अकोला

दोन जुगार अड्ड्यांवर पोलिसांचे छापे

सकाळ वृत्तसेवा

अकरा आरोपींना अटक; ४१ हजारांचा माल जप्त; विशेष पथकाची कारवाई

अकोला : जिल्हा पोलिस अधीक्षकांच्या (akola police)पथकाने शनिवारी (ता. २५) दोन जुगार अड्ड्यांवर छापे मारून एकूण ११ आरोपींना अटक (arrest)केली. सदर आरोपींकडून पोलिसांनी तब्बल ४१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. विशेष पथकातील पोलिस कर्मचाऱ्यांना माहिती मिळाली की अकोट फाईल पोलिस स्टेशन हद्दीतील एफसीआय गोदामासमोर काही जण जुगार खेळत आहेत.

त्यामुळे पथकातील पोलिस कर्मचाऱ्यांनी सदर ठिकाणी छापा टाकून आरोपी शे. अजहर शे. अफसर (वय ३३, रा. खदान), राजू बबन घोडके (वय ३४, रा. लाडीस फाईल), रमेश शामलाल खरारे (वय ४२, रा. लाडीस फाईल), सुरेंद्र पांढरी मानवटकर (वय ५८, रा. अकोट फाईल), प्रवीण लक्ष्मण गायकवाड (वय ४९, रा. अकोट फाईल) भारत अंकुश क्षीरसागर (वय ३९, रा. अण्णा भाऊ साठे नगर), आतीष देविदास सोनोने (वय ३९, आंबेडकर चौक), स्वप्नील मधुकर सावंग (वय २९, शंकर नगर) यांना अटक केली. आरोपींकडून पोलिसांनी रोख २८ हजार रुपये आणि जुगार साहित्य एका एकूण २८ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी आरोपींच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

उगवा येथे कारवाई; तिघांना अटक

जिल्हा पोलिस अधीक्षकांच्या विशेष पथकाने शनिवारी (ता. २५) उगवा येथील जुगार अड्यावर छापा मारला. यावेळी पोलिसांनी आरोपी अनुप गणेश राऊत (वय २५, रा. धनगर पुरा उगवा), शाम बाबुलाल पाठव (वय ४२, रा. शिवाजी चौक उगवा), सुनील प्रल्हाद सिरसाट (वय ३८, रा. आगर रोड) यांना अटक केली. आरोपींकडून पोलिसांनी रोख ६ हजार ३० रुपये व जुगार साहित्य जप्त केले आहे. या प्रकरणी अकोट फाईल पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Avinash Bhosale: पुण्यातील उद्योजक अविनाश भोसलेंना दिलासा! अखेर जामीन मंजूर

Gujarat News : 'तिला' डॉक्टर व्हायचं होतं, बोर्डाच्या परीक्षेत ९९ टक्के मिळाले; पण दुर्दैव...

EPFO Latest News : PF अकाउंटमधून तीन दिवसात मिळणार एक लाख रुपये, करा फक्त 'हे' काम

Share Market Closing: शेअर बाजार तेजीसह बंद; सेन्सेक्स 73,917 आणि निफ्टी 22,465 अंकांवर, कोणते शेअर्स वधारले?

Yed Lagla Premach: 'येड लागलं प्रेमाचं' मालिकेत 'या' अभिनेत्याची एन्ट्री; दिसणार इन्सपेक्टर जय घोरपडेच्या भूमिकेत

SCROLL FOR NEXT