Everyone must exercise right to vote ajit kumbhar over lok sabha election
Everyone must exercise right to vote ajit kumbhar over lok sabha election  Sakal
अकोला

Akola News : प्रत्येकाने बजावावा मतदानाचा हक्क : जिल्हाधिकारी कुंभार

सकाळ वृत्तसेवा

अकाेला : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात अकाेला लोकसभा मतदारसंघासाठी २६ एप्रिल रोजी मतदान होत असून यासाठी प्रशासन पूर्णपणे सज्ज आहे. निवडणूक शांततेत पार पाडवी यासाठी कडेकाेट बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे.

त्यामुळे निवडणुकीत प्रत्येक मतदाराने मतदानाचा हक्क बजवावा असे निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी याबाबत गुरुवारी (ता. २५) पत्रपरिषदेत केले. लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रक्रियेत शुक्रवारी (ता. २६) मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे.

सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत मतदार मतदानाचा हक्क बजावू शकतील. मतदान शांततेत पार पडावे यासाठी जिल्हा प्रशासनाने चोख व्यवस्था केली असून मतदारांनी निर्भयपणे मतदान करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी अजित कुंभार यांनी पत्रकार परिषदेत केले.

ते पुढे म्हणाले की, अकाेला लाेकसभा मतदारसंघात सहा विधानसभा मतदार संघांचा समावेश असल्यामुळे दोन हजार ५६ मतदान केंद्र निश्चित करण्यात आले आहेत. त्यासाठी दोन हजार २८६ मतदान पथके नियुक्त करण्यात आली आहेत. त्यात राखीव पथकांचाही समावेश आहे. कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीकाेणातून एक हजार ३८ मतदान केंद्रावरुन ‘वेबकॉस्टिंग’ची सुविधा करण्यात आली आहे. पत्रकार परिषदेला उपजिल्हा निवडणूक अधिकारी महेश परंडेकर यांची उपस्थिती होती.

सकाळी ६ वाजता ‘मॉक पोल’

मतदान केंद्रावर सकाळी ६ वाजता ‘मॉक पोल’ घेण्यात येईल. यात सर्व उमेदवार व नोटासह निश्चित मत टाकण्यात येतील. मॉक पोल पोलिंग एजंटच्या उपस्थितीत होईल. यासाठी पोलिंग एजंटला पहाटेच मतदान केंद्रात पोहोचावे लागेल. ते न आल्यास ‘मॉक पोल’ सुरू केले जाईल. त्यानंतर सकाळी ७ वाजेपासून मतदानास सुरुवात होईल.

मतदानाची वेळ सकाळी ७ ते सायंकाळी ६ पर्यंत

मतदानाची वेळ सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत आहे. मतदान केंद्रात ६ वाजेपर्यंत रांगेत असणाऱ्या प्रत्येक मतदारांना मतदान केंद्रातील अधिकारी एक कूपन देईल. ज्यांच्याजवळ कूपन असेल त्यांचे मतदान होईपर्यंत मतदानाची प्रक्रिया सुरु राहील.

ईव्हीएम मशीन बिघडल्यास अतिरिक्त व्यवस्था

ईव्हीएम मशीन बिघडण्याची शक्यता लक्षात घेता बॅलेट युनिट, कंट्राेल युनिट व व्हीव्हीपॅट राखीव ठेवण्यात आले आहेत. काेणतेही यंत्र बिघडल्यास २० मिनीटाच्या आत संबंधित यंत्र मतदान केंद्रावर पाेहचवण्यात येईल. झाेनल ऑफिसरच्या गाडीमध्ये हे यंत्र सुरक्षित राहतील.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray:"मी काही ज्योतिषी आहे का?"; मतदानानंतर राज ठाकरेंचं पत्रकारांना उत्तर

MS Dhoni Retirement : "एमएस धोनीने मॅनेजमेंटला सांगितले..." थालाच्या निवृत्तीवर CSK अधिकाऱ्याचा मोठा खुलासा

Gullak 4: प्रतीक्षा संपली! गुल्लक-4 येणार प्रेक्षकांच्या भेटाला, कधी रिलीज होणार वेब सीरिज? जाणून घ्या

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: धर्मेंद्र, गुलजार यांच्यासह बॉलिवूडच्या दिग्गजांनी बजावला मतदानाचा अधिकार

केजरीवालांच्या ड्रॉईंग रुममध्ये नाही, पण बेडरुममध्ये आहे सीसीटीव्ही; 'आप'ने सांगितलं कारण

SCROLL FOR NEXT