आक्रोश आंदोलन
आक्रोश आंदोलन sakal
अकोला

रिसोड : स्टेट बँकेत शेतकऱ्यांचे आक्रोश आंदोलन

सकाळ वृत्तसेवा

रिसोड : तालुक्यातील केनवड येथील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या तत्कालीन शाखाधिकाऱ्यांनी २०१७ साली खातेदार शेतकऱ्यांच्या खात्यातून कुठलीही पूर्व सूचना न देता डेब्ट ॲडजेस्मेंट इंशुसन्सच्या नावाखाली शेतकऱ्यांच्या खात्यात बेकायदेशीर रक्कम टाकली. या गैरकायदेशीर व्यवहाराची चौकशी होऊन खातेदार शेतकऱ्यांना न्याय मिळण्यासाठी प्रा. प्रशांत गोळे पाटील यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांसह सोमवारी (ता. २०) बँकेसमोर धरणे आंदोलन करण्यात आले.

केनवड येथील स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेच्या वतीने २०१७ साली खातेदार शेतकऱ्यांची कोणतीही पूर्वपरवानगी न घेता किंवा कोणतीही लेखी माहिती न देता तत्कालीन शाखाधिकाऱ्यांनी त्यांच्या पदाचा दुरुपयोग करून केनवड परिसरातील शेकडो शेतकऱ्यांच्या खात्यातून मोठ्या प्रमाणात डेब्ट ॲडजेसमेंट इंशुरन्सच्या नावाने शेतकऱ्यांच्या खात्यावर अतिरिक्त रक्कम बेकायदेशीर टाकली असा, धक्कादायक आरोप केनवड परिसरातील खातेदारांनी केला.

हे सर्व शेतकऱ्यांचे पीक कर्ज होते व बँकेच्या नियमाप्रमाणे आर्थिक वर्ष पूर्ण होतात ते थकीत झाले होते. अशा, थकीत कर्जाच्या इंशुरन्स काढण्याचा प्रश्न उद्भवत नाही. असे, असतानाही संबंधित बँक अधिकाऱ्यांनी शेकडो खात्यातून एकाच वर्षी दोन वेळा पेक्षा जास्त इंशुरन्स रक्कम वळती केली व संबंधित शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान केले. या संपूर्ण गैरकायदेशीर घटनेच्या विरोधात बऱ्याच शेतकऱ्यांनी वेळोवेळी तक्रारी केल्या, बँकांना वकिलामार्फत नोटीस दिल्या तथा मुंबई येथील भारतीय रिझर्व बँकपर्यंत शेतकरी पोहोचले, एवढेच नाही तर वेळोवेळी स्थानिक शाखेला विचारणा केली. परंतु, कुठेच समाधानकारक उत्तर मिळाले नाही. फक्त कार्यवाही चालू आहे एवढेच उत्तर मिळते. परंतु, आता शेतकऱ्यांना न्याय तत्काळ हवा आहे. तसेच, झालेल्या गैरकायदेशीर प्रकाराची त्वरित चौकशी करून न्याय देण्याची मागणी शेतकऱ्यांनी यावेळी केली.

शिवसंग्रामचे माजी जिल्हाध्यक्ष प्रशांत पाटील गोळे, ज्येष्ठ नेते प्रदीप पाटील कुटे, भरत पोदाडे, अशोक जाधव, किशोर गाढे, प्रल्हाद काळे, नेश्वर बाजड, ॲड. शंकर बाजड, अनंता खराटे, प्रमोद जाधव, जीवन वानखेडे, विलास डुकरे, गोपाल गोळे, गोपाल वानखेडे सह अनेक शेतकरी खातेदार सहभागी झाले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli Lok Sabha : 'जयंत पाटील काड्या करण्यात आणि संजय पाटील थापेबाजीत पटाईत'; माजी आमदाराची जोरदार टीका

Babil Khan: इरफान खानच्या लेकाचं होतंय कौतुक; पाण्याच्या समस्येसाठी काम करणाऱ्या संस्थेला केली मोठी आर्थिक मदत

Lok Sabha Election: PM मोदींच्या सभेमुळे ६ ठिकाणी वाहनतळ, ५ ठिकाणचे रस्ते बंद, २० मिनीटे अंत्ययात्रा रोखली

Mumbai Crime News: मानखुर्दमध्ये २७ वर्षीय तरुणीची हत्या; 'लव्ह जिहाद' म्हणत धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न

Latest Marathi News Live Update : तुमची संपत्ती लुटणारं सरकार तुम्हाला हवं आहे का? पंतप्रधान मोदींची पुन्हा काँग्रेसवर टीका

SCROLL FOR NEXT