all investor have large cap mutual fund must
all investor have large cap mutual fund must 
अर्थविश्व

प्रत्येक गुंतवणूकदाराकडे हवा ‘लार्ज कॅप’ फंड! (पैशाच्या गोष्टी)

डॉ. वीरेंद्र ताटके

म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करताना नव्या गुंतवणूकदारांना नेहमी पडणारा प्रश्न म्हणजे गुंतवणुकीसाठी कोणत्या प्रकारचा फंड निवडावा? उपलब्ध असलेल्या शेकडो योजनांपैकी कोणती योजना शेअर बाजारातील मोठ्या कंपन्यांच्या शेअरमध्ये रक्कम गुंतवत असेल आणि तरीही तुलनेने अधिक व सुरक्षित परतावा देईल, हा प्रश्न त्याच्या मनात येतो. अशा गुंतवणूकदारांसाठी "लार्ज कॅप' फंड उपयोगी ठरतात. नावाप्रमाणेच हे फंड "लार्ज कॅप' अर्थात मोठ्या कंपन्यांच्या शेअरमध्ये गुंतवणूक करतात. उदाहरणार्थ, एखाद्या गुंतवणूकदाराला स्टेट बॅंक, लार्सन अँड टुब्रो, मारुती सुझुकी, इन्फोसिस, आयटीसी या आणि यासारख्या मोठ्या कंपन्यांच्या शेअरमध्ये गुंतवणूक करायची असेल, तर त्याच्यासाठी "लार्ज कॅप' फंड अतिशय योग्य ठरतात. शिवाय असे फंड एकाच प्रकारच्या शेअरमध्ये गुंतवणूक न करता वेगवेगळ्या क्षेत्रांतील मोठ्या कंपन्यांच्या शेअरमध्ये गुंतवणूक करतात, त्यामुळे त्यांना डायव्हर्सिफाइड फंडदेखील म्हणता येईल.

"लार्ज कॅप' कंपन्यांचे भागभांडवल आणि उद्योगविस्तार खूप मोठा असतो. त्यामुळे अशा शेअरमध्ये गुंतवणूक करणे तुलनेने सुरक्षित ठरते. शिवाय वर्षानुवर्षे नफ्यात चाललेल्या या कंपन्या लाभांश, बोनस शेअर, हक्कभाग (राईट शेअर) यासारखे फायदे गुंतवणूकदारांना नियमितपणे देत असतात, ज्याचा अप्रत्यक्ष फायदा "लार्ज कॅप' म्युच्युअल फंडातील गुंतवणूकदारांना होतो. अशा फंडात दीर्घकाळासाठी नियमितपणे "एसआयपी'च्या मार्गाने गुंतवणूक करत राहणे, हा आर्थिक यश मिळविण्याचा राजमार्ग म्हणता येईल. उदाहरणार्थ, "एचडीएफसी टॉप 200' या "लार्ज कॅप' फंडामध्ये वर्ष 1997 ते 2016 या वीस वर्षांत दरमहा दहा हजार रुपये "एसआयपी' मार्गाने गुंतविलेल्या एकूण 24 लाख रुपयांच्या गुंतवणुकीचे आजचे बाजारमूल्य जवळ जवळ 2 कोटी 90 लाख रुपये आहे. शिवाय या गुंतवणुकीतून मिळालेला संपूर्ण नफा हा दीर्घकालीन भांडवली नफ्याच्या नियमानुसार पूर्णपणे प्राप्तिकरमुक्त आहे. अर्थात "लार्ज कॅप' फंडांची वाढ सावकाश होते, कारण ज्या मोठ्या कंपन्यांमध्ये या फंडांची गुंतवणूक असते, त्या कंपन्यादेखील सकारात्मक दिशेने; परंतु सावकाश वेगाने वाढत असल्याने अशा फंडातील गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळण्यासाठी धीर धरावा लागतो. म्हणूनच गुंतवणुकीतील शिस्त आणि संयम पाळू शकणाऱ्या प्रत्येक गुंतवणूकदाराच्या भात्यात एक तरी चांगला "लार्ज कॅप' फंड दीर्घकाळासाठी असावा, असे वाटते.

गेल्या पाच वर्षांत उत्तम कामगिरी केलेले काही "लार्ज कॅप' फंड पुढीलप्रमाणे: मिरे ऍसेट इंडिया ऍपॉर्च्युनिटीज फंड, एसबीआय ब्लुचिप फंड, बिर्ला सनलाईफ टॉप 100 फंड, रिलायन्स टॉप 200 फंड, आयसीआयसीआय प्रुडेन्शियल फोकस्ड ब्लूचिप इक्विटी फंड, यूटीआय इक्विटी फंड.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LSG vs MI : मुंबई पॉवर प्लेमध्ये 'पॉवर'लेस; लखनौनं प्ले ऑफचं गणित बिघडवलं?

Modi Latur Rally: "देवानं मला असं मॅन्युफॅक्चर केलंय की..."; PM मोदींनी सांगितलं आपण मोठाच विचार का करतो

Hardik Pandya LSG vs MI : भारतीय संघातील स्थान सेफ होताच हार्दिकचा भोपळा; मुंबईचा संघ आला अडचणीत

Shivam Dube: 'युवराजबरोबर तुलना मुर्खपणाचे...', टी20 वर्ल्ड कपसाठी निवड झालेला शिवम दुबे काय म्हणाला

Loksabha election 2024 : ''जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत मुस्लिमांना एससी, एसटी अन् ओबीसीतून आरक्षण मिळू देणार नाही'' मोदींचा काँग्रेसवर हल्ला

SCROLL FOR NEXT