prevention of atrocities against women cell rescue a girl police action akola
prevention of atrocities against women cell rescue a girl police action akola Sakal
अकोला

Akola Crime News : अनैतिक मानवी वाहतूक कक्षाने केली अपहृत पीडितेची सुटका

सकाळ वृत्तसेवा

Akola News : अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षातर्फे डाबकी रोड पोलिस स्टेशनच्या हद्दीतील अपहृत पीडितेची सुटका करण्यात यश मिळविले. या कक्षाने आतापर्यंत ११४ जणांची सुटका केली आहे.

पोलिस अधीक्षक बच्चन सिंह तसेच अपर पोलिस अधीक्षक अभय डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली अनैतिक मानवी वाहतुक कक्ष महिला व बाल अत्याचारासंदर्भाने कलम ३६३, ३६६(अ) भादवि तसेच महीला मिसिंग चा तपास करत आहे. अनैतिक मानवी वाहतुक कक्षाने आज पावेतो एकूण ८१ गुन्हे व ३३ मिसिंग, असे एकूण ११४ प्रकरणे उघडकिस आणले आहेत.

पोलीस स्टेशन डाबकी रोड येथे नोंदविलेल्या गुन्ह्याचा तपास करताना गुन्ह्यातील पीडित मुलगी व आरोपी यांचा मिळालेल्या माहिती नुसार शोध घेण्यात आला. अमरावती, शेगाव, नाशिक, यवतमाळ, येथे शोध घेतला असता मिळून आले नाही.

गुप्तबातमीदाराकडून खात्रीलायक माहिती मिळाली की, आरोपी व पीडित मुलगी हे रुपीनगर तळवाडे, चिखली, जि. पुणे येथे राहत आहेत. त्यावरून चिखली पोलिस स्टेशन पुणे येथे जावुन गुन्ह्याबाबत माहिती दिली व आरोपीसह पीडित मुलीला शोधून काढले.

दोघेही भाड्याचे खोलीत मिळून आले. त्यांना गुन्ह्याबाबत सविस्तर माहिती देवून विचारपुस केली. पीडित मुलगी व आरोपी यांना ताब्यात घेवून अकोला येथे आणले. वरिष्ठांना केलेल्या तपासाबाबत माहिती देवून पुढील तपासकामी पो.स्टे. डाबकी रोड यांच्या ताब्यात देण्यात आले.

ही कार्यवाही पोलिस अधीक्षक बच्चन सिंह, अपर पोलिस अधीक्षक अभय डोंगरे, उपविभागिय पोलिस अधिकारी सुभाष दुधगावकर, यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि विजय खर्चे, सूरज मंगरूळकर, धनराज चव्हाण, पुनम बचे, अविंद्र खोडे, गणेश खुपसे, नाजीया यांनी केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: मुंबई दक्षिण मध्य मतदारसंघात सकाळी ९ वाजेपर्यंत सरासरी 8 टक्के मतदान

Akshay Kumar: खिलाडी अक्षय कुमारनं भारताचं नागरिकत्व मिळाल्यानंतर पहिल्यांदाच केलं मतदान; म्हणाला, "माझा भारत देश हा..."

Latest Marathi Live News Update: सुनील राऊत पोलिसांवर भडकले

PM Modi : मतपेढीच्या तुष्टीकरणासाठी संस्थांना धमक्या; पंतप्रधानांची ममतांवर टीका

Standing Problems: तुम्हीही जास्त वेळ उभे राहत असाल तर वाढू शकतात 'या' समस्या

SCROLL FOR NEXT