TET scam
TET scam esakal
अकोला

टीईटी घाेटाळा चाैकशीसाठी समिती

सकाळ वृत्तसेवा

अकोला : शिक्षक पात्रता परीक्षेत (टीईटी) अपात्र उमेदवारांना उत्तीर्ण करून कोट्यवधींचा भ्रष्टाचार झाल्याचे उघडकीस आले. या घोटाळ्यातील प्रमाणपत्राची तपासणी करण्यासाठी राज्यस्तरावरूनच प्रत्येक जिल्ह्यात चाैकशी व अन्य बाबींसाठी दाेन वेगवेगळ्या यंत्रणांमधील अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. अकोला जिल्ह्यातून परीक्षा परिषदेकडे ५२१ प्रमाणपत्र सादर करण्यात आले आहे. यातील केवळ २३ जण शिक्षक म्हणून सध्या कार्यरत आहे.

राज्य शासनाने ता. १३ फेब्रुवारी २०१३ नंतर अनुदानित, अंशत: अनुदानित, विनाअनुदानित शाळांत पाचवी ते आठवीपर्यंत रुजू शिक्षकांचे मूळ टीईटी उत्तीर्ण प्रमाणपत्रांच्या पडताळणीचा निर्णय घेतला. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या अध्यक्षांनी सर्व संबंधित अधिकाऱ्यांना आदेश देत प्रमाणपत्र सादर करण्याचा आदेश दिला. त्यानुसार शिक्षण विभागाने प्रमाणपत्र जमा करण्याची प्रक्रिया राबविली हाेती. आतापर्यंत शिक्षण विभागाने ५२१ टीईटी प्रमाणपत्रे परीक्षा परिषदेला सादर केली आहेत. शिक्षण विभागाकडे एकूण २९ प्रमाणपत्र जमा झाली हाेती. यात प्राथमिक शिक्षणाधिकारी कार्यालयात १८ आणि ११ प्रमाणपत्र माध्यमिक विभागात जमा झालेली हाेती.

प्राथमिक शिक्षण विभागाकडे ४९२ प्रमाणपत्रे पडून हाेती. अकाेट येथे घाेळाच्या कालावधीतील पाच प्रमाणपत्रधारक आढळून आले हाेते. मूर्तिजापूर, बाळापूर, तेल्हारा, पातूर न.प. व बार्शीटाकळी नगर पंचायतअंतर्गत त्या कालावधीतील प्रमाणपत्रधारक आढळून आलेले नाहीत. महानगरपालिका क्षेत्रातील सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांना टीईटी प्रमाणपत्र सादर करण्याचा आदेश अकाेला पंचायत समितीने यापूर्वीच दिला आहे. हे प्रमाणत्र पुणे येथील राज्य परीक्षा परिषदेला सादर करण्यात येणार आहेत. अद्याप मनपाकडून स्पष्ट अहवाल शक्षण विभागाला प्राप्त झालेला नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 LSG vs RR : केएल शेर तर संजू सवा शेर! राजस्थानचा एक पाय प्ले ऑफमध्ये

DC vs MI : गोलंदाजीतली 'गळती' मुंबईच्या मुळावर; बॅटिंगमध्ये फर्स्ट क्लास तर बॉलिंगमध्ये नापास

Jolly LLB 3 : आता रंगणार जॉली विरुद्ध जॉली केस; सिनेमाच्या शूटिंगबाबत महत्त्वाची अपडेट आली समोर

Google वर जाहिराती करण्यासाठी भाजपने खर्च केले 100 कोटी; BJP पहिल्या स्थानावर तर काँग्रेस कितव्या स्थानावर? वाचा सविस्तर...

CM Yogi Aadityanath : ''काशी अन् अयोध्येनंतर आता मथुरेकडे प्रस्थान...'' योगी आदित्यनाथांचे स्पष्ट संकेत

SCROLL FOR NEXT