Sharad Pawar: "अरे मामा जरा जपून... तुझं सर्व काढायला वेळ लागणार नाही"; इंदापुरात शरद पवारांचा इशारा!

Sharad Pawar:  तिसऱ्या टप्प्यातील मतदान ७ तारखेला पार पडणार आहे. बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळे यांच्या प्रचारासाठी शरद पवार यांनी इंदापूर येथे सभा घेतली. यावेळी त्यांनी दत्तामामा भरण यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला.
Sharad Pawar
Sharad Pawaresakal

Sharad Pawar: सत्तेचा गैरवापर करुन कोणी दमदाटी करत असाल तर त्यांना जागा दाखवा. शेतीचं पाणी कुणाच्या बापाची मालकी नाही. काही लोकांना सत्तेचा माज चढला आहे. देशात अनेक राज्यात भाजपची सत्ता नाही, असे शरद पवार इंदापुरात म्हणाले, सुप्रिया सुळे यांच्या प्रचाराच्या सांगता सभेत शरद पवार बोलत होते.

शरद पवार म्हणाले, माझा घसा बसला त्यामुळे सांभाळून घ्या...उन्हाळा आहे, सतत भाषणे याचा परिणाम घशावर झाला. ही निवडणूक देशाची आहे. देशाला नवीन रस्ता दाखवण्याची गरज आहे. त्यामुळे ही निवडणूक महत्वाची आहे. भाजपच्या हातात देशाचे राज्य आहे. संपूर्ण देशाचे राज्य दिल्यानंतर देखील ज्याप्रकारे ते निर्णय घेतात यावर देश नाराज आहे.

इंडिया आघाडी नवीन संघटन काढल्यानंतर परिस्थिती बदलत चालली आहे. देशात अनेक राज्यात भाजपची सत्ता नाही. भाजपचा पराभव आता करावा लागेल. देशात रोजगार नाही. भाजपवाले दमदाटी करत, दहशत माजवतात. या गोष्टीकडे बारकाईने पाहिले पाहिजे. जनतेला आता बदल हवा असल्याचे शरद पवार म्हणाले.

Sharad Pawar
Gulabrao Patil: भाजपवाल्यांनी काम केलं नाही तर आम्ही... गुलाबराव पाटलांच्या वक्तव्यामुळे BJP कार्यकर्त्यांमधे संभ्रम

इंदापुरात एक आहेत, ज्यांना मी आमदार केलं, मंत्री केलं. विरोधकांना मदत केली तर शेतीचं पाणी बंद करु असं इथं सांगण्यात आलं. शेतीचं पाणी काय बापजाद्याची इस्टेट नाही, मी एवढेच सांगतो अरे मामा जरा जपून...कुणाला बोलतो..तुझं सर्व काढायला वेळ लागणार नाही, असा इशारा देखील शरद पवार यांनी दिला. (Baramati loksabha)

ज्यांच्यासाठी भूमिका घेतली त्यांचे पाय आज जमिनीवर नाहीत, हवेत आहे. सत्तेचा गैरवापर करु नका.  दमदाटी करत असताल तर १ ते २ दिवसात आम्ही तुम्लाहा जागा दाखवू शकतो, असे शरद पवार म्हणाले. 

Sharad Pawar
Gulabrao Patil: भाजपवाल्यांनी काम केलं नाही तर आम्ही... गुलाबराव पाटलांच्या वक्तव्यामुळे BJP कार्यकर्त्यांमधे संभ्रम

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com