अकोला

लॉकडाउनचा होणार खरिपावर परिणाम

सकाळ वृत्तसेवा

रिसोड (जि.वाशीम) ः ग्रामीण भागात कोरोनाचा संसर्ग Corona infection मोठ्या प्रमाणात वाढत असून, कोरोनाचे संकट कायम असल्यामुळे शेतीची कामे प्रभावित झाली आहेत. पीक कर्ज Crop loan मिळण्यास विलंब होत आहे, बाजार समित्या बंद आहेत, खरीप तोंडावर आला असला, तरी शेतीच्या मशागतीसह कोणतेही नियोजन नाही, त्यामुळे यावर्षी येणाऱ्या खरीप हंगामावर लॉकडाउनचा परिणाम होणार आहे. Lockdown will affect kharif crops

ग्रामीण भागात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मागील वर्षी लॉकडाउन असतानाही शेतीची कामे सुरळीत चालू होती. ग्रामीण भागात कोरोनाचा संसर्ग नव्हता. यंदा, मात्र परिस्थिती उलट झाली आहे. शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात कोरोनाचे रुग्ण दररोज वाढत असल्यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

त्यामुळे मजूर मिळेना, मे महिन्यात शेतकरी तहान-भूक विसरून खरीप पूर्व मशागतीची कामे केली जातात. परंतु, यावर्षी मशागतीची कामे कोळंबी आहे आहेत. इंधनाचे भाव वाढल्यामुळे ट्रॅक्टर वाल्यांनी मशागतीचे भाव जवळपास दुपटीने वाढवले आहेत. बँका समोर गर्दी वाढली आहे त्यातच शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळण्यास विलंब होत आहे. बाजार समितीही बंद असल्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणी वाढ झाली आहे. भाजीपाल्याला भाव नसल्यामुळे भाजीपाल्यात गुरे सोडली आहेत. उन्हाळी मूग, सोयाबीन, भुईमूग ही उन्हाळी पिके काढणेला आली आहेत. परंतु, मजूर मिळत नसल्यामुळे संथ गतीने ही कामे चालू आहेत. या शेताची या शेताची मशागत करणे बाकी आहे.

खरीप हंगाम तोंडावर आला असून, खरिपाची खते व बियाणे खरेदी करण्याची वेळ आली आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शेतकऱ्यांसह मजुरांमध्येही भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पावसाळा केवळ एक महिन्यावर येऊन ठेपला आहे. एन वेळी मोठी धावपळ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मशागतीचे व खरिपाचे कोणतेही नियोजन नसल्यामुळे येणाऱ्या खरीप हंगामावर मोठा परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना मार्गदर्शन मिळत असले, तरी प्रत्यक्ष मात्र मोठ्या अडचणी येत आहेत.

संपादन - विवेक मेतकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT