Crime
Crime sakal
अकोला

Telhara Crime : आदिवासी शिक्षिकेचा छळ; तीन शिक्षकांवर गुन्हे दाखल

सकाळ वृत्तसेवा

तेल्हारा - तेल्हारा येथील एका नामांकित विद्यालयात सन २०१३ पासून विना अनुदान तत्वावर मान्यता प्रदान करण्यात आलेल्या एका आदिवाशी शिक्षिकेच्या तक्रारीवरून शाळेतीलच सतिष लक्ष्मण मानकर, वैभव सहदेव देऊळकार व श्रीकांत माधव पाथ्रिकर (सर्व राहणार तेल्हारा) या सहाय्यक शिक्षकांवर ता.२३ नोव्हेंबर २०२३ रोजी विनयभंगासह ॲट्रोसिटीचा गुन्हा तेल्हारा पो.स्टे.मध्ये दाखल करण्यात आला.

तक्रारदार ४२ वर्षीय आदिवाशी सहाय्यक शिक्षिकेस शाळेतीलच आरोपी तीन सहाय्यक शिक्षकांनी विनाकारण वारंवार मानसिक त्रास, जातीवरुन हिनवून बोलणे, फिर्यादीकडे पाहून जोरजोराने हसणे, त्यांच्या वर्गाजवळ उभे राहणे, अश्लील हातवारे करणे, अपशब्द वापरून अपमानित करणे, गॅलरीतून त्यांच्या वर्गाकडे डोकावून हाताने इशारे करणे इद्यादी कृत्य केल्याचा आरोप तक्रारीतून पीडिता फिर्यादीने केला आहे.

गत १२ जुलै २०२२ ते ४ ऑक्टोबर २०२३ या कालावधित वेळोवेळी घडलेल्या याप्रकरणी तोंडी व लेखी तक्रार पीडितेने संस्था अध्यक्ष, शाळा समिती अध्यक्ष व मुख्याध्यापक यांच्याकडे केली. त्यावर कुठलीही दखल घेतली नाही. त्यामुळे २८ ऑगस्ट २०२३ रोजी अध्यक्ष शाळा समितीकडे लेखी तक्रार केली.

त्यावर कार्यवाही न झाल्याने आरोपींनी त्रास सुरूच राहिल्याने दुसरा लेखी तक्रार अर्ज शाळा समिती अध्यक्षांकडे ४ ऑक्टोबर २०२३ रोजी पीडितेने नोंदविला. त्यावरही दखल न घेतल्याने ता.३१ ऑक्टोबर २०२३ तेल्हारा पोलिस स्टेशन गाठून विस्तृत फिर्याद नोंदवली. आरोपी गैरकैफीयतदारांवर कठोर कार्यवाही करून लेखी कैफीयत द्यावी, अशी मागणी केली.

असे केलेत गुन्हे दाखल

पोलिसांनी तक्रार अर्ज तपासात घेवून अखेर ता.२३ नोव्हेंबर २०२३ रोजी रात्री नमूद आरोपींविरुद्ध भारतीय दंड संहिता अधिनियम १८६० च्या कलम ३५४(ड),५०४,५०६ तसेच अनुसुचित जाती अनुसुचित जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम १९८९ चे सहकलम ३,(१),(आर),(एस),३(१)(डब्ल्यू),(१),(२),(व्हिए)अन्वये तेल्हारा पोलिसांनी गुन्हा नोंदविला. या प्रकरणी पुढील तपास प्रभारी उपविभागीय पोलिस अधिकारी गोकुळराज करीत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election Exit Poll Results 2024 LIVE : एक्झिट पोलमध्ये देशात तिसऱ्यांदा NDA ची सत्ता; INDIA आघाडीला किती जागा मिळणार?

Maharashtra Exit Poll 2024 : अजित पवारांच्या पक्षाला एक्झिट पोलमधून धक्का; किती जागा मिळणार?

Latest Marathi News Live Update: लोकसभेचा शेवटचा टप्पाही उरकला; 59 टक्के मतदानाची नोंद

Baramati Exit Poll : बारामतीचा कल हाती! सुनेत्रा पवारांना धक्का, पुन्हा सुप्रिया सुळेच होणार खासदार?

Ahamadnagar Exit Poll: अहमदनगर लोकसभेत सुजय विखेंना धक्का? EXIT Pollचा अंदाज निलेश लंकेंच्या बाजूने

SCROLL FOR NEXT