PM Insurance Scheme installment Increased
PM Insurance Scheme installment Increased sakal
अकोला

पंतप्रधान विमा योजनेच्या हप्त्यात वाढ

सकाळ वृत्तसेवा

शिरपूर : केंद्र सरकारने नुकतीच पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजना (पीएमजेजेबीवाय) आणि पंतप्रधान सुरक्षा विमा योजनेच्या( पीएमएसबीवाय) चा हप्ता वाढवला आहे. या दोन्ही विमा योजना केंद्र सरकारच्या प्रमुख विमा योजना आहेत. केंद्र सरकारने पंतप्रधान जीवन ज्योति विमा योजनेचा वार्षिक हप्ता आता ३३० वरून ४३६ केला असून, पंतप्रधान सुरक्षा विमा योजनेसाठी वार्षिक प्रिमियम१२ रुपयाहून वाढवून २० रुपये करण्यात आला आहे. हे नवे दर एक जून पासून लागू झाले आहेत. ही योजना गरीब व सामान्य वर्गासाठी लाभदायक असली तरी त्यांचा भुर्दंड लाभार्थ्यांना सहन करावा लागणार आहे. (PM Insurance Scheme installment Increased)

विमा ही प्रत्येक व्यक्तीसाठी आवश्यक बाब असली तरी गरीब सामान्य लोकांना जिथे रोज काम करून पोट भरावे लागते,तिथे विमा काढणे ही दूरची गोष्ट आहे .विमा ही आवश्यक बाब हे पटवून देऊनही त्याकडे दुर्लक्ष केले जाते. तथापि उपरोक्त दोन्ही सरकारी विमा योजना ह्या चांगल्या आहेत.सर्वसामान्य नागरिक मात्र आपल्या बँक खात्यात कशीतरी काटकसर करून आतापर्यंत एक ठराविक रक्कम वाचवून ठेवत होते. त्यांना आता ३३० रुपये वरून ४३६ रुपये द्यावे लागणार आहेत.

या दोन्ही योजनांच्या अंतर्गत लाभार्थींच्या बँक खात्यामध्ये थेट लाभ हस्तांतरणच्या माध्यमातून द्यावयाची रक्कम जमा केली जात आहे. या दोन्ही योजनांमध्ये मागील सात वर्षांत कुठलाच बदल करण्यात आला नव्हता, नवे दर अन्य खासगी विमा कंपन्यांनाही योजनेत लागू करण्यास प्रोत्साहित करतील. यामुळे विमा योजनांच्या लाभार्थ्यांच्या संख्येत वृद्धी होणार असल्याचा सरकारचा दावा आहे.

पंतप्रधान जीवन ज्योति विमा योजनेअंतर्गत वार्षिक प्रिमियम वर दरवर्षी दोन लाख रुपयांचे विमा संरक्षण उपलब्ध आहे.टर्म इन्शुरन्स असल्याने पॉलिसी धारकांच्या मृत्यूनंतरच यामध्ये कव्हरेजचा लाभ मिळत असून,मुदत संपल्यानंतरही तो ठीक राहिल्यास योजनेअंतर्गत कोणताही लाभ दिला जाणार नाही. सदर व्यक्तीला योजनेचा लाभ मिळणार नाही. पंतप्रधान जीवन ज्योति विमा योजनेच्या अंतर्गत विमाधारकाचा मृत्यू झाल्यास वर्षाला दोन लाख रुपये मिळतात, या योजनेचा लाभ अठरा ते पन्नास या वयोगटातील कुठलाही व्यक्ती घेऊ शकतो.

पंतप्रधान सुरक्षा विमा योजनेच्या अंतर्गत दुर्घटनेत विमाधारकाचा मृत्यू झाल्यास किंवा पूर्ण दिव्यंग प्राप्त झाल्यास दोन लाख रुपयांची भरपाई मिळते. या योजनेच्या अंतर्गत विमाधारक अंशिक दृष्ट्या दिव्यांगाझाल्यास एक लाख रुपयांची मदत मिळते. या योजनेत १८ ते ७० या वयोगटातील कुठलाही व्यक्ती यात सामील होऊ शकतो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT