेथेच खाली कोसळले मतदान केंद्रावर असलेल्या कर्मचाऱ्यांनी त्यांना खुर्चीमध्ये देखील बसवले व पुढील उपचारासाठी तात्काळ  आरोग्य केंद्रात दाखल करण्यात येत असताना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला.

Death of a voter who went to vote in Mahad taluka
सलमान खानच्या घरावर गोळीबार प्रकरणी कारवाई, शूटर्सचा सर्वात मोठ्या मदतनीसाला राजस्थानमधून अटक

प्रकाश चिनकटे यांच्या मृत्यूमुळे किंजळोली परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. हा मृत्यू नक्की कोणत्या कारणाने झाला असावा याचा तपास सुरू आहे.

Death of a voter who went to vote in Mahad taluka
EVM वर कमळाचं फुलं दिसत नसल्याने आजोबा संतापले...पुण्यात नेमकं काय घडलं?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com