अर्थविश्व

बॅंकिंग शेअर्समध्ये तेजी

पीटीआय

सेन्सेक्‍समध्ये २७६ तर निफ्टीत ८६.९५ अंशांची वाढ 
मुंबई - सार्वजनिक बॅंकांमधील विलीनीकरणाला केंद्रीय मंत्रिमंडळाने तत्त्वत: मंजुरी दिल्यानंतर शेअर बाजारात बॅंकांच्या शेअर्सची मागणी वाढली. बॅंकिंग शेअरमध्ये आलेल्या तेजीने सेन्सेक्‍स २७६ अंशांच्या वाढीसह ३१, ५६८ अंशांवर बंद झाला. निफ्टीही ८६.९५ अंशांच्या वाढीसह ९ हजार ८५२ अंशांवर बंद झाला. 

मंत्रिमंडळाच्या निर्णयानंतर बॅंकिंग शेअरची मागणी वाढली. पंजाब नॅशनल बॅंक, बॅंक ऑफ बडोदा, अलाहाबाद बॅंक, युनियन बॅंक आदी शेअरची गुंतवणूकदारांनी खरेदी केली. बॅंकिंग शेअर बरोबरच आयटी आणि रियल्टी शेअर्सला मागणी दिसून आली. संस्थापक नंदन निलेकणी पुन्हा संचालक मंडळावर येण्याच्या शक्‍यतेने गुंतवणूकदार इन्फोसिसच्या शेअर खरेदीकडे वळाले. इन्फोसिस सलग दुसऱ्या दिवशी १.९८ टक्‍क्‍यासह ८९४.५० रुपयांच्या पातळीवर बंद झाला. अदानी पोर्ट, भारती एअरटेल, डॉ. रेड्डी, डीएलएफ आदी शेअर वधारले. एसबीआय, आयसीआयसीआय बॅंक, टाटा स्टील, टाटा मोटर्स, एनटीपीसी, रिलायन्स इंडस्ट्रीज तेजीसह बंद झाला. रियल्टी निर्देशांक ३.४८ टक्‍क्‍यांनी वधारून बंद झाला. स्मॉल कॅप आणि मिड कॅप शेअर्समध्ये खरेदीचा ट्रेंड दिसून आला. शेअर बाजाराच्या माहितीनुसार स्थानिक संस्थात्मक गुंतवणूकदारांनी ४३५.०५ कोटींची खरेदी केली. परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार (एफपीआय) मात्र विक्रीच्या मूडमध्ये आहेत. ‘एफपीआय‘ने ८२८.६९ कोटींची विक्री केली आहे. निफ्टी मंचावर रियल्टी, पीएसयू बॅंक, मेटल, फायनान्शिअल सर्व्हिसेस, एफएमसीजी आदी निर्देशांकात वाढ झाली. 

रुपयाचे अवमूल्यन
चलन बाजारात रुपयात दोन पैशांचे अवमूल्यन झाले. दिवसअखेर तो ६४.१२ वर बंद झाला. बॅंका आणि कॉर्पोरेट्‌सकडून डॉलरची मागणी वाढल्याने रुपयाला झळ बसल्याचे चलन बाजारातील विश्‍लेषकांनी सांगितले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ED: "जे काही चालले आहे ते अतिशय गंभीर आहे," कोर्टाने ईडीला का फटकारले? वाचा संपूर्ण प्रकरण

Share Market Opening: सेन्सेक्स-निफ्टी किंचित वाढीसह उघडले; सेन्सेक्स 74,600च्या पुढे, कोणते शेअर्स वधारले?

Viral Video: जिममध्ये वॉर्मअप करत असताना अचानक जमिनीवर कोसळला; तरुणाचा हर्ट अटॅकमुळे मृत्यू, पाहा व्हिडिओ

IPL 2024 : प्ले-ऑफमधून इंग्लंडचे खेळाडू बाहेर जाण्यामागे बटलरचा हात; बोर्डाने केला मोठा खुलासा

Weather Updates: मे महिन्यातही सूर्य आग ओकणार! पावसासंदर्भातही मोठी अपडेट; IMD ने काय सांगितलं?

SCROLL FOR NEXT