No water planning for a day Akola Just wait another month
No water planning for a day Akola Just wait another month sakal
अकोला

अकोला : एक दिवसाआड पाण्याचे नियोजन होईना!

सकाळ वृत्तसेवा

अकोला : उन्हाळ्याची चाहुल लागताच पाण्याचा वापरही वाढतो आहे. अशातच महानगरपालिका क्षेत्रात एक दिवसाआड पाणी देण्याचे नियोजन सुरू आहे. पदाधिकाऱ्यांचा कार्यकाळ संपला असून, प्रशासकही नियुक्त झाले. मात्र, अद्यापही नियोजन पूर्ण झाले नसल्याने आणखी महिनाभर नागरिकांना प्रतीक्षा करावी लागणार आहे.

अकोला शहरातील जुन्या जलसाठवण टाक्या आणि अमृत योजनेतून बांधण्यात आलेल्या नवीन टाक्यांसह १३ च्या वर टाक्या आहेत. काहींचे निर्माण कार्य सुरू आहे तर काहींचे बांधकाम पूर्ण होऊनही पूर्ण क्षमतेने साठवणूक करणे तांत्रिक अडचणीमुळे शक्य झाले नाही. परिणामी गेले काही महिन्यांपासून शहरात एक दिवसाआड पाणी नियमितपणे देण्याचे नियोजन मनपा प्रशासनाला करता आले नाही.

मनपा जलप्रदाय विभागाकडून याबाबत शहरातील केशवनगर व श्रद्धा कॉलनी या भागात प्रायोगिक तत्वावर हा प्रयोग सुरू करण्यात आला होता. मात्र, नंतर तोही बंद पडला होता. आता पुन्हा या भागात एक दिवसाआड पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. उर्वरित शहरातील ५० टक्के परिसरात येत्या महिनाभरात एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचे नियोजन मनपा जलप्रदाय विभागातर्फे सुरू आहे. उर्वरित परिसरातही एक दिवसाआड पाणीपुरवठा केला जाईल. त्यासाठी मात्र, मे किंवा जूनपर्यंत नागरिकांना प्रतीक्षा करावी लागू शकते.

पाण्याचा अपव्य ४० टक्क्यांच्यावर

अकोला शहरातील पाणीपुरवठ्यातील सर्वांत मोठी अडचणी म्हणजे वाया जाणारे पाणी. सध्या शहराला गरजेपेक्षा १० टक्के कमी पाणीपुवरठा होतो आहे. मात्र, जो पाणीपुरवठा होतो, त्यात ४० टक्के पाणी हे विविध मार्गाने वाया जात असल्याचे दिसून आले आहे. नळाला तोट्या नसणे, अवैध नळ जोडणी आणि नागरिकांकडून पाणी भरणे झाल्यानंतरही तोट्या नसल्याने पाणी नालीमध्ये सोडून देण्याचे प्रकार होत असल्याने प्रशासनाचे एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचे नियोजन बिघडत आहे.

जलवाहिन्यांची गळती कमी

अमृत योजनेतून पाणीपुरवठ्यासाठी नवीन जलवाहिन्या टाकण्यात आल्याने जलवाहिन्यांची गळती बऱ्यापैकी कमी झाल्याचा दावा प्रशासनाकडून केला जात आहे. मात्र, अद्यापही काही भागातील जलवाहिन्यांची गळती सुरू असल्याने त्यातूनही पाण्याचा अपवय होतो आहे.

दीडपट अधिक पाण्याची गरज

अकोला शहरात दररोज पाणीपुरवठा करण्याचे नियोजन अशक्य असल्याने एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्याची तयारी प्रशासनाने सुरू केली आहे. प्रशासनाच्या नियोजनाप्रमाणे पाणीपुरवठा सुरू झाल्यास सध्या आहे त्यापेक्षा दीड पट अधिक पाण्याची गरज भासणार आहे. मात्र, अधिकचे पाणी पहिल्याच आठवड्यात लागेल. त्यानंतर हळूहळू पाण्याची गरज कमी होत जाईल. सध्या अकोला शहरात महान येथील जलशुद्धीकरण केंद्रावरून दररोज सात कोटी ७० लाख लिटर पाण्याचा पुरवठा केला जातो.

२५ हजारांवर अवैध नळ जोडण्या

अकोला महानगरपालिका जलप्रदाय विभागाकडे नोंदणी असलेल्या अधिकृत नळ जोडण्याची संख्या ६३ हजार आहे. प्रत्यक्षात अकोला शहरात ९० हजारांवर घरांमध्ये नळ जोडण्या आहेत. याचाच अर्थ अद्यापही शहरातील विविध भागात २५ हजारांवर अधिक अनधिकृत नळ जोडण्या आहेत. त्यात जुने शहर व अकोट फैलमधील काही भाग प्रामुख्याने येत असल्याची माहिती आहे. या अनधिकृत नळ जोडण्या शोधून त्या अधिकृत करण्याचे मोठे आव्हान प्रशासनापुढे आहे.

काटेपूर्णा प्रकल्पात ५३ टक्के जलसाठा

अकोला शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या महान येथील काटेपूर्णा प्रकल्पात ता. १५ मार्च रोजी सकाळी घेण्यात आलेल्या नोंदीप्रमाणे ५३.६ टक्के जलसाठा आहे. त्यामुळे यावर्षी अकोला शहराला पाणीपुरवठा करण्यात कोणतीही अडचण येणार नाही. उन्हाळ्यातील एप्रिल-मे व पावसाळा सुरू झाल्यानंतर जून या तीन महिन्यांसाठी हा साठा पुरेशा आहे.

''अकोला शहराला एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचे नियोजन आहे. सध्या केशवनगर व श्रद्धा कॉलनी भागात एक दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. येत्या महिनाभरात ५० टक्के शहरात एक दिवसाआड पाणीपुरवठा सुरू होईल. संपूर्ण शहरासाठी किमान दोन महिने किंवा त्यापेक्षा अधिक कालावधी लागू शकतो.''

- सुरेश हुंगे, कार्यकारी अभियंता, जलप्रदाय विभाग, मनपा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar: "अरे मामा जरा जपून... तुझं सर्व काढायला वेळ लागणार नाही"; इंदापुरात शरद पवारांचा इशारा!

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : ऋतुराजने पुन्हा नाणेफेक गमावली; पंजाबने घेतला गोलंदाजीचा निर्णय

Lok Sabha : 'एक भाकरी, एक रूपया द्या.. एका भिक्षुकाला पंतप्रधान करा' म्हणणाऱ्या विजयप्रकाश कोंडेकरांकडे किती आहे संपत्ती?

Latest Marathi News Live Update : राहुल गांधी यांनी वायनाडच्या लोकांशी केलेली फसवणूक - गौरव वल्लभ

South India Travel : उन्हाळ्यातही करू शकता दक्षिण भारताची सफर; जाणून घ्या 'ही' थंड हवेची ठिकाणं

SCROLL FOR NEXT