Gullak 4: प्रतीक्षा संपली! गुल्लक-4 येणार प्रेक्षकांच्या भेटाला, कधी रिलीज होणार वेब सीरिज? जाणून घ्या

Gullak season 4: गुल्लक वेब सीरिजचा चौथा सीझन (Gullak season 4) प्रेक्षकांना कधी आणि कुठे पाहता येईल? याबद्दल जाणून घेऊयात..
Gullak 4
Gullak 4Esakal

Gullak 4 on OTT: ओटीटी प्लॅटफॉर्मवरील सर्वात लोकप्रिय असणाऱ्या वेब सीरिजपैकी 'गुल्लक' (Gullak) ही वेब सीरिज आहे. या वेब सीरिजचा चौथा सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या वेब सीरिजमध्ये मिश्रा कुटुंबाची कथा दाखवण्यात आली आहे. आई-वडील संतोष आणि शांती आणि त्यांची मुले अन्नू आणि अमन यांची कथा असणाऱ्या गुल्लक या वेब सीरिजच्या चौथ्या सीझनची नुकतीच घोषणा करण्यात आली आहे. गुल्लक वेब सीरिजचा चौथा सीझन (Gullak season 4) प्रेक्षकांना कधी आणि कुठे पाहता येईल? याबद्दल जाणून घेऊयात..

'गुल्लक-4' येणार प्रेक्षकांच्या भेटीला

जमील खान, गीतांजली कुलकर्णी, वैभव राज गुप्ता आणि हर्ष मायार यांच्या प्रमुख भूमिका असणाऱ्या गुल्लक या वेब सीरिजचे तीन सीझन प्रेक्षकांच्या भेटीला आले. या तीनही सीझन्सला प्रेक्षकांची पसंती मिळाली.

कधी आणि कुठे रिलीज होणार गुल्लक-4?

गुल्लक-4 या वेब सीरिजबाबत सोनी लिव्हच्या सोशल मिडिया अकाऊंटवरुन पोस्ट शेअर करण्यात आली आहे. या पोस्टमध्ये लिहिण्यात आलं, "लेकर जिंदगी की खनक, आ रही है नये किस्सों की गुल्लक!" गुल्लक-4 ही वेब सीरिज सात जूनला सोनी लिव्हवर स्ट्रीम केली जाणार आहे.

'गुल्लक' या वेब सीरिजचा पहिला सीझन 2019 मध्ये प्रदर्शित झाला. यानंतर त्याचा दुसरा सीझन 2021 मध्ये आला आणि तिसरा सीझन 2022 मध्ये आला. आता या वेब सीरिजचा चौथा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'गुल्लक-4' वेब सीरिजची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.

Gullak 4
OTT Release This Weekend: 'अनदेखी 3', मर्डर इन माहिम अन् आवेशम; वीकेंडला घरबसल्या पाहा हे चित्रपट आणि वेब सीरिज

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com