Yed Lagla Premach: 'येड लागलं प्रेमाचं' मालिकेत 'या' अभिनेत्याची एन्ट्री; दिसणार इन्सपेक्टर जय घोरपडेच्या भूमिकेत

Marathi Serial Update: येड लागलं प्रेमाचं (Yed Lagla Premach) या मालिकेचा नवा प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
'येड लागलं प्रेमाचं' मालिकेत 'या' अभिनेत्याची एन्ट्री
Yed Lagla Premachsakal
Updated on

Yed Lagla Premach Serial Update: अभिनेता विशाल निकम (Vishal Nikam) आणि अभिनेत्री पूजा बिरारी (Pooja Birari) यांच्या येड लागलं प्रेमाचं (Yed Lagla Premach) या नव्या मालिकेची चर्चा गेल्या काही दिवसांपासून होत आहे. अशातच आता या मालिकेत आणखी एका प्रसिद्ध अभिनेत्याची एन्ट्री होणार आहे. लवकरच मालिकेतलं आणखी एक महत्त्वाचं पात्र म्हणजेच इन्सपेक्टर जय घोरपडे प्रेक्षकांसमोर येणार आहे. जय कामात हुशार असला तरी लाचखाऊ आहे. तो जिथे रहातो तिथे त्याचा दबदबा आहे. लोकांना मदत करणं हे त्याचं कर्तव्य आहे असं तो सांगतो पण एकही काम स्वार्थाशिवाय करत नाही. अडचणीच्या वेळी मदत केल्याचं तो भासवतो पण अडकवणाराही बऱ्याचदा तोच असतो. रिअ‍ॅलिटी शोज गाजवलेला लोकप्रिय अभिनेता जय दुधाणे इन्सपेक्टर जय घोरपडेची भूमिका साकारणार आहे.

'येड लागलं प्रेमाचं' मालिकेत 'या' अभिनेत्याची एन्ट्री
Yed Lagla Premach : विशाल-पूजाची 'येड लागलं प्रेमाचं' ही मालिका आहे 'या' गाजलेल्या मालिकेचा रिमेक

अभिनेता जय दुधाणे या मालिकेच्या निमित्ताने पहिल्यांदाच पोलिसाची व्यक्तिरेखा साकारणार आहे. या अनुभवाविषयी सांगताना तो म्हणाला, 'मी पहिल्यांदा पोलीस इन्सपेक्टरची भूमिका साकारतोय. माझे काका पोलीस खात्यात असल्यामुळे त्यांचं मार्गदर्शन मिळत आहे. आव्हान खूप मोठं आहे. व्यायाम माझं पॅशन आहे. या भूमिकेसाठी शरीरयष्ठीवर जास्त मेहतन घेतोय. विशालसोबत याआधी काम केल्यामुळे आमची ओळख होतीच. पूजासोबत पण छान मैत्री जमली आहे. आम्हा तिघांचे सीन्स खूप छान होत आहेत. विशाल आणि पूजा सहकलाकार म्हणून उत्तम आहे. सोबतच नीना कुळकर्णी आणि अतिषा नाईक यांच्यासारखे दिग्गज कलाकार आहेत. या सगळ्या कलाकारांसोबत काम करण्याची संधी मिळतेय यासाठी मी स्वत:ला खूप भाग्यवान समजतो. मालिकेमुळे घराघरात पोहोचता येतं. त्यामुळे प्रेक्षकांची पसंती मिळावी हीच अपेक्षा आहे." येड लागलं प्रेमाचं २७ मे पासून रात्री १० वाजता स्टार प्रवाहवर.

'येड लागलं प्रेमाचं' मालिकेत 'या' अभिनेत्याची एन्ट्री
Yed Lagla Premach: पंढरपुरच्या राया आणि मंजिरीची हटके प्रेमकहाणी; 'येड लागलं प्रेमाचं' मालिकेचा प्रोमो पाहिलात?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com