GST evasion
GST evasion sakal
अकोला

जीएसटी चुकवेगिरी करणे आले अंगलट उद्योजक टावरी विरोधात गुन्‍हा दाखल

सकाळ वृत्तसेवा

खामगाव : वस्‍तू व सेवा कर चुकविण्यासाठी एका उद्योजकाकडून बनावट प्रतिज्ञापत्र, बोगस दस्‍तऐवज आणि नकली कागदपत्रांचा आधार घेण्यात आल्‍याचे कटकारस्‍थान खामगावात उघड झाले. तब्‍बल एक कोटी ७८ लाख २१,३५ रुपयांच्‍या करचुकवेगिरीप्रकरणी अखेरीस एमआयडीसीतील देवकी ॲग्रोचे संचालक नितीनकुमार मोहनलाल टावरी यांच्‍याविरोधात विविध कलमान्‍वये गुन्‍हा दाखल करण्यात आला.

यानिमित्‍ताने डाळीवर कर आकारणारा देशातील पहिला निर्णय खामगाव वस्‍तू व विक्रीकर विभागाने पारित केल्‍याची माहिती यानिमित्‍ताने देण्यात आली. उद्योजकांकडून खामगाव कार्यालयात सादर प्रतिज्ञापत्राच्‍या सत्‍यता पडताळणीसाठी जीएसटी कार्यालयाकडून तहसीलदारांना २३ नोव्‍हेंबर २०२१ रोजी पत्र देण्यात आले. पडताळणीदरम्‍यान प्रतिज्ञापत्रावरील बारकोड आणि प्रतिज्ञापत्राचा क्रमांक बनावट आढळून आला.

तसेच वस्‍तू व सेवाकर कार्यालयात प्रमाणपत्र सादरीकरणाच्‍या स्‍थळप्रतीवरील कर सहायक यांची स्‍वाक्षरी बनावट असल्‍याचे निष्पन्न झाले. तसेच आवक-जावक पुस्‍तिकेत कोणतीही नोंद आढळून आली नाही. कर चुकविण्यासाठी संबंधितांनी ठरवून गुन्‍हा केल्‍याचे खामगाव जीएसटी कार्यालयाच्‍या लेखा परीक्षणात आढळून आले. त्‍यामुळे त्‍यांना एडीटी-02 व डीआरसी ०१ या दोन सांकेतिक नोटीस बजावण्यात आल्‍या. त्‍यानंतर सर्व कारस्‍थान उघड झाल्‍याने करचुकवेगिरीचे मोठे घबाड समोर आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT