anniversary of Sakal Varhad edition Today Nitin Banugade Patil akola sakal
अकोला

छत्रपतींचे चरित्र हाच व्यवस्थापनाचा महामंत्र

प्रा. नितीन बानगुडे पाटील : सकाळ वऱ्हाड आवृत्तीचा सहावा वर्धापनदिन सोहळा उत्साहात

सकाळ वृत्तसेवा

अकोला : जन्माआधी ज्यांच्या जीवनाचे ‘नियोजन’ ठरले ते छत्रपती शिवाजी महाराज. त्यांनी अवघ्या ५० वर्षांच्या जीवन प्रवसात शेती, व्यवसाय, उद्योग, नगररचना, युद्ध, सैन्य, शिक्षण, कला एवढेच नव्हे तर, जीवन जगताना आवश्‍यक छोट्यात छोट्या गरजांचेही व्यवस्थापन केले. त्यांचे हे जीवनचरित्र आजही व्यवस्थापनाचा महामंत्र ठरत आहे, असे प्रतिपादन प्रख्यात इतिहास अभ्यासक, लेखक प्रा. नितीन बानगुडे पाटील यांनी केले.

‘सकाळ’ वऱ्हाड आवृत्तीच्या सहाव्या वर्धापन दिन सोहळ्यानिमित्ताने मंगळवारी (ता.५) अकोला येथील गांधी मार्गावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर खुले नाट्यगृहात आयोजित व्याख्यान कार्यक्रमातून ते बोलत होते. त्यांनी छत्रपती ‘शिवाजी महाराज आणि त्यांचे व्यवस्थापन कौशल्य’ उदाहरणांसह अकोला, वाशीम, बुलडाणा येथून उपस्थित श्रोत्यांपुढे ठेवले. ‘सकाळ’चे वाचक, हितचिंतक, जाहिरातदार, वृत्तपत्र विक्रेते, शिवप्रेमी, महाविद्यालयीन विद्यार्थी-विद्यार्थिनी व तरुणाईने फुलून गेलेल्या सभागृहात शिवाजी महाराजांच्या आवडलेल्या पैलूंना टाळ्यांच्या कडकडाटात प्रतिसाद दिला.

पश्चिम विदर्भातील अकोला, बुलडाणा आणि वाशीम या तीन जिल्ह्यात ‘सकाळ’च्या वऱ्हाड आवृत्तीने सहा वर्षांची यशस्वी वाटचाल केली आहे. विकासासोबतच वऱ्हाडातील अनेक सामाजिक उपक्रमात ‘सकाळ’ने सहभाग घेत जनसामान्यांच्या सुख-दुःखात एकरुप होण्याचा प्रयत्न केला. त्यामुळेच आजही वाचकांचा विश्वास ‘सकाळ’वर कायम आहे. वऱ्हाडातील सर्वाधिक वाचल्या जाणाऱ्या वृत्तपत्रांपैकी एक असलेल्या ‘सकाळ’ने वऱ्हाड आवृत्तीच्या सहाव्या वर्धापन दिनाचे निमित्त साधून आपल्या वाचकांसाठी व अकोलेकरांसाठी खास शिवव्याख्याते प्रा. नितीन बानुगडे पाटील यांच्या व्याख्यानाचे आयोजन केले होते.

या कार्यक्रमाच्या उद्‍घाटन सोहळ्यावेळी व्यासपीठावर भाजप जिल्हाध्यक्ष आमदार रणधीर सावरकर, प्रभात किड्सचे संचालक डॉ. गजानन नारे, अस्पायरचे संचालक सचिन बुरघाटे, डीवायएसपी केशवराव पातोंड, निवासी उपजिल्हाधिकारी प्रा.संजय खडसे, महात्मा फुले निर्सिंग कॉलेजच्या प्राचार्य डॉ. श्रद्धा सुधीर ढोणे, विठ्ठल ऑईलचे व्यवस्थापकीय संचालक सिद्धार्थ रुहाटिया, व्यवस्थापक राम पाटील, चाईल्ड ॲण्ड ब्युटी केअरचे डॉ. प्रवीण अग्रवाल, संतोष कुटे कोचिंग क्लासेसचे प्रा. संतोष कुटे, माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ. सुचिता पाटेकर, व्हेक्टर अकादमीच्या संचालिका अनुराधा डिक्कर, सकाळ विदर्भ आवृत्तीचे कार्यकारी संपादक संदीप भारंबे, मुख्य जाहिरात व्यवस्थापक सुधीर तापस, वरिष्ठ वितरण व्यवस्थापक विजय वरफडे, एचआर विभागाचे व्यवस्थापक सुनील दहेकर यांच्यासह तिन्ही जिल्ह्यातील गणमान्य व्यक्तींची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सकाळचे कार्यकारी संपादक संदीप भारंबे यांनी केले. याप्रसंगी सूत्रसंचालन डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी डॉ. किशोर बिडवे यांनी केले तर, आभार सकाळचे वितरण व्यवस्थापक संतोष जुमडे यांनी केले.

पडद्याआडची माणसे ‘सकाळ’ने शोधली :आमदार सावरकर

सकाळ वृत्तपत्राने नेहमीच समाज जीवन उंचावण्यासाठी पुढाकार घेतला आहे. सकाळ हे केवळ कागदोपत्री न राहता प्रत्यक्ष कृती करणारे समाजाभिमूख माध्यम आहे. सकाळने पडद्याआडची माणसे शोधून त्यांचा सत्कार केला ही नक्कीच वाखान्याजोगी बाब आहे. यातून अनेकांना प्रेरणा मिळत राहील, असे प्रतिपादन भाजप जिल्हाध्यक्ष आमदार रणधीर सावरकर यांनी केले.

वऱ्हाडातील ‘भन्नाट’ माणसांचा गौरव

स्वतःच्या दुःखातून इतरांच्या जीवनात प्रकाश वाट शोधणारी माणसं क्वचितच सापडतात. त्यातही जगावेगळा मार्ग स्वीकारून स्वतः दगड-काटे तुडवित इतरांची वाट फुलांनी सजविण्याची स्वप्न बघतात, अशी माणसं तर ‘भन्नाट’च म्हणावी लागतील. अशाच भन्नाट व्यक्तिमत्त्वांचा गौरव ‘सकाळ’ वऱ्हाड आवृत्तीच्या सहाव्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात प्रख्यात शिवव्याख्याते प्रा. नितीन बानुगडे पाटील व इतर मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. त्यामध्ये बुलडाणा जिल्ह्यातील दुर्गम भागात सालईबनच्या माध्यमातून पर्यावरण व निसर्ग आधारित गावाचे मॉडेल उभे करणारे मनजितसिंग शीख, कर्णबधिरांचा आवाज झालेले अकोला येथील सूचिता व श्रीकांत बनसोड, तेल्हारा तालुक्यात महिलांसाठी रोजगाराच्या वाटा शोधणाऱ्या दीपिका देशमुख, बुलडाणा जिल्ह्यातील मनोयात्रींचा सहारा झालेले दिव्या फाऊंडेशनचे ज्योती व अशोक काकडे, पालावरच्या मुलांची आधुनिक शिक्षिका संगिता ढोले यांचा या प्रसंगी सत्कार करण्यात आला.

प्रा. बानगुडे पाटील म्हणाले...

  • ‘सकाळ’ने महाराष्ट्राच्या समृद्धीची ‘सकाळ’ होण्यात योगदान दिले तसेच वैचारिकता, सामाजिकता अन् सांस्कृतिकतेत ‘सकाळ’चा सक्रिय सहभाग राहिला.

  • महाराजांच्या व्यवस्थापनातून पहिले वृत्तपत्र छपाईचे काम सूरत येथील भिमजी पारेख यांनी सुरू केले.

  • शिवाजी महाराजांचे विचार घेऊन सुभाषचंद्र बोस देशाचे पारतंत्र्य घालवायला निघाले होते.

  • जिद्द, आत्मविश्‍वासातून महाराजांनी स्वराज्य निर्मिती घडवून दाखविली.

  • महाराष्ट्रात पहिले जमीन मोजणी परिमाण महाराजांनी आणले. त्यामुळे आज आपल्याकडे जमिनीचे सातबारे आहेत.

  • शिवाजी महाराजांच्या काळात एकाही शेतकऱ्याने आत्महत्या केली नाही.

  • शिवाजी महाराज धार्मिक होते मात्र, धर्मांध नव्हते.

  • महाराजांनी साडेतिनशे वर्षापूर्वी प्रचंड ग्रंथसंपदा निर्मिती केली.

  • कोणत्याही क्षेत्रात अभ्यास व व्यवस्थापन गरजेचे असल्याचे महाराजांनी कृतीतून शिकवले.

  • महाराज नौदलाचे जनक. महाराजांनी ३२ धरणे बांधली होती.

  • महाराजांकडून आपणाला दूरदृष्टी, सर्जनशीलता, उपक्रमशीलता, नवनिर्मितीचे गुण मिळाले आहेत.

  • नऊ वर्षांत ३४४ किल्ले महाराजांनी जिंकले. गडकोटांसाठी पावणेदोन लाख होनांची तरतूद केली होती. स्वराज्यामध्ये ३६० किल्ले होते.

  • शत्रूला सीमेवर अडविण्याच्या युद्धनीतीचा अवलंब करत कृतिशील कामातून तणावाचे व्यवस्थापन महाराजांनी केले.

  • औरंगजेब चाल करून आला असताना त्याने पहिला हल्ला चढविला रामशेज किल्ल्यावर. या किल्ल्यासाठी परिसरातील जनता पाच वर्षे लढत राहिली.

  • औरंगजेबाने चाल केल्यावर मुघल सल्तनत संपविण्यासाठी शिवाजी महाराजांचे व्यवस्थापन कारणीभूत ठरले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abu Azmi Vs MNS : Video - ‘’रिक्षावाले, फेरीवाल्यांना काय मारता, मारायचंच आहे ना, तर..’’ ; अबू आझमींनी ‘मनसे’ला ललकारलं!

IND vs ENG 2nd Test: शुभमनच्या २६९ धावा अन् नंतर आकाश दीपचा भेदक मारा! इंग्लंडच्या संघाची घरच्या मैदानावर झालीय वाईट अवस्था

IND vs ENG 2nd Test : शुभमन गिल OUT होताच इंग्लंडच्या चाहत्यांनी काय केलं? विश्वास बसणार नाही, Video Viral

Chicago Firing: रेस्टॉरंटबाहेर बेछूट गोळीबार; ४ जणांचा मृत्यू, १४ जण जखमी, घटनेचा थरारक व्हिडिओ व्हायरल

Nitin Gadkari flight emergency landing : मोठी बातमी! आता नितीन गडकरींच्या विमानाचे झाले इमर्जन्सी लँडिंग; जाणून घ्या, नेमकं काय घडलं...?

SCROLL FOR NEXT