police Action on online lottery gambling 2 arrested goods seized akola crime
police Action on online lottery gambling 2 arrested goods seized akola crime Sakal
अकोला

Akola Crime : ऑनलाईन लाॅटरी जुगारावर पोलिसांची कारवाई; दोघांना अटक, ६३ हजार ४७० रुपयांचा मुद्देमाल जप्त

सकाळ वृत्तसेवा

Akola News : ऑनलाईन लॉटरी जुगार खेळणाऱ्या दोन आरोपींना अटक करुन पोलिसांनी आरोपींकडून ६३ हजार ४७० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. सदर कारवाई उपविभागीय पोलिस अधिकारी यांच्या पथकाने केली.

खदान पोलिस स्टेशन हद्दीतील सिंधी कॅम्प येथील आशा मुव्हिज गिफ्ट गॅलरीच्या बाजुला असलेल्या दुकानात अवैधरित्या विना परवाना राजश्री लोटो ऑनलाईन लाॅटरीचा जुगार खेळल्या जात आहे, अशी माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी यांच्या पथकाला मिळाली. त्यामुळे पथकाने ६ मार्च रोजी छापा मारुन आरोपी विजयकुमार पंजुमल उर्फ होलाराम रोहाडा (वय ५९, रा. कच्ची खोली, सिंधी कॅम्प),

अश्विन काशीनाथ सरदार (वय ३३, रा. कैलास टेकडी खदान) यांना ताब्यात घेतले. आरोपींना लॉटरीबाबत कागदपत्रांची मागणी केली असता त्यांच्याजवळ कुठलेही कागदपत्र नसल्याने दोन्ही आरोपींकडून आणि घटनास्थळावरून एकूण ६३ हजार ४७0 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

जप्त माल व आरोपींना खदान पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. ही कारवाई उपविभागीय पोलिस अधिकारी शहर विभाग सतीश कुलकर्णी यांच्या पथकातील पोलिस कर्मचाऱ्यांनी केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'शरद पवारांनी भाजपला पाठिंबा दिला होता, ती जर सुपारी होती तर आमचीही..'; आव्हाड, राऊतांच्या टीकेला मनसे आमदाराचं प्रत्युत्तर

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE : Lok Sabha Election 2024 : जाणून घ्या 6 वाजेपर्यंत महाराष्ट्रातील मतदानाची टक्केवारी

Lok Sabha Election 2024 : मतदान केंद्रावरील निवडणूक आयोगाने दिलेल्या सुविधांचा मतदारांना दिलासा

Latest Marathi Live News Update : कंगना रणौत यांच्या रॅलीवर दगडफेक; काँग्रेसविरोधात निवडणूक आयोगाकडे भाजपची तक्रार

Devendra Fadanvis: 'उद्धव ठाकरेंचं रडगाणं सुरू, पराभव समोर दिसू लागल्यानेच त्यांची मोदींवर टीका'; देवेंद्र फडणवीसांचा आरोप

SCROLL FOR NEXT