विम्‍याची रक्‍क्‍म कमी मिळाल्‍याने शेतकरी संतप्‍त sakal
अकोला

विम्‍याची रक्‍क्‍म कमी मिळाल्‍याने शेतकरी संतप्‍त

कृषि विभागाच्या दालनात ठिय्या

सकाळ वृत्तसेवा

शेगाव (जि. बुलडाणा) : पिक विमा कंपनीकडून शेतकऱ्यांना नुकसानीचा मोबदला म्हणून त्यांनी भरलेल्या प्रिमियमपेक्षाही कमी रक्कम अदा करण्यात आल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी तालुका कृषी अधिकाऱ्यांचे कार्यालय गाठून ठिय्या मांडला व विमा कंपनीने केलेल्या या क्रूर थट्टेचा जाब विचारला. यावेळी आठवडाभरात माहिती देण्याचे आश्वासन कृषी अधिकाऱ्यांनी आंदोलकांना दिले आहे.

यंदा अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांचे अतोनात नुकसान झाले. त्यामुळे पिकविमा कंपनीकडून हेक्टरी किमान ४० ते ४२ हजार रूपये नुकसानीचा मोबदला दिला जाईल असा अंदाज व्यक्त करण्यात येत होता. मात्र, पिकविमा कंपनीकडून असंख्य शेतकऱ्यांना केवळ २५० ते ३०० रुपये इतकी विम्याची रक्कम देण्यात आली.

शेतकऱ्यांना प्रिमियमपेक्षा कमी पिकविमा मिळाला असून, एकप्रकारे शेतकन्यांची क्रुर थट्टा करण्यात आली. यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी १२ ऑक्टोबर रोजी तालुका कृषी अधिकाऱ्यांचे कार्यालय गाठून कृषी अधिकारी गायकवाड यांना याबाबत विचारणा केली. यावेळी दोन दिवसात याबाबत सविस्तर माहिती द्या, अन्यथा कृषि विभागाला ताला ठोको आंदोलन करण्यात येईल, असा इशारा शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांना दिला.

त्यानंतर भाजपाच्या नेतृत्वात संतप्त शेतकरी तालुका कृषी कार्यालयात पोहोचले असता कृषी अधिकारी गायकवाड कार्यालयात नसल्‍याने संतप्त शेतकऱ्यांनी वाट पाहात कार्यालयासमोरच ठिय्या मांडला होता. उशीरा आलेल्या कृषी अधिकाऱ्यांना आंदोलकांनी गांधीगिरी करीत पुष्पहार घालून स्वागत केले. त्यानंतर कृषी अधिकारी गायकवाड यांनी आंदोलकांना लेखी पत्र देवून आठवडाभरात पिक विमा कंपनी व वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून पिक विम्याची रक्कम इतकी कमी कशी मिळाली, याबाबत माहिती देण्याचे लेखी आश्वासन पत्र दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT