वीज मीटरमध्ये फेरफार
वीज मीटरमध्ये फेरफार sakal
अकोला

वीज मीटरमध्ये छेडछाड करणारी टोळी सक्रीय

सकाळ वृत्तसेवा

अकोला - वीज ग्राहकांच्या मीटरच्या वाचनाचे कंत्राट दिलेल्या एका एजन्सीने वीज ग्राहकाकडून पैसे घेऊन मीटरमध्ये छेडछाड केल्याची घटना समोर आली आहे. महावितरणकडून या प्रकरणी तक्रार केल्यावर अकोट पोलिसांनी तीन आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. महावितरणच्या अकोट उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता गोपाळ अग्रवाल यांनी तक्रार दिल्यावर अकोट पोलिसांनी शरद गिरी, किशोर सावरकर आणि गोवर्धन वानखेडे यांच्या विरोधात भादंवि कलम ४०६, ४२० आणि भारतीय विदुयत कायदा कलाम १३८ आणि १३९ नुसार गुन्हा दाखल केला आहे.

महावितरणकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, अकोट उपविभागातील वीज मीटर वाचनाच्या नोंदीचे कंत्राट मेसर्स लेख एंटर प्राईस याना दिले आहे. वीज ग्राहकांनी वापरलेल्या विजेचे अचूक नोंद घेण्यासाठी मीटरचे फोटो घेणे, ही जावबदारी या संस्थेला दिली होती. उपकार्यकारी अभियंता गोपाळ अग्रवाल यांना गुप्ता माहिती मिळाली की, एका वीज ग्राहकाच्या वीज मीटरमध्ये छेडछाड करून ते पुन्हा बसविण्यात आले आहे. याची खात्री करण्यासाठी अग्रवाल यांनी दहिहांडा शाखा कार्यालयातील कनिष्ठ अभियंता, जनमित्र बाळकृष्ण अलोणे आणि पंचांना सोबत घेऊन छेडछाड केलेल्या वीज मीटरची तपासणी केली. त्यात छेडछाड झाल्याचे आढळून आले. महावितरणकडून लेखी तक्रार दिल्यावर अकोट पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा सिद्ध झाल्यास आरोपीना काहोत शिक्षेची तरतूद वीज कायद्यात केली आहे. राज्यात अनेक ठिकाणी गुन्हेगारांना शिक्षा झाल्या आहेत.

मीटरला मागून पाडले छिंद्र

तपासणी दरम्यान गिनेस कंपनीच्या मीटरला मागून छिद्र केल्याचे आढळून आले. या प्रकारे शरद गिरी, किशोर सावरकर आणि गोवर्धन वानखेडे यांनी महावितरण कंपनीचे नुकसान केल्याचे निदर्शनास आले. वीज मीटरमध्ये छेडछाड केल्याने मीटर वाचन करतेवेळी नोंदी अस्पष्ट दिसत होत्या. या कामी आपण वीज वाचनास येणाऱ्या कर्मचाऱ्यास दरमहा १०० देत असल्याची कबुली वीज ग्राहकाने दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लोकसभेचा महाराष्ट्ररंग

World Laughter Day 2024 : हसा लोकांनो हसा! तणाव,हृदयविकाराची करायचीय सुट्टी तर फक्त हसा, हसण्याचे ढिगभर फायदे

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 05 मे 2024

IPL 2024 RCB vs GT: जोशुआ लिटिलनं दिलेलं टेंशन, पण बेंगळुरूने विजयाचा चौकार मारत प्लेऑफच्या आशाही ठेवल्या जिंवत

कहाणी वेदनादायी आयुष्याची

SCROLL FOR NEXT